Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

17 बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग १७ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग १७
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
८. चापेकर बंधू.
या सगळ्या धिंगाण्यावर प्रतिक्रिया उमटली. चापेकर बंधूंनी पुण्यात सरकारच्या प्लेग निवारक अधिकाऱ्यांच्या जाचाचा सूड म्हणून रँड आणि आयस्ट या दोघा इंग्रजी अधिकाऱ्यांचा गोळ्या झाडून वध केला. हा वध त्यांनी जून १८९७ मध्ये केला. त्यावेळी महाराणी व्हिक्टोरियाच्या हरीकोत्सवाचे संपूर्ण हिंदुस्थान भर कार्यक्रम साजरे केले जात होते. ज्या दिवशी सरकारच्या वतीने ब्रिटीश सत्तेच्या विजयाशाली प्रभावाने अवघा हिंदुस्थान दिपवला जाणार होता. त्याच दिवशी चापेकर बंधूंनी हा सूड घेतला.
ब्रिटीश सरकारने स्वतःचे राज्य किती महान आहे हे दाखवण्यासाठी आयोजिलेले अनेक कार्यक्रम संपूर्ण हिंदुस्थानात सुरु असतांना, त्या कार्यक्रमाचा फोलपणा दाखवण्यासाठीच जणू काही चापेकर बंधूंनी ही वेळ निवडली असावी.
दोन इंग्रजी अधिकाऱ्यांच्या वधानंतर इंग्रज सरकारने दडपशाही आरंभिली. विलायतेपर्यंत या प्रकरणाची चर्चा होऊ लागली. पुणेरी ब्राह्मणांचा दरारा आणि द्वेष याने इंग्रजांना घाम फुटला. पुण्यामध्ये अटकसत्र चालले.
 लोकमान्य टिळकांना अटक केली. नातूंना देशपारीची शिक्षा देऊन अटकेत ठेवण्यात आले. राष्ट्रीय बाण्याचे संपादक बंदिवासात पडले. चापेकर बंधूंचे समर्थन करणारा प्रत्येक व्यक्ती आपला शत्रू असल्याचे गृहीत धरून इंग्रज त्याच्याशी वागू लागले.
संपूर्ण हिंदुस्थान चापेकर बंधूंच्या पराक्रमाने शहारून गेला. प्लेग निवारणार्थ चाललेल्या अत्याचारांचा सूड घ्यावा ही प्रत्येक भारतीयाची इच्छा चापेकर बंधूंनी पूर्ण केली होती. वासुदेव बळवंत फडके यांच्या नंतर सशस्त्र क्रांतीची ठिणगी पुन्हा पडू पाहत होती. पुणेरी पुढाऱ्यांना भर चौकात वेताने फटके देऊन सडकून काढावे अशा वल्गना इंग्रज करत होते. त्यावर टिळक केसरीतून विचारात होते, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे ना?”
वध झाल्यानंतर थोड्याच दिवसात दामोदरपंत आणि बाळकृष्णपंत हे चापेकर बंधू पकडले गेले. द्रविड बंधूंनी केवळ दहा सहस्त्र रुपयांच्या बदल्यात इंग्रजांना चापेकर बंधूंची खबर दिली. विश्वासघात केला.
 त्यांच्यावर कटाचा खटला भरण्यात आला. त्याने देशातले वातावरण ढवळून निघाले. शेवटी इंग्रज सरकारला हवा होता तोच निकाल देऊन चापेकर बंधूंना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. संपूर्ण देश या बातमीने हळहळत होता. चापेकर बंधू सर्वांना आपलेच वाटत होते. त्यांना पकडून देणाऱ्या द्रविड बंधूंना चापेकरांच्या धाकट्या भावाने आणि त्याचा मित्र रानडे याने पुण्यात भर रस्त्यात गोळ्या घालून ठार केले.
 त्यांनाही पकडण्यात आले. त्यांनाही फाशी देण्यात आली.
प्लेग निवारणार्थ चाललेल्या दंडेलशाही विरुद्ध इतकी मोठी प्रतिक्रिया उमटल्यानंतर इंग्रजांनी प्लेग निवारणाच्या नावाखाली चालवलेला नंगा नाच थांबवला. अत्याचार करणारे सोजीरे लोक पुण्यातून काढून घेण्यात आले. त्यांची लुटालूट, जाळपोळ बंद झाली. अति जाचक नियम रद्द करण्यात आले.
 हा जाच थांबवण्यासाठी चापेकर बंधूंना आपल्या प्राणाची आहुती द्वावी लागली होती. भारतीयांना गृहीत धरून त्यांचावर अत्याचार करणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांवर चांगलीच दहशत बसली होती.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य  (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.)  9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}