कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 3

कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 3
कर्नाटक ट्रिप दिवस तिसरा
आज सकाळी चित्रदुर्गहून निघून आम्ही म्हैसूर कडे येण्याचा प्लॅन केलेला आहे त्या दृष्टीने सकाळी उठून बाहेर बघितलं तर बाहेर छान धुकं होतं , ढग होते आणि पाऊसही थोडासा पडून गेलेला होता , रात्रभरात त्याच्यामुळे सगळीकडे ओलं आणि असं फ्रेश छान वाटत होतं , थंडगार होतं आणि फक्त टाउन थोडसं स्लीप इट ऑन Type आहे , त्याच्यामुळे साडेसातला सांगितलेला ब्रेकफास्ट सव्वा आठ ला मिळाला आणि नऊ पर्यंत आवरून आम्ही सगळे बाहेर पडलो

डोसा आणि वडा सांबार असे स्नॅक्स आम्ही सकाळी घेतले पण त्या स्नॅक्समध्ये थोडासा विषय असा होता की त्याच्यात कशातच मीठ नव्हतं आणि एकाच वेळेला एवढी गर्दी आली सगळेच्या सगळे लोक एकाच वेळेला ब्रेकफास्ट ला आले त्याच्यामुळे त्या हॉटेल वाल्याची धावपळ झाली आणि कोणाची डिश कोणाला , कोणाचा डोसा उशिरा तर कोणाचा लवकर पण न सांगितलेलाच , शेवटी मला काउंटरला जाऊन दोनदा वस्तू उचलून आणायला लागली इथपर्यंत झाल्यावर चहा पण असाच काउंटरला जाऊन उचलून आणायला लागला ते झाल्यानंतर आम्ही आपले पटकन निघालो आणि मैसूरच्या वाटेवर लागलो, थोडा उशीर झाला होताच पण म्हटले कव्हर करू विमान चालवून .
Resort of KTDC
मैसूरच्या रस्त्यावरती एक पिक्युलर अशी एक जाणीव झाली की नारळाची आणि पोफळीची प्रचंड झाड रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत म्हणजे आपण म्हणतो की हे कोकणातच नारळाची झाडं होतात तर असं काही नाही कर्नाटकामध्ये देशावरती सुद्धा , कारण समुद्रकिनाऱ्यापासून चित्रदुर्ग जवळपास 200 किलोमीटर आत मध्ये आहे तर एवढ्या लांब सुद्धा ही झाडं तिकडचं जे काही हवामान आहे त्या हवामानामुळे नारळी पोफळीची झाडं प्रचंड होती हिरवा गार असा निसर्ग बघत आणि चांगल्या रस्त्याने आम्ही ट्रॅव्हल करत होतो मध्येच थोडासाच पॅच फक्त हा खराब आहे तिथे कर्नाटक सरकार चां मोठ्याने उद्धार पण केला , ज्याच्यामध्ये रस्त्याचं काम थोडं चालू आहे म्हैसूर ते चित्रदुर्ग या रस्त्याचं अर्धवट काम आणि काही ठिकाणी रस्त्याखालून जाणारे पाईप वर जे सिमेंट चे बांधकाम करतात ते इथे उंच की जास्त स्पीड ने गाडी नेली तर विमानासारखी टेक ऑफ पण करेल अशी अपेक्षा ही करायला हरकत नव्हती .. पण अजून खूप कर्नाटक पहायचे असल्याने आम्ही टेक ऑफ न घेता. Runway वर टॅक्सिंग करत तो पॅच पार पाडला

इकडची गावांची नावे मात्र भन्नाट आहेत रस्त्यावरती वाच जाता जाता आपल्या स्पीडला ते वाचता येत नाहीत आणि काही वाचता आली थांबून वाचली किंवा स्लो करून वाचली तर ती इतकी छान छान वाटायची , एक चिकनयाकनहळी, दुसरे डबेघट्टा, अजून एक थाराबीनहळी. अजून एक बुट्टगालाकुटे आणि समरंनहळी आणि हळी कुट्टी किंवा कट्टे हे भारी प्रत्येक गावाला जोडलेलं म्हणजे ते गावातच आपण ज्याला रामगाव आडगाव म्हणतो तसे ते गाव असं असावं असं आता कळायला लागले होते पण शेवट त्या जिलब्याच होत्या
पुन्हा जेव्हा मी म्हैसूरच्या जवळ जवळ यायला लागलो तेव्हा रस्ता एकदम सुधारला आणि सुसाट स्पीडने बराच वेळ कव्हर करत एक्सपेक्टड time प्रमाणे आम्ही डायरेक्ट श्रीरंगपट्टणमचा कट घेऊन श्रीयुत टिपू सुलतान यांच्या घरी पाहुणे म्हणून पोहोचलो , टिपू सुलतान पॅलेस आणि श्री रंगनाथ स्वामी मंदिर म्हणजेच विष्णू मंदिर बघायला श्रीरंग पट्टणम मध्ये दाखल झालो
एक गाईड घेतला श्रीनिवासन नावाचा ( हिंदू ) आणि त्या गाईडने आम्हाला त्याच्या बाईक वरती आमच्या पुढे राहून प्रत्येक ठिकाणी नेऊन त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये टिपू सुलतान जिथे मारला गेला ती जागा , त्याच्यानंतर टिपू सुलतान चे मृत्यू स्थळ नंतर वॉटर गेट नावाचा इथे एक गुप्त दरवाजा आहे ज्याच्या मधून श्रीरंगपट्टणम मध्ये फितुरी केल्यानंतर इंग्रज सैन्याला आत येण्यासाठी जागा ज्यांनी करून दिली तो मीर सादिक का मीर जाफर का असं काहीतरी नाव आहे तर त्याने ही जागा दाखवून या जागेतून इंग्रजांना श्रीरंगपट्टणममध्ये प्रवेश दिला
Water gate Wooden Door

टिपू सुलतान च्या आधीचे जे राजे होते विष्णुवर्धन / वरदवर्धन वगैरे अशी काहीतरी नाव होती त्यांची तर त्या राजांनी तटबंदी बांधलेला पूर्ण साडेचार किलोमीटर ची तटबंदी आम्ही पाहिली त्याचबरोबर दुसरी एडिशनल तटबंदी फ्रेंच दोस्तांनी टिपू सुलतान ला बांधून दिलेली होती आणि ते बघून आम्ही पुढे गेल्यानंतर पुढे एक जेल आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक कैद्याला अधांतरी टांगून ठेवण्याची दगडाला बांधून असं टांगून ठेवण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे तर तिथे त्या कैद्यांना बांधून ठेवून शिक्षा द्यायचे आणि अशी तिथे चार का पाच इंग्रज कैद्यांना दिलेली शिक्षेची जागा आहे कॅप्टन बेली नावाच्या एका शिक्षा दिलेला कॅप्टनचंच नाव तिथे आता दिलेला आहे
Jail situation
Jail 14 feet lower than normal garden level , water level just below
Fortification

त्यानंतर आम्ही छान पैकी एकदम फ्रेश आमच्या समोर काढलेला उसाचा रस घेतला , इतकी नारळाची झाडे असून सुद्धा शहाळे कारण नसतांना ७० रु का असा प्रश्न पडल्यावर प्यायलेला उसाचा रस अजून गोड लागला .
थोडासा ब्रेक घेऊन आम्ही टिपू सुलतान चा राहण्याची जागा ज्याला टिपू सुलतान महाल म्हणतात ती जागा बघायला गेलो सगळं पडलेलं असं ते बांधकाम आहे इंग्रजांनी टिपू सुलतानाचा वध झाल्यानंतर टिपू सुलतानाच्या बायका आणि त्यांची मुलं त्याची सात मुले आहेत, त्यापैकी पाच जण त्याच घरात असताना इंग्रजांनी तोफ गोळ्यांनी हे महाल सदृश घर जे दुमजली होतं ते पूर्णपणे उध्वस्त करून टाकले त्यात त्या सगळ्या जणांचा मृत्यू झाला आणि आत्ताचे जे त्यांचे वंशज आहेत ते कुठल्या तरी कर्नाटकातल्या पॉलिटिकल पार्टीशी कनेक्टेड असून ते आपापले रॉयल चॅनेल चे काम करत आहेत असे कळते

श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यावर १७९९ साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात इंग्रजांनी किल्ल्यावर हल्ला करून टीपू सुलतानाचा पराभव केला. या युद्धात इंग्रजांना किल्ल्यात प्रवेश मिळवून देण्यासाठी एका व्यक्तीने फितुरी केली होती.
फितुरी करणारा व्यक्ती: मीर सादिक
मीर सादिक हा टीपू सुलतानाचा एक विश्वासू मंत्री होता युद्धाच्या वेळी त्याने इंग्रजांशी गुप्त संधान साधले आणि त्यांच्या फायद्यासाठी माहिती पुरवली.
असे मानले जाते की त्यानेच इंग्रजांना वॉटर गेट (पाण्याचा गुप्त दरवाजा) वापरून किल्ल्यात प्रवेश मिळवून दिला. कारण काय तर इंग्रजांनी याला राजा करू असे अमिष दाखवले तो हि नंतर फुतुरीमुळे बाराच्या भावात गेलाच असणार पण त्यावेळी या फितुरीमुळेच इंग्रजांना किल्ला आतून ताब्यात घेणे शक्य झाले आणि टीपू सुलतान युद्धात मारला गेला.
वॉटर गेटचे महत्त्व- वॉटर गेट हा किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरला जाणारा एक गुप्त मार्ग होता, जो कावेरी नदीकडे उघडत असे.
इंग्रजांनी याच मार्गाचा वापर करून अचानक हल्ला केला आणि किल्ल्याचा ताबा घेतला.
आजही श्रीरंगपट्टणममध्ये वॉटर गेटचे अवशेष पाहायला मिळतात आणि ते इतिहासप्रेमींसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहे.
त्यानंतर आम्ही रंगनाथ स्वामी मंदिर बघायला गेलो

श्रीरंगपट्टणममधील श्री रंगनाथस्वामी मंदिर हे कर्नाटक राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर कावेरी नदीच्या किनारी वसलेले असून भगवान विष्णूंच्या रंगनाथस्वामी या रूपाला समर्पित आहे. येथे काही महत्त्वाची माहिती:
मंदिराची वैशिष्ट्ये ही शैली: द्रविड वास्तुकला या प्रकारची आहे
विशेषता: भगवान विष्णू येथे शेषनागावर विश्रांती घेतलेल्या अवस्थेत विराजमान आहेत. मंदिराचे बांधकाम ११व्या शतकात होयसळ राजवटीत झाले असे मानले जाते. टीपू सुलतान आणि हैदर अली यांच्या काळात मंदिराला संरक्षण मिळाले होते. हे मंदिर वैष्णव संप्रदायाचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
श्रीरंगपट्टणम हे पंच रंग क्षेत्रांपैकी एक आहे (इतर चार: श्रीरंगम, शिवसमुद्रम, तिरुवेळ्लारै, आणि वेल्लूर).
येथे दरवर्षी रथोत्सव आणि वैष्णव उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.
मंदिर परिसर. मंदिरात गोपुरम (प्रवेशद्वार), मुख्य गर्भगृह, आणि उत्सव मंडप आहेत.
परिसरात अन्य देवता आणि पवित्र असा छोटा तलाव आणि हिरवी गार अशी एक बाग देखील आहेत.

त्यानंतर आम्ही टिपू सुलतान च्या समर र पॅलेस बघायला गेलो तिथे आता ऍक्च्युली म्युझियम केलेला आहे पण श्रीरंगपट्टणमच्या लढाईचा चित्रामधून वर्णन अतिशय सुंदर रित्या रेखाटलेला आहे टिपू सुलतान ची हत्यार , जांभिया, इंग्रजांनी वापरलेली त्यावेळच्या बंदुका गोळ्या वगैरे अशा सगळ्या वस्तूंचे तिथे डिस्प्ले आहे त्याचबरोबर खूप मोठं आवार आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर रित्या मेंटेन केलेली गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये प्रचंड मोठे मोठे वृक्ष आहेत की ज्याचा खोड कमीत कमी 50 – 50, 60 फूट असावं इतकं मोठे मोठे ते खोड आहेत आणि घेर तर आमच्या राहत्या फ्लॅट च्या अर्धा असा एव्हढा होता


दुपारचं जेवण त्यानंतर आमचं सुखसागर नावाचा तिथे एक हॉटेल आहे तिथे झालं
त्यानंतर आम्ही आलो म्हैसूर मध्ये आणि कर्नाटक स्टेट टुरिझम डिपार्टमेंटचं मयुरा होईसळ अशा नावाचं एक सुंदर प्रॉपर्टी मध्ये राहिला मिळाले रूम्स अतिशय सुंदर आहेत , वेल अपॉइंटेड आहेत आणि रेनोवेटेड आहेत त्याचबरोबर छान रित्या मेंटेन केलेलं गार्डन रेस्टॉरंट आणि सर्व सोयी व्यवस्थित आहेत रूममध्ये त्याच्यामुळे स्टे एकदम कम्फर्टेबल झाला
संध्याकाळी थोडंसं मैसूर फिरावं आणि कर्नाटक स्टेट सिल्क आणि असलं काही काही थोडेसे शॉपिंग कराव या निमित्ताने आम्ही बाहेर पडलो तर कर्नाटक कावेरी सिल्क म्युझियम अशा नावाचं , अशी चैनशॉप त्यांची दुकान आहेत त्याच्यामध्ये थोडसं शॉपिंग झालं त्याचबरोबर, चंदनाच्या काही वस्तूही मिळाल्या आणि त्या घेतल्या , आवडल्या , खूपच चांगल्या आहेत , किंमत काही विचारू नका , शॉपिंग हे समाधानासाठी केले जाते किंमत बघून नाही अश्या मताचा मी त्या दिवशी होतो आणि नळ सुरु होता तर जरा हात पाय तोंड मी पण धुवून घेतले बर्का ..
आणि त्यानंतर पाकशाला नावाचं एक ट्रेंडी आणि अप मार्केट असं रेस्टॉरंट आहे ज्या रेस्टॉरंट मध्ये आम्हाला जेवायचं म्हणजे थाळी म्हणून जेवायची नव्हती लोकल म्हैसूर specialty हवी होती त्यामुळे आम्ही छान वेगवेगळ्या प्रकारचे डोसा आणि त्यात घी पोडी मसाला डोसा अशा नावाचा एक प्रकार मिळाला म्हणजे पावडर घातलेला मसाला डोसा अशा प्रकारच्या दोन दोन डिश झाल्या त्यानंतर मात्र जी डिश मी खाली ती म्हणजे अप्रतिम डिश होती — व्हॅनिला आईस्क्रीम थंडगार आणि काला जामुन रसासकट गरम गरम असा तो एक थाट आमच्या समोर त्यांनी आणून ठेवला आणि ते खाऊन खरोखर म्हणजे मन तृप्त झालं

आता उद्या लोकल म्हैसूर दर्शन आणि वृंदावन गार्डन असा प्लॅन आहे , गुड ना ?
उपेंद्र पेंडसे

