Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

8 बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग ८ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग ८
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
सन १८९४- ९५ साली मुंबई-पुणे वगैरे ठिकाणी दंगल उसळली. देशभरात देखील अनेक ठिकाणी या दंगलीचा भडका उडाला होता. केसरी, पुणेवैभव वगैरे वृत्तपत्रातून दंगलीच्या बातम्या येत असत. त्या जाणून घेण्यासाठी विनायक आणि त्याचे मित्रमंडळ उत्सुक असे. टपालातून ही वृत्तपत्रे येत असल्याने विनायक टपाल कार्यालयापाशी तासंतास वाट पाहत बसायचा. एकदाची वृत्तपत्रे आली की ती स्वतः वाचावी, आपल्या मित्रांना, वडिलांना वाचून दाखवावी. मुंबई पुण्याच्या आणि देशातील बातम्या काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांच उत्सुकता असे.
विनायक तेव्हा बारा- तेरा वर्षांचा असे. त्याने आणि त्याच्या मित्रमंडळीनी या देशभर चाललेल्या दंगलींचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले. भगूरच्या वेशीबाहेर समोरच्या पक्षाची एक पडकी जागा असे. तिकडे कोणी फिरकत नसल्याने ते ओसाड असे. तिकडे जाऊन तोडफोड करायची आणि आपल्या बांधवांवर देशभरात होणाऱ्या हल्यांचा बदला घ्यायचा असे ठरवले.
एके दिवशी संध्याकाळी दहा-बारा वर्षांची ही पोरांची टोळी लपत छपत त्या ठिकाणी गेली. तिकडे समोरच्या पक्षाचे कोणीच नव्हते. त्यांनी त्या स्थळावर छापा घातला. विनायक या बाबतीत नंतर लिहितो,
“शिवछत्रपतींच्या हल्ल्याची धुळाक्षरे आपण वळवीत आहोत ही पूर्ण जाणीव ठेवून, त्या शिवसंप्रदायातील शेवटचे कृत्य, जे रणातून चटकन पाय काढणे ते अगदी शक्य तितक्या आरंभीच उरकून घेतले.”
दुसऱ्या दिवशी या हल्याची खबर समोरच्या पक्षातील मुलांना कळली. दोन्ही पक्षाच्या शाळा समोरासमोर असत. त्यामुळे तिथे उभयतांमध्ये तुंबळ मारामारी झाली. शिक्षक वगैरे शाळेत येण्याआधीच त्यांना ही लढाई उरकून घ्यायची होती. विनायकाला असे काही होईल याची कुणकुण लागली असल्याने त्याने आपल्या मित्रमंडळींकडे चाकू, रूळ, टाचणी इत्यादी वस्तू आधीच देऊन ठेवल्या होत्या. झालेल्या मारामारीत विनायकाच्या पक्षाचा विजय झाला. शिक्षक येण्याची वेळ झाल्यावर शेवटी दोन्ही पक्षात संधी करण्यात आली.
 आणि या लढाईची माहिती कोणीही शिक्षकांना सांगू नये असे उभय पक्षांनी अन्य केले.
पण समोरच्या पक्षातील काही मुलांनी एक गुप्त कट केला. त्यांनी ठरवले की, ‘पराजयाचा सूड घेण्यासाठी या बम्मनच्या बच्च्याच्या तोंड मे बोंबील मासा कोम्बनेका.’ पण याबाबत त्यांना काही यश आले नाही. तो बम्मनचा बच्च्चा अर्थात विनायक होता.
यानंतर पुन्हा असा प्रसंग येऊ नये म्हणून विनायकाने आणि त्याच्या मित्रमंडळींनी सैनिकी शिक्षण घेण्याचे ठरवले. शिस्त आणि शौर्य वाढावे म्हणून ही लहान पोर आपल्यात दोन गट पडत. एक पक्ष हिंदूंचा असे तर दुसरा त्यांच्या विरुद्ध असे. दारुगोळा म्हणून ही पोर निंबोण्या गोळा करून वाटून घेत. दोन्ही पक्षांच्या मध्ये एक ध्वज ठेवत. तो पाडाव करून समोरच्या पक्षाचा दारुगोळा जो हस्तगत करेल तो पक्ष विजयी होई. बहुतांशी हिंदूंचा पक्षच जिंके पण यदाकदाचित समोरचा पक्ष जिंकू लागला की विनायक त्यास हरायला प्रवृत्त करे, व शेवटी जय हिंदूंचाच होई.
जय झालेला पक्ष आणि पराजित पक्ष लढाई संपल्यावर एकत्र येऊन गावातून वाजतगाजत मिरवणूक काढत, विजयाचे पोवाडे म्हणत असत. लोक घराबाहेर येऊन या मुलांचे हे खेळ पाहत.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य  (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.)  9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}