‘आठवणीतील खळे’ कार्यक्रमाने रसिकांना केले मंत्रमुग्ध. — अनुजा जोशी गाडे
कार्यक्रमाची संकल्पना आनंद फडणवीस -राजेश खिंची यांची, तर संगीत नियोजन गोविंद गडीकर आणि मोरेश्वर दहासहस यांचे होते.

‘आठवणीतील खळे’ कार्यक्रमाने रसिकांना केले मंत्रमुग्ध.
आठवणीतील खळे
सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रत्येक गीतात असलेला स्वर आणि भावाचा सुरेल संगम गायक कलाकारांनी सादर केलेल्या त्यांच्या प्रत्येक गीतातून उपस्थित रसिकांनी अनुभवला आणि त्याला टाळ्या आणि वन्समोअरने प्रतिसादही दिला.
सुप्रसिद्ध सांगीतिक संस्था स्वरमाला, दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र, नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त वतीने सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम ‘आठवणीतील खळे’ आयोजित करण्यात आला.
लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात रविवारी झालेल्या
‘आठवणीतील खळे’ कार्यक्रमात गाणी सादर करताना कलाकार
कार्यक्रमाची, त्यांनी स्वरबद्ध केलेली एकाहून एक सरस अजरामर गाणी सादर करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या सामूहिक गीताने झाली. यानंतर पुण्याच्या अनुजा जोशी गाडे यांनी ‘सुंदर ते ध्यान,’ ‘पाण्यातले पहाता,’ ‘या चिमण्यांनो,’ ‘जाहल्या काही चुका,’ ‘श्रावणात घननिळा, अनुजा मेघळ-सावजी यांनी ‘कशी रे तुला भेटू,’ ‘एका तळ्यात होती,’ ‘भावभोळ्या भक्तीची, मुकुल पांडे यांनी ‘लाजून हासणे,’ ‘काळ देहासी आला खाऊ,’
गुणवंत घटवाई यांनी ‘पंढरीचा वास,’ ‘बगळ्यांची माळ,’ निधी रानडे यांनी ‘उगवला चंद्र पुनवेचा,’ ‘कळीदार कपुरी पान,’ राजेश खिंची यांनी ‘जेव्हा तुझ्या बटांना,’ ‘गेले ते दिन गेले,’ ‘तेजाचा पसारा, आनंद फडणवीस यांनी ‘लळा जिव्हाळा’ आदी श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली गाणी सादर केली. तसेच शुक्रतारा मंदवारा, बाजे मुरलिया बाजे ही द्वंद्वगीतेही छान सादर केली. कार्यक्रमात त्यांनी संगीतबद्ध केलेली बालगीते देखील सादर करण्यात आली.
या गायक कलाकारांना गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्र, विशाल दहासहस्र, अरविंद उपाध्ये, अमर शेंडे, गौरव टाकसाळे आणि गजानन रानडे यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.
कार्यक्रमाची संकल्पना आनंद फडणवीस राजेश खिंची यांची, तर संगीत नियोजन गोविंद गडीकर आणि मोरेश्वर दहासहस यांचे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.