*शाही तुकडा रेसिपी*

*शाही तुकडा रेसिपी*
शाही तुकड्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 5 ते 6 ब्रेड.
2) 4 चमचे तूप.
3) अर्धा लिटर दूध.
4) 3 वाट्या साखर.
5) 1 चिमूट केसर.
6) 10 ते 12 बदाम.
7) थोडे काजू, पिस्ता.
8) थोडा खवा.
9) 2 चमचे गुलाबजल.
पाककृती :
सर्वात पहिले रेसिपी बनवण्या अगोदर 3 तास बदाम भिजू घाला, आणि नंतर त्याची साल काढा.
नंतर गॅस वरती एका खोल भांड्यात दूध उकडू घाला, आणि ढवळत रहा.
नंतर एका मिक्सरच्या भांड्यात ओल्या बदाम, एक चिमूट केसर, आणि इलायची टाका, यामध्ये थोडे पाणी टाकून.
बारीक पातळ पेस्ट तयार करून घ्या, आणि एका भांड्यात काढून घ्या,
नंतर दुधाला उकळी आली की, त्यामध्ये बदामचे मिश्रण टाकून चांगले मिक्स करा.
दूध खाली लागायला नको, ते सतत चमच्याने ढवळत रहा, नंतर यामध्ये थोडा खवा टाकून मिक्स करा.
काही मिनिट नंतर दूध घट्ट होणार, आणि सुगंधित वास तेव्हा दूध खाली काढून घ्या.
आता ब्रेडचे त्रिकोणी तुकडे तयार करा, आणि थोडा वेळ हवेत ठेऊन सुकू घ्या.
नंतर गॅस वरती एका भांड्यात थोडी साखर, आणि गुलाबजल टाकून घट्ट पाक तयार करा, आणि खाली काढून थंड होय द्या.
नंतर एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून, ब्रेडचे तुकडे लालसर तपकिरी होये पर्यत भाजून घ्या.
नंतर हे तुकडे पाकात टाकून चांगले भिजवून घ्या, आणि एका खोल प्लेटमध्ये एका बाजूला एक ठेवा.
नंतर या ब्रेडवर आपण तयार केलेले शाही दूध टाका, त्यावर थोडे काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे टाका.
अशा प्रकारे ब्रेडचे तुकडे सजवा, ब्रेडचे तुकडे थोड दूध शोषून घेणार 5 मिनिट हे तसेच राहू घ्या.
आता आपली स्वादिष्ट आणि गोड शाही तुकडा रेसिपी खाण्यासाठी तयार आहे, आपण एका छोट्या वाटीत घेऊन शाही तुकडा खायाचा आनंद घेऊ शकतो.
शाही तुकडामध्ये असणारे घटक :
शाही तुकडा बनवण्यासाठी दूध, काजू, बदाम, पिस्ता, या सारख्या पौष्टिक पदार्थचा उपयोग करतात.
यामुळे यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, जसे कॅल्शियम, कॅलरी, व्हिटॅमिन, चरबी, फॅट, शुगर, कर्बोदके, फायबर, प्रथिने, हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.