मंथन (विचार)मनोरंजन

लघुकथा – संजीवनी ले- अरुण वि.देशपांडे – पुणे. 9850177342

लेखक- अरुण वि.देशपांडे-पुणे
लघुकथा – संजीवनी
———————

दरवर्षीच पावसाळा येत असतो , कधी कमी तर कधी खूप त्यामुळे ओलां -दुष्काळ , कोरडा दुष्काळ , अतिवृष्टी ,
कधी पावसाने मारली दडी ” एकूणच आता निसर्गाचे चक्र लहरी आणि बे- भरवसा झाले आहे . त्याचे फटके सगळ्यांना बसत असतात , यातून कुणाची सुटका होत नसते . परिस्थिती हाता बाहेर गेली की प्रत्येकाच्या तोंडून “हाताशलेले “आणि
हतबल झालेले शब्द येतातच .. आत्तापर्यंत निभावत नेलं ..पुढे कसं काय होणार ..ते श्रीहारीलाच ठावं असणार .

सगळ्या लोकांना होणार्या त्रासाशिवाय एक वेगळा आणि अधिकचा त्रास- तो म्हणजे –
“दम्याचा त्रास, . “हा अस्थमा फार त्रास देतो मदनरावांना.

ऐन पावसाळ्यातले ..दमट, कोंदट- ढगाळलेले वातवरण असले की त्यांना असलेला
अस्थम्याचा त्रास डोकं वर काढतो . दमेकरी – मदनराव ..रात्र-रात्र – उशाला टेकून बसतात, आणि सकाळच्या उजेडाची वाट पहातात .

लहानपणापासून त्यांच्या अंगात शिरलेला “दमा ” काही केल्या पिच्छा सोडीत नव्हता . वातावरण बदलून गेले की ..हा दमा हटकून
उचल खातो ..आणि पावसाळ्याचे दिवस मदनरावसाठी ..नको हे जगणे ..! असे करून टाकतात .

मदनरावांनी या तब्येतीपायी ,त्रासापायी , चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली .. .ऑफिसच्या पोलिटिक्समध्ये ..मदनरावांना नेहमी

बदलीची धमकी दिली जायची ..नीट काम करायचं -गोडीत राहायचं .. .नाही तर ..तुमच्यासाठी – चिखलदरा , माथेरान ,
लोणावळा , महाबळेश्वर – प्रमोशनवर पाठवतो ..मग तर काही नुकसान नाही तुमच..

युनियनच्या या अरेवारीला – दडपशाहीला कंटाळून मदनरावांनी
ऑफिसने जाहीर केलेली स्वेच्छा -निवृत्ती घेतली .आणि मिळालेल्या पैशात – पेन्शन मध्ये आहे तिथेच बस्तान बसवले .

ऑफिसच्या कॉलोनीत मदनरावांनी टुमदार बंगला बांधला , लहान गावात चांगले दिवस जाऊ लागले . जवळच असलेल्या वाड-वडिलांच्या शेतीच्या गावी त्यांची नियमित चक्कर टाकणे सुरु झाले ..सगळ्यांना समाधान वाटावे असे निचीन्तीचे आयुष्य मदनराव आणि फमिलीच्या वाट्याला आले.

त्यांच्या ऑफिसमधल्या जिगरी दोस्ताला पैशाची गरज पडली ..दोस्ताच्या पोराला दिल्लीच्या संस्थेतली डीग्री मिळवायची होती .

पण यासाठीची भली मोठी फीसची रक्कम कशी जमवायची ? मदनरावच्या दोस्ताने आजूबाजूला हात-पाय मारून थोडेफार जमवले,पण त्याची नड काही भागेना ,

शेवटी ..मदनरावकडे दोस्त येऊन बसला, ..म्हणाला .. आता तूच माझा देव हो.. तुला शपथ आहे..साकडे घातले समज ..
माझ्या पोराच्या कोलेज्साठी एकरकमी दोन लाख आत्ताच्या आत्ता फक्त तूच देऊ शकतोस. मी तुझे पैसे परत करीन .

इतक्या वर्षाच्या आपल्या दोस्तान्यावर विश्वास ठेव.. आणि आपण जिंदगीभर एकाच कोलोनीत असणार आहोत…
नाही म्हणू नको ..मदनराव .

मदनरावने मनात हिशेब केला ..पोरीच्या लग्नाला आजून वेळ आहे .आठ-दहा वर्ष, ..तोवर देऊ या आपल्या दोस्ताला , तो आपली गरज
वेळेवर करील पूर्ण . झाला विचार पक्का …दोन्ही फामिलीच्या साक्षीने ..पैसे देणे झाले . फसवण्याची ? शंका कुणाच्या ही मनात नव्हती.

दिवस भर भर उलटत गेले .. वयोमानाप्रमाणे ..मदनराव थकत गेले ..त्यात अस्थ्म्याने ..त्यांचा पार खुळखुळा करून टाकला . धीराने
सगळा त्रास सहन करीत मदनराव हसतमुखाने उजाडलेला नवा दिवस पाहत होते.

त्यांचा मुलगा -सुनबाई ..दोघे ही इंजिनीअर..इकडे असण्याचा प्रश्नच नव्हता , ते कधीच “तिकडे ” जाऊन सेटल झाले होते.

राहता राहिली त्यांच्या सोबत त्यांची लाडकी एकुलती एक पोरगी – संजीवनी .. नव्या जमान्याप्रमाने नाही म्हटले तरी पंचीविशीच्या पोरीचे लग्न तर झाले पाहिजे ,
आपण असे “दमेकरी “.. किती वर्ष अजून दम धरणार .. ? मदनराव घाबरून जात , पुन्हा स्वतःला धीर देयायचे.

या सगळ्या उलाढालीच्या दिवसात ..दोस्ता ने दोन लाखांतील फक्त पन्नास हजार परत केले ..बाकीचे कधी ?
याचे उत्तर ” हो -“नाही ,”की नाही ,नाही”
आणि
मी कुठ पळून जाणार काय ? देतो की.

तुझ्या संजूचे लग्न तर ठरू दे.
असे रेडीमेड उत्तर ऐकून ऐकून मदनरावचा विश्वास- धीर ढळू लागला.

” दमेकरी बापाची ..बिघडत चालेली हालत पाहून लेकीची -संजीवानीची मन:स्थिती दुःखी होत गेली, तिच्या आईची काळजी वाढतच जाऊ लागली . आता कसे होणार ?

मदनरावांना भीतीदायक स्वप्ने पडू लागली ..ते घाबरून गेले ..माझ्या संजूचे कसे होणार ?
एका रात्री त्यांची तब्येत एकदम गंभीर होऊन गेली .. तपासण्या झाल्या , “हलका झटका येऊन गेलाय , काळजी घ्या असे डॉक्टर सांगून गेले .

सगळे घर काळजीत दबून गेले.
मदनरावाचा आता काही भरोसा नाही..
आहे तो पर्यंत आहे म्हणायचं अन पुढ चालायचं ” !

एका सकाळी सकाळी – मदनरावांचा दोस्त भेटायला आला ..सोबत त्याच्या घरातले सगळे होते . उशाला बसत दोस्ता ने मदनरावचा
हात हातात घेत म्हटले ..

” मदनराव ..तुला काही झालं नाही, होशील बरा यातून..
काळजी नको करू. !

बघ हे – तुझे दीड -लाख रुपये परत करण्यासाठी आलोय मी फॅमिलीसकट .

पण..माझी आज ही तुला एक शपथ घालायची आहे .
तुझी संजू -माझ्या घराची लक्ष्मी व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे.

मदनराव लेका – आपण दोस्त -दोस्त आता
ईव्हाई -इव्हाई होऊ या.
बेस्ट आहे की नाही आयडीया ?

मदनरावच्या कानावर मित्राचे शब्द पडले ..त्यांच्या खंगलेल्या -दमेकरी देहात जणू नवी शक्तीच आली..

मित्राला मिठी मारीत ते म्हणाले ..
दोस्ता — माझ्या संजीवनीला -संजूला -तुम्ही स्वीकारून ..
मलाच जगण्याची नवी संजीवनी दिली आहे की रे तू बापा ..!

देवा ..कृपा केलीस रे बाबा !.

—————————————-
लघुकथा – संजीवनी
ले- अरुण वि.देशपांडे – पुणे.
9850177342

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}