Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

12 बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग १२ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग १२
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
३. कवितेच्या प्रांतीची प्रगती.
विनायक अगदी लहानपणापासूनच कविता करे, ओव्या रची, आर्याही रचे. त्याबाबत थोरा मोठ्यांना त्याच फार कौतुकही वाटे. शाळेतील शिक्षकांना देखील विनायकाच्या या छंदाचे कौतुक वाटे. विनायकाने रचलेल्या कविता, आर्या तो त्यांना वाचून दाखवे. ते विनायकास नेहमी म्हणत, ‘अशाच कविता करत जा, एक दिवस मोठा कवी होशील.’
पण हे विनायकाचे कौतुक करणारे शिक्षण काही काळातच बदली होऊन गेले आणि त्यांच्या जागी नवशिके मुख्यशिक्षक आले. ते स्वतः कविता करत, अर्याही रचत. त्यांच्यापर्यंत विनायकाच्या कवितेतील विद्वत्तेची महती पोहोचण्यास वेळ लागला नाही. त्यास वारंवार विनायकाबद्दल अनेकांकडून चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत. वास्तविक शाळेचा विद्यार्थी म्हणून त्यास याबद्दल आनंद वाटला पाहिजे होता. पण झाल उलटच. त्यांना विनायकाची असूया वाटू लागली. हा नाका पेक्षा मोती जड अशातला वाटू लागला. त्यामुळे विनायक जेव्हा जेव्हा त्यांच्याशी राजकारणावर बोलायला जाई तेव्हा तेव्हा हे त्यास म्हणत की, “बैस! लहान तोंडी मोठा घास घेत जाऊ नको!”
तरी विनायकास वाटे की ते मुख्य शिक्षक आहेत, त्यांच्याशी राजकारण वगैरे विषयांवर बोललो म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल, म्हणून तो त्याचं उत्तर माहित असूनही त्यांच्याशी या विषयांवर बोलायला जात असे. हे शिक्षक देखील कवी आहेत, आर्या रचतात हे विनायकास माहित झाल्यावर त्याला वाटले की, आपल्या आर्या ऐकून शिक्षक आपल्याला मोलाच मार्गदर्शन करतील, पण या ही वेळेस झालं उलटच. शिक्षकांनी आर्या वाचून न बघताच. केवळ नजर फिरवून विनायकास म्हणाले की,
 “मोठा कविता करावयास निघाला! तुला गण मात्रा कशाशी खातात हे तरी माहित आहे का? जा पुन्हा असा लहान तोंडी मोठा घास घेत जाऊ नकोस.”
शिक्षकांच्या बोलण्याने विनायकाचा भ्रमनिरास झाला. शिक्षकांच्या या वागण्यामुळे जी पोर आजपर्यंत विनायकास कविता करतो म्हणून डोक्यावर घेऊन नाचत तीपण स्वतः या विषयातले तज्ञ असल्यासारखे त्याला हसली.
पुन्हा काही विनायकाने त्या शिक्षकांना आपले लेखन दाखवले नाही. पण विनायकाच्या मनात विचार आले की, “शिक्षकांनी जर आर्यांच्या मात्रांचे रहस्य समजावून सांगितले असते तर त्यास दहा मिनिटांचा सुद्धा कालावधी लागला नसता. पण असे समजावून सांगून उत्तेजन देण्याऐवजी त्यांनी उपहास केला.”
खर तर ते शिक्षक स्वतः कविता करत. त्यामुळे जर इतक्या लहान विद्यार्थ्याने कविता केल्या तर आपली महती ती काय राहणार या शुल्लक विचारांनी शिक्षक असे वागले होते.
विनायक पुढे नेहमी म्हणे,
“तेजोभंगाच्या आणि मनोभंगाच्या बेड्यांनी माझे पाय बहुदा गुरुजनांकडूनच जखडून ठेवण्यात येत. पुढे जाण्यात, जी अन्यथा अधिक उपयोगी पडती, अशी माझी किती तरी शक्ती, गुरुजनांनी पाय मागे खेचण्यासाठी ठेवलेल्या या बेड्या, पुढे जाण्यासाठी तोडण्यातच खर्ची पडली.”
एका बाजूला असे अनुभव येत असताना दुसरीकडे मात्र चांगले अनुभव येत होते. कविता, आर्या, फटके, ओव्या, पदे रचून विनायक ती गुपचूपपणे वर्तमानपत्रात छापण्यासाठी पाठवू लागला. अनेक वेळेस अनेक वर्तमानपत्रात अशा कविता पाठवल्यानंतर एक दिवस मात्र ‘स्वदेशीचा फटका’ खरोखरच वर्तमानपत्रात छापून आला. मागे शिक्षकांमुळे जे विद्यार्थी विनायकास हसले होते, तेच विद्यार्थी आता विनायकाच्या प्रतिभेची वाखाणणी करू लागले. विनायकासही तो दिवस फार महत्वाचा वाटल्या वाचून राहिला नव्हता. कारण पहिल्यांदाच त्याच लिखाण वर्तमानपत्रात छापून आलेल होत.
तोपर्यंत भगूर गावातील एकाही व्यक्तीची कविता वर्तमानपत्रात छापून आलेली नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये देखील विनायकाची चांगलीच वाहवा झाली. त्यातही पुण्याच्या वर्तमानपत्रात छापून आले याचे अप्रूप जास्त होत. ते ही ‘जगतहितेच्छु’ या वर्तमानपत्रात आलेले होते.
पुढे एकदा विनायक म्हणाला होता की, “जी कविता त्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली, ती एका खेड्यातील बारा वर्षांच्या मुलाची होती हे त्यांना कळले नाही. नाही तर क्वचित ती प्रसिद्ध झाली नसती! कारण कविता कशी आहे, यापेक्षा कवी कोण आहे यावर चलचलाऊ नियतकालिकातील मुद्रण बहुदा अधिक अवलंबून असते.”
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य  (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.)  9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}