कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 2

कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक )
आजचा दिवस म्हणजे बेळगावातून निघून चित्रदुर्ग व्हाया धारवाड आणि हुबळी
……तर सकाळी छान मस्त आवरून ब्रेकफास्ट झाला , सगळे कसे वेळेत च
ब्रेकफास्ट मध्ये भारी गोष्टी होत्या आयुष्यात पहिल्यांदा सकाळी साडेआठ वाजता रस्सम राईस खाल्लाय मी ब्रेकफास्ट मध्ये
त्याचबरोबर एक जंबो इडली म्हणजे डबल डेकर पेक्षा उंच इडली आणि मिनी वडे (पण आपले PYC वाले मिनी बटाटेवडे नाही) मिनी मेदुवडा त्याचबरोबर सांबार आणि रस्सम आणि फ्रेश चटणी , फ्रुट्स आणि चहा असा मस्त नाश्ता झाला पोटभर आणि साडेआठ वाजता आम्ही दोघे चित्रदुर्गच्या दिशेने निघालो




हायवेला लागेपर्यंत गुगलने कारण नसताना महत्त्वाचे रस्ते सोडून कुठून तरी गल्ल्या गल्ल्यातून हायवे ला आणलं…. पण ते काही बरोबर नाही वाटलं कारण छोट्या छोट्या रस्त्याने थोडीशी रिस्क जास्त असू असते पण ठीक आहे हायवे ला आलो म्हणून काय विषय नाही अदरवाईस प्रत्येकाने मात्र ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की मेन रोड असतील ना तिथे क्लिक करून गुगलने आपल्याला गाईड करण्यापेक्षा आपण त्याला सल्ला देऊन आपल्याला हवे तिथून नेलं पाहिजे , उगाच कारण नसताना गल्ल्यामधून जाणे काही गरजेचे नाही ते ही ट्रॅफिक नसतांना उगाच alternate रोड वरून तर नकोच .
हुबळी मध्ये शिरून मुडी हनुमंत देवस्थान या मंदिरापाशी जाण्यासाठी जो काही रस्ता आहे तो म्हणजे आपल्या पुण्यातल्या गल्ल्या प्रमाणे सांगायचं तपकीर गल्ली च्या आतल्या ज्या गल्ल्या आहेत म्हणजे पासोड्या विठोबा मंदिराच्या मागच्या लेनमध्ये जी तपकीर गल्ली आहे त्या तपकीर गल्लीच्या आत मधल्या ज्या लेन्स आहेत किंवा रविवार पेठ अशा लेनमध्ये मी चक्क चार चाकी गाडी घातली आणि जवळपास अर्धा किलोमीटरचा प्रवास मीच नाही पण लोकांनी सुद्धा जीव मोठे धरून केला असणार माझ्या बरोबर , कारण कुठल्या बाईकला गाडी लागू शकते , आपल्या मागे येणाऱ्या रिक्षाचे जोरजोरात हॉर्न मारून अवस्थ करतोय , आणि त्याचबरोबर चालणाऱ्या माणसांना वाचवत वाचवत आपली गाडी सुरक्षित ठेवत ही कसाबसा पलीकडे पोहोचलो आणि मोठ्या रस्त्याला लागलो.
हुबळी मध्ये मुडी हनुमंत देवालय अशा नावाचा एक मंदिर आहे खाजगी आहे आणि त्या मंदिराच्या बाबतीत असं सांगतात की तुम्ही त्या हनुमंता पाशी ची जी काही व्याधी असेल ती त्या हनुमंताला सांगितल्यानंतर बरी होते असा हा विश्वास आहे लोकांचा ..आम्हीही या हनुमंताचे दर्शन घेतले आणि संपूर्ण आरोग्य चांगलं राहावं याबद्दल हनुमानाचे आशीर्वाद घेतले

पाडवा असल्यामुळे तिकडचं मेन मार्केट ज्याला आपण क्लॉथ मार्केट म्हणतो किंवा वुमन्स रेडीमेड ड्रेस वेअर च मार्केट आहे ते बऱ्यापैकी बंदच होतं , त्याच्यामुळे आमचा शॉपिंगचा इरादा पूर्णपणे सोडून आम्हाला चित्रदुर्गकडे बाहेर पडून हायवेला लागून पुढे निघायला लागलं
रस्त्यावरती लागणारे बोर्ड आणि त्यावर टोल नाका किंवा अशा ठिकाणी असणारी नावे ही आपल्याला प्रत्येक गाव फक्त जिलब्या 🔗🔗🔗🌀🌀🔄🔃🔂🔁➰♾️➰♾️➰♾ ️याच नावाने ओळखता येत गावाची नाव काय कळत नाही , सगळ्या जिलब्याच वाटतात अशाच एका गावाच्या बाहेर एक प्रचंड मोठं रॉकेटसारखं उंच असणार महावीर जैन —- एक तयार होत असलेलं मंदिर किंवा देवस्थान दिसलं त्याचे फोटो आहेतच आणि त्याचबरोबर सांगण्यासारखी गोष्ट ही आहे की हुबळी पासून चित्रदुर्ग पर्यंत अख्या 190 किलोमीटरच्या हायवे वरती फक्त एकच डायव्हर्जन होतं अतिशय स्मूथ रस्ता आणि कुठेही रस्त्यामध्ये खड्डे नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची डायव्हर्जन नाहीत उगाच कुठे स्पीड ब्रेकर नाहीत आणि अत्यंत सुंदर असा हा रस्ता आहे
खूप मजा आली गाडी चालवायला पण .. आणि बाहेरचे दृश्य बघायला पण ..
हळळी आणि कट्टी अशी नावं वाचून फार मजा येते आणि ती इतकी मोठी नाव आहे ती (मराठीमध्ये वाचताना सुद्धा) म्हणजे हिंदीत असतात पण आपण वाचतो मराठी मध्ये तर ते वाचायच्या आधीच आपण स्पीडने पुढे निघून जातो त्यामुळे काही वेळेला गावांची नावे सुद्धा कळत नाहीत आणि काही काही गावांची नावे कळली त्याच्यामुळे ती हळळी आणि कट्टी आणि अशी काहीतरी होती त्यामुळे वाचून मजा येत होती ( गावातील घरांचा समूह, गावापेक्षा मोठा आणि शहरापेक्षा लहान; एक गाव
रस्त्याच्या बाजूला गहू / मका वाळवणे किंवा तत्सम काम चालू होतं आणि पाऊस आला तर काय करायचं तर त्यांच्याकडे सगळी ताडपत्री वगैरे होती ती तेवढ्या पुरेशी त्याच्यावरती ओढून घ्यायचे आणि पुन्हा आपलं काम सुरू करायचे असं शेतातून शेताच्या बाहेरच रस्ता असल्याने त्याच सर्विस रोडला हे सगळं काम सुरू होतं
हायवे वरून जाताना ते बऱ्याच ठिकाणी दिसत होतं सतत
एक कुठलीतरी , नदी लागली त्याचं नाव काय कळलं नाही. बहुतेक वेदावती , पण त्या नदीच्या आसपास असलेल्या झाडीमध्ये एक छानसा मोर सुद्धा आम्हाला दिसला
दावणगिरीला कामत रेस्टॉरंट नावाचा एक छानसे रेस्टॉरंट आहे तिथे साउथ इंडियन थाळी अशा नावाची एक चांगली डिश मिळाली याच्यामध्ये आणि ती भाकरी युक्त होती , त्यामुळे ज्वारीची भाकरी त्यानंतर नाचणीचं किंवा रागीच पीठ असलेलं सूप त्यानंतर सांबार ,रस्सम, एक आपल्या पिठल्याची वडी असते तशा टाईपचा काहीतरी एक खाद्यवस्तू होती आणि फ्रुट सॅलड मध्ये सांबार घाललेलं कसं लागेल अशा प्रकारचे एक फ्रुट सॅलड होतं त्याचबरोबर एक उसळ होती ती मात्र छान होती
छान होते जेवण
आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो दावणगिरी पासून चित्रदुर्गपर्यंत एक तासाच्या आत मध्ये चालू आणि बायपास वरून डायरेक्टली चित्रदुर्गच्या अशा ठिकाणी आलो की तिथे आल्यानंतर एक चौकामध्येच की युवर लोकेशन इज हिअर असं त्यांनी दाखवलं तर तो चौक म्हणजे इतका भन्नाट होता आपल्या आप्पा बळवंत चौकासारखा सगळ्या बाजूनी प्रचंड ट्रॅफिक आणि हॉर्न आणि भरपूर दुकाने रिक्षा , पोलिस गोंगाट आणि त्याचबरोबर प्रचंड गर्दी तर म्हटलं इथे कुठे राहायचं असा विचार डोक्यात चमकून आला पण तोपर्यंत हे कळलं की आमची चूक झाली लोकेशन फक्त चित्रदुर्ग टाकले असल्याने सिटी सेंटर ला आलो आणि तिथून आम्ही केटीडीसीच रिसॉर्ट जे आहे मयुरा दुर्ग नावाचं ते चित्रकुट चित्रदुर्गच्या किल्ल्याच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथून पुढे आणखी दीड दोन किलोमीटर वरती ते आहे तर तिथे आल्यावर मात्र मग आम्हाला खूप छान वाटलं गोंगाट नाही गर्दी नाही आणि एकदम हिरवेगार , रिसॉर्ट अतिशय सुंदर आहे अत्यंत मोक्याच्या जागेवर आहे आणि हिरवं गार भरपूर झाडी आणि छान अशा व्यवस्थित अपॉइंटेड रूम्स आहेत त्याचबरोबर जवळच असलेला किल्ला अगदी 100 मीटर वरती किल्ल्याचे एंट्री आहे तर किल्ल्यात जाणं आणि किल्ल्या बघणं हे पण अत्यंत सुखावह आहे आणि अतिशय मस्त किल्ला आहे बाहेरून नुसत्या दगडांनी किंवा दगड धोंड्यांनी असा मोठे मोठे दगड ज्याला म्हणतात पाषाण अशा स्वरूपाचे दगड असताना सुद्धा त्या दगडांच्या आत मध्ये एक इतकं सुंदर अखेर रेखीव मंदिर त्याच्यानंतर गार्डन त्याच्यानंतर कथक करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या एंटरटेनमेंट साठी असलेली जागा असं मिळून त्या कल्याचा किल्ल्याचा मोठा आकार आहे 16 km चा घेर असलेला किल्ला बाहेरून फारच छोटा वाटतो आणि अत्यंत छुपा असा हा किल्ला आहे
किल्याच्या तटबंदी च्या पहिल्या दरवाज्यावर नाग आहे आणि आत चढ आहे तिथे जातांना सर्व दरवाजे नागाच्या प्रमाणे च आहेत नागमोडी वळण घेत जात आपण वर जात जात किल्याच्या watch tower पर्यंत जात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ,मंदिरे ,गोपुरे , दीपमाळ आणि भक्कम तटबंदी टेहेळणी बुरुज (१९ आहेत ) ते पाहत पुढे पुढे जात राहतो
किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पहिले स्थान: कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये, वेदवती नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. बांधकाम: १०व्या शतकात बांधलेला असला तरी, १७व्या शतकात नायकांनी याचा विस्तार केला.
नाव: कन्नडमध्ये ‘चित्रकलदुर्ग’ म्हणजे ‘नयनरम्य किल्ला’ असा अर्थ आहे.
इतर नावे: ‘एलुसुत्तिना कोटे’ आणि ‘कलिनाकोट’ या नावांनीही ओळखला जातो.
रचना म्हणजे सात टेकड्यांवर सात दरवाज्यांनी आता जाणारा आणि ऐसपैस पसरलेला आणि अनेक बुरुज व तटबंदी असलेला हा एक मजबूत किल्ला आहे.
भेट देण्यासाठी वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 रोज
चित्रदुर्ग मध्ये आज जोरदार मस्त पाऊस झालेला आहे त्यामुळे हवा अशी मस्त गार गार झालेली आहे आणि आम्ही किल्ल्याच्या आत् मधले साथ दरवाजे ओलांडून बाहेर येत असताना तीन-तीन वेळा थांबायला लागलं कारण जोरदार पाऊस मध्ये मध्ये येत होता आणि अर्धवट असे भिजून आम्ही पुन्हा रिसॉर्टला आलो
रिसॉर्ट केटीडीसी च अतिशय सुंदर आहे शांत आहे आणि हवेशीर आहे त्याचबरोबर खूप सारे हिरवगार आहे आणि मेनू वगैरे मात्र स्टॅंडर्ड आहे काही एस अ स्पेशल कर्नाटकी डिश वगैरे असा इथे काही नाहीये पण ठीक आहे कारण रिमोट प्लेस असल्यामुळे असेल तसे काही.



आणि आज पुण्याहून पिंपरी चिंचवड आणि रहाटणी इथून आणि बेंगलोर हून आलेली खूप मराठी मंडळी आज इथे आहेत त्याच्यामुळे असं रिसॉर्ट अख्ख मराठी लोकांनी व्यापून टाकल्यासारखं आज दिसत आहे
चित्रदुर्ग हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण असून कर्नाटकातील एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. हे शहर १५व्या शतकातील “कल्लिना कोटे” किंवा “दगडी किल्ला” यासाठी प्रसिद्ध आहे. “कल्लिना कोटे” हे दोन कन्नड शब्दांपासून बनले आहे: “कल्लिना” म्हणजे “दगड” आणि “कोटे” म्हणजे “किल्ला”.
चित्रदुर्ग किल्ला हा कर्नाटकातील एक ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या अद्वितीय किल्ला आहे. त्याची वैशिष्ट्ये आणि इतिहास खालीलप्रमाणे:
🏰 चित्रदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्ये
– अभेद्य रचना , या किल्ल्याला सात स्तरांमध्ये केंद्रित भिंती आणि ३८ बुरुज आहेत, ज्यामुळे तो भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक मानला जातो.- प्राचीन मंदिरांची उपस्थिती: किल्ल्याच्या परिसरात १८ पेक्षा जास्त प्राचीन मंदिरे आहेत, ज्यामुळे तो धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे.
– विस्तीर्ण क्षेत्रफळ आहे , हा किल्ला सुमारे १६५० एकर क्षेत्रात पसरलेला आहे.
– दगडी बांधकाम: संपूर्ण किल्ला ग्रॅनाइट दगडांपासून बांधलेला आहे, ज्यामुळे त्याला “कल्लिना कोटे” म्हणजेच “दगडी किल्ला” असे नाव मिळाले आहे.
📜 इतिहास
– निर्मिती: किल्ल्याची सुरुवात १०व्या शतकात राष्ट्रकूटांनी केली होती. नंतर चालुक्य, होयसळ आणि विजयनगर साम्राज्याने त्याचा विस्तार केला. नायक वंश १५व्या ते १८व्या शतकादरम्यान भंगी किंवा वाल्मीकि नायक वंशाने किल्ल्याचा विकास केला.
– हैदर अली आणि ब्रिटिश: १७व्या शतकात हैदर अलीने किल्ला ताब्यात घेतला १८ वर्ष
आणि नंतर १८व्या शतकात ब्रिटिशांनी त्याचा ताबा घेतला.
चित्रदुर्ग किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक स्मारक नाही, तर तो शौर्य, अभियांत्रिकी कौशल्य आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.
चित्रदुर्ग किल्ल्यावर पार्वती देवीचे मंदिर आहे, एकनाथेश्वरी असे नाव आहे इथे पार्वतीचे नाव आणि त्या देवीला अक्का तंगि देवी या नावानेही ओळखले जाते. “अक्का” आणि “तंगि” म्हणजे मोठी आणि लहान बहीण — या नावाने दोन बहिणींच्या प्रतिमा किल्ल्यावर आहेत, ज्या पार्वतीच्या रूपात पूजल्या जातात.
या मंदिराचा उल्लेख किल्ल्याच्या धार्मिक स्थळांमध्ये केला जातो, आणि स्थानिक श्रद्धेनुसार देवीचे रूप रक्षणकर्त्या शक्तीचे प्रतीक मानले जाते.
रात्री चित्रदुर्गच्या केटीडीसी च्या रिसॉर्ट मध्ये लांब बसलं तरी सुद्धा फटाक्यांचे आवाज भरपूर येत होते आणि त्याच्याबरोबर रिसॉर्ट मध्ये बेडकांचे आवाज सुद्धा भरपूर होते.
अशा छान रिसॉर्टमध्ये राहून आजचा दिवस आम्ही आता संपत आहोत आणि उद्याचा आमचा प्रवास असेल चित्रकूट हिरीयूर ते म्हैसूर वाया रंगनाथ स्वामी टेम्पल
बाय बाय
