मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर
Trending

कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक )

दर वर्षी सारखीच या वर्षी मध्यप्रदेश नंतर कर्नाटक सह्याद्री (नॉन कोस्टल) कार ट्रिप Oct 25,  २१ तारखेला सुरु करून Nov 25 ,  २ ला बॅक टू होम

 

कर्नाटक ट्रिप दिवस पहिला

सहा वाजून बावीस मिनिटानंतर शुक्राच्या नक्षत्रावर घरातून निघालो , हो ते सांगायचे राहिलेच , आता हे पण बघतो , आणि अनुभव चांगले येत आहेत बरं आणि त्यामुळे प्रवास इतका मस्त झाला साताऱ्यापर्यंत तर रस्ता चांगला आहेच , टोल नाके ओस पडले होते , प्रत्येक ठिकाणी डायरेक्ट पहिलाच नंबर लागला आणि गाडी ब्लॅक लिस्टेड नाही , सेन्सर चांगले काम करतात टोल चे अश्या छान तरंगत जाणाऱ्या प्रवासात पहिला ब्रेक घेतला

सातारा कामत मध्ये विठ्ठल वडा नावाची एक डिश मिळते ती म्हणजे खाल्लीच पाहिजे ,

असा मस्त ब्रेकफास्ट आणि वर क ड क चहा  .

गाडीचे पण पोट भरले टम्म , पेट्रोल टॉप अप गळ्यापर्यंत भरून आणि ते ही शेल पॉवर , म्हणजे एकदम सुपर चार्ज झाल्यासारखी गाडी ,, आहे छोटीशी पण पॉवर फक्त गाडीमध्ये नसते , डायव्हर पण तसाच हवा ना , AC मधल्या थंड वाऱ्याशी गप्पा करत आम्ही कोल्हापूर क्रॉस कधी केले तेच कळले नाही

सातारा कोल्हापूर खूप Diversions  आहेत असे दिसत होते गूगल मॅप वर परंतु साताऱ्यानंतर कराड आणि कोल्हापूरपर्यंत खूप सारे डायव्हर्जन्स असूनही रस्त्यात जरा सुद्धा गर्दी नव्हती त्यामुळे कुठेही खोळंबा , ट्रॅफिक जॅम नाहीच , किंवा खूप स्लो पण नाही त्याच बरोबर कोल्हापूर ते बेळगाव मध्ये सुद्धा एक एक दीड दीड किलोमीटरचे दोन किंवा तीन ड्रायव्हरजन्स होती त्या ड्रायव्हर्जन मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची गर्दी नसल्यामुळे अतिशय आरामात आणि वेळेत प्रवास होऊन आम्ही साडेबारा – पाऊण वाजता बेळगाव मध्ये हॉटेलमध्ये पोहोचलो सुद्धा , पै हॉटेल्स , मस्त एकदम आत गेल्यावर एन्ट्री पासून हे हॉटेल मस्त असणार याची खात्री पटलीच , वेल अँपॉईंटेड , गुड स्टाफ आणि सिक्युरिटी छान , चिंताच नाही , रूम्स मस्त आहेत मोठ्या मोठ्या आहेत आणि शहरात चांगल्या एरिया मध्ये असल्याने एक लॅव्हिशनेस होता १ ते ८ , ९ पर्यंत म्हणजे अर्धा दिवस हाताशी होता

माझ्या मित्राच्या, देवाच्या ( देवदत्त देशपांडे) , सांगण्यानुसार हॉटेल सन्मान मध्ये जाऊन व्हेज साऊथ इंडियन थाळी घेतली फारच सुंदर जेवण रस्सम, आमटी ,कोबीची भाजी त्यानंतर छोले पण होते कर्नाटकी मसाल्याचे केलेले आणि कोशिंबीर होती , लोणचं होतं , सुंदर असं चवदार , वाटीत लावलेले गोड दही होतं आणि पोळ्या होत्या , रस्सम आणि भात होता आणि काला जामुन .. त्याच्यावर ताव मारला

त्याच बरोबर एका रिक्षावाल्याला गाठून त्याच्याबरोबर डील करून अख्ख बेळगाव दर्शन करून घेतलं त्या बेळगाव दर्शनाची सुरुवात आम्ही केली फोर्ट लेक या जागेपासून बेळगावचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या बरोबर समोर एक सुंदरसा तलाव आहे त्या तलावापासून सुरुवात केली प्रचंड मोठा तलाव आहे जवळपास दोन अडीच किलोमीटर त्याच्या भोवती चालणे होईल इतका मोठा आकार आहे आणि तिथे डायनासोर होते ( पुतळे) मी तिथे एका राक्षसाच्या डोळ्यांमध्ये थेट बोट घातली 🤪🤪🤪आणि मनाली सहित पॅनोरमिक फोटो पण काढला

 

 

 

त्यानंतर आम्ही गेलो मिलिटरी दुर्गादेवी मंदिरात हे आहे बेळगाव किल्ल्याच्या आत मध्ये जाताना लागणारे पहिलं देऊळ
मिल्ट्री च्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये हे देऊळ आहे त्यामुळे याला मिलिटरी दुर्गादेवी मंदिर असेच म्हणतात

       

त्यापुढे जाऊन कमल बस्ती नावाचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये महावीर जैन यांचे ते देवस्थान आहे खिद्रापूर सारखाच सभा मंडप आहे इथे त्याची आठवण झाली , त्याच्याच बाजूला रामकृष्ण मिशन चा आश्रम आहे तोही फार सुंदर स्वच्छ आहे.. बघण्यासारखा आहे

    

ते झाल्यानंतर आम्ही कपिलेश्वर म्हणून बेळगावातला एक अत्यंत जुने 1942 सालातले देऊळ बघायला गेलो त्या देवळामध्ये गणेश मंदिर आहे, नवग्रह मंदिर आहे ,सूर्य मंदिर आहे ,विष्णू मंदिर आहे त्याचबरोबर दत्त मंदिर आहे आणि कपिलेश्वर महादेवांचे मंदिर आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे larger than life असे श्री परशुराम आहेत त्यांचा ही आशीर्वाद घेऊन निघालो

          

 

नंतर आम्ही पुलं यांच्या रावसाहेब कथेतील त्या काळचे बेळगाव (जुना गाव भाग) बघायला आलो , बेळगाव कॅम्प मधील ब्रिटिश कालीन वसाहती ज्या भागात रावसाहेब राहत होते , रावसाहेबांचे डॉक्टर जिथे असायचे ते सिव्हिल हॉस्पिटल चन्नमा चौक , शाहपूर , RITZ talkies  नूतन चित्र मंदिर , प्रभात talkies  , काळाच्या ओघात आता खूप साऱ्या कथेतील खुणा नाहीशा झाल्या आहेत पण राव साहेब काय जगले असतील त्या काली याची एक कल्पना येऊ जाते हे मात्र खरे

आणि नंतर बेळगावच्या छत्रपती संभाजी महाराज चौकातून जुन्या आणि ट्रॅडिशनल खाडे मार्केटमध्ये फेरफटका मारायला गेलो आणि आपल्या पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये न दिसणारे दुकान इथे पहिल्यांदा दिसलं ते म्हणजे रामराज धोती आणि शर्ट चे दुकान

आपल्याला जाहिरातीमध्ये फक्त धोती आणि शर्ट एवढेच दिसतं पण इथे आहे. रुमालापासून पायमोजांपर्यंत सगळं. हाफ आणि फुल ट्राऊझर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट आहेत आणि बनियन आणि VIP सारख्या underweare / inner ट्रंक्स , टॉवेल्स पण आहेत , लुंगी आहेत म्हणजे पुरुषांसाठी अक्षरशः एका दुकानांमध्ये सगळी खरेदी होईल एवढं चांगलं आणि अत्यंत सुंदर क्वालिटी असणारे सगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि धोती आणि रामराज शर्ट ची तर खूप व्हरायटी , तिथे आमची थोडीशी खरेदी पण झालीच

बेळगाव शहरातील मिलिटरी महादेव मंदिर आणि मिलिटरी दुर्गा मंदिर ही दोन्ही ठिकाणं धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, विशेषतः लष्करी परिसराशी संबंधित असल्यामुळे त्यांचा एक वेगळा गौरव आहे.

मिलिटरी महादेव असं मंदिरही इथे एक आहे छान आहे हे मंदिरआणि त्याच मंदिराच्या आवारामध्ये मोठ्या मोठ्या पिंजऱ्यात ससे आहेत आणि बांधून काढलेल्या जागेत काळवीट आहेत , हरणं आहेत , बदक आहेत ससे आहेत असे काही प्राणी सुद्धा आम्ही बघितले       

अतिशय रम्य असा हा परिसर आहे याच परिसरात महाराज छत्रपती शिवाजी पुतळा ही आहे आणि आसपास महाराज्यांच्या महत्त्वाच्या किल्याच्या प्रतिकृती आहेत

🛕 मिलिटरी महादेव मंदिर
हे मंदिर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MLIRC) च्या परिसरात आहे., – मंदिर परिसर शांत, स्वच्छ आणि भक्तिभावाने भरलेला असतो.
येथे शिवतीर्थ तलाव आहे, ज्याचे नुकतेच नूतनीकरण झाले आहे. आणि महाराजांचे महत्वाचे किल्ले इथे प्रतिकृती म्हणून कायम स्वरूपात उभे केलेले आहेत , बघण्यासारखे आहेत नवरात्रोत्सव, महाशिवरात्र, आणि दुर्गामाता दौड यासारखे कार्यक्रम इथे आयोजित केले जातात.

🛕 मिलिटरी दुर्गा मंदिर
हे मंदिरही MLIRC परिसरातच आहे आणि दुर्गामाता दौड या कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे. , सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांबरोबर स्थानिक नागरिकही येथे भक्तिभावाने सहभागी होतात. , मंदिर परिसरात शिस्त, भक्ती आणि एकता यांचे दर्शन घडते. फोटो परमिशन नाही

ही दोन्ही ठिकाणं बेळगावच्या धार्मिक आणि लष्करी वारशाचे प्रतीक आहेत.

त्यानंतर आम्ही बघितलं विनायक मंदिर मिल्ट्री एरियाच्या पलीकडे जाऊन आंबोली रोड या रस्त्यावरती असणारं हे हिंदलगी जेल या रस्त्यावर असलेले हे मंदिर फारच सुंदर आहे

🛕 श्री विनायक मंदिर – हिंडलगा रस्ता, बेळगाव

– हे मंदिर हिंडलगा परिसरात, इंदलगी रस्त्यावर वसलेले आहे.
– मंदिरात स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे, ज्याला स्थानिक लोक अत्यंत श्रद्धेने पूजतात.
– परिसर शांत, स्वच्छ आणि भक्तिभावाने भरलेला असतो.
– गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, आणि इतर गणेश उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे होतात.
– मंदिराच्या परिसरात लष्करी वातावरणाची शिस्त आणि भक्तीचा संगम दिसतो.

आणि तिथून परत येताना आम्ही मिलिटरीच्या एरियातून फिरून आलो ज्याच्यामध्ये आम्हाला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट यांचं एरिया आणि ऑफिस सुद्धा दिसलं त्याचबरोबर मिल्ट्री एरियाच्या आतले छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंड अशा नावाचं ग्राउंडही बघितलं आणि काही मिलिटरीचे इन्स्टॉलेशन , रणगाडे तोफा बघत बघत आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो

आज सकाळी कोल्हापूर सोडल्यानंतर एका भन्नाट जाहिरातीने लक्ष वेधून घेतलं फोटो काढायचा राहिला पण त्या जाहिरातीची गंमत अशी होती… ही जाहिरात होती अविष्कार शौचालय अशी आणि त्याची टॅग लाइन …एकदाच बसवा आणि आयुष्यभर अनुभवा आणि वापरा ….काय टॅगलाईन कुठून शोधून काढली काही कळलं नाही पण वाचून आणि बघून भारी मजा आली. त्याचबरोबर त्याच्याखाली छोट्याशा अक्षरात लिहिलेलं होतं – भाड्याने मिळेल .    पण नक्की भाड्याने काय मिळणार आहे हे विचार करतांना भारी हसलो

लक्ष्मीपूजनासाठी बेळगावात केळीचे मोठे मोठे खांब म्हणजे अख्ख केळीच झाड च असे ते दुकानाच्या बाहेर सजवलेले असतात दोन्ही बाजूंनी आणि कर्नाटकातले आपले हिंदू भाऊ अशाप्रकारे याची पूजा करतात त्यांच्या एस्टॅब्लिशमेंटची आणि त्यांच्या व्यवसायाची , काही लोक अमावस्येला करतात तर काही लोक उद्या प्रतिपदेला सुद्धा करतात असे कळले

आणखी एक मज्जा बघितली ती म्हणजे कोल्हापूर बेळगाव diversion सर्विस रोड वरून जातांना रस्त्याच्या बाजूला एक पेरूचं दुकान होतं त्या पेरूच्या दुकानाच्या समोर एक ट्रक थांबला ट्रक वाल्याने पेरू घेतले आणि आमच्या काही वाहने पुढचा ट्रक त्याच्या बाजूला मागून येऊन दुसरा ट्रक थांबला
अख्खा ट्रॅफिक जाम त्या दोघांनी मिळून करून टाकला आणि एका ट्रक वाल्याने दुसऱ्या ट्रक वाल्या ड्रायव्हर कडे थोडे थोडे पेरू देऊन त्याला काय ते सांगत बसला होता , पेरू किती गोड आहेत का स्वस्त आहेत त्या बद्दल असणार .. मग मागचे लोक बोंबाबोंब करून हॉर्न वाजवून त्यांना बाजूला घ्यायला बहुतेक सांगत असावेत पण त्याचं काही लक्ष नव्हतं त्यांनी इकडचे पेरू तिकडे ट्रान्सफर केल्यानंतरच दोघेही आपापल्या मार्गाला लागले

काही फोटो काढलेले आहेत ते शेअर करतच आहे आता भेटूया उद्या संध्याकाळी बेळगाव ते धारवाड हुबळी चित्रकूट आणि चित्रकूट मधल्या KTDC मयूर दुर्ग मध्ये चेकिंग केल्यानंतर चित्रकूटच्या किल्ल्यावरती जाणार आहे उद्या बघू या दिवसभराची मजा

Day 1 ends

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}