Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

18 बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग १८ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग १८
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
९. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीची शपथ.
या अद्भुत आणि रोमहर्षक घटना इतक्या सतत आणि जलदगतीने घडत गेल्या की धक्यामागून बसलेल्या धक्याने मुर्दाडातील मुर्दाडाच्या अंगात देखील उत्तेजन आणि क्षोभ संचारल्यावाचून राहिला नाही. असा सारा देशच उत्तेजनाने धुंद झाल्यासारखा झाला. मग विनायक तर आधीपासूनच देशप्रेमी. स्वदेशास स्वतंत्र करण्याची आधीपासूनच तळमळ लागलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि पौराणिक वीरांच्या रंगात रंगून राहिलेल्या विनायकाची स्थिती काय वर्णावी. चापेकर-रानडे यांच्या खटल्याची, शिक्षेची आणि फाशीची वर्णने वाचीत असताना वर्तमानपत्राचे अंक विनायकाच्या अश्रूंनी चिंब भिजत असत.
काही वर्तमानपत्रे चापेकर बंधूंना खुनी, देशाचा घात करणारे, जातीला कलंक लावणारे म्हणून असंख्य शिव्याशाप देत. मनातून जरी चापेकर बंधूंच्या त्यागाबद्दल आदर असला तरी तो उघडपणे त्यास दाखवता येत नसे. लोकही मनातून त्यांच्या कार्यास वंदन करत असले तरी उघड उघड त्यांचे नाव घेणे हे देखील पातक मनात. या उलट विनायक सर्वांसमोर त्यांच्या कार्याचा गौरव करी. त्यांना कोणी नावे ठेवली की विनायकास संताप येई आणि खिन्न वाटे. विनायक त्यांस वीरवर म्हणजेच हुतात्मे म्हणून गौरवी. केसरीत तर चापेकर बंधूंना वेडे पीर असे संबोधलेले पाहून विनायकास अधिकच वाईट वाटले. लोकांत देखील माथेफिरू हा शब्द प्रचलित झाला. विनायकाने या शब्दांना तीव्र विरोध दर्शविला.
तो म्हणे,
“ते माथेफिरू तर तुम्ही मुर्दाड.
 मुर्दाडापेक्षा माथेफिरूस राष्ट्रशत्रू अधिक घाबरून असतो. पिनल कोडच्या भितीसाठी देखील त्यास माथेफिरू म्हणण्याचे कारण नाही. त्यांस त्या भितीसाठी चांगले म्हणून नका. पण शिवीगाळ का करता? लोक आपल्या भ्याडपणाची लाज झाकण्यासाठी त्यास माथेफिरू म्हणतात. नाही तर अशीच कृत्ये करणाऱ्या इंग्लिशांना, रशियनांना, आयरीशांना हीच वर्तमानपत्रे आणि हेच लोक ‘वीर’ म्हणून निसंकोचपणे का गौरवतात? कारण त्यास इंडिअन पिनल कोडची भीती नसते.”
विनायक या विचारांमुळे अस्वस्थ होई. तो विचार करी की,
“चापेकर बंधू, रानडे आपल्या स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाता जाता चेतविलेली ही शत्रुंजय वृत्ती, या यज्ञकुंडात समिधेमागून समिधा टाकून अशीच भडकवीत नेणे गरजेचे आहे. यातूनच प्रचंड असे स्वातंत्र्ययुद्ध उभे राहत असेल तर त्याचे दायित्व माझ्यापुरते मजवरही पडत नाही का? चापेकरांचे कार्य कुणी तरी चालविले पाहिजे ना! तर मग ते मीच का चालवू नये! तो होम मीही का करू नये!!”
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य  (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.)  9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}