कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 5
कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक )
Day 5
आज सकाळी लवकर नेहमीसारखा उठून आवरून ब्रेकफास्ट करायला गेलो आजचा ब्रेकफास्ट सुद्धा मस्त होता इडली डोसा वडा आणि शेवयांची शेवयाचा उपमा आणि रव्याचा शिरा असे चार-पाच गोष्टी होत्या सगळ्याची थोडी थोडी टेस्ट करून , आम्ही गाडी वगैरे तोपर्यंत धुवायला सांगितलेली होती आणि बिलिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही उटीला जायला निघालो
मैसूर मधले लोकल बसचे बस स्टॉप छान असे व्यवस्थित डिझायनर असे केलेले आहेत आणि उभा राहिला जागा भरपूर त्याच्यानंतर प्रत्येक बस स्टॉपला शेड चांगली आहे आणि फुटपाथ वगैरे असा व्यवस्थित केलेला वाटला त्याच्यामुळे जरा बरं वाटतं बघायला
त्यानंतर पुढे जे एस एस नावाचं एक हॉस्पिटल आहे ऍक्च्युली लांबून पाहताना छान असं ते राजवाड्यासारखं वाटतं आणि पुढे गेल्यानंतरच आपल्याला कळतं की ते हॉस्पिटल आहे पण अशा प्रकारच्या राजवाड्यासारखा l हॉस्पिटलचा जर फील असेल तर पेशंटला नक्कीच तिथे बरं वाटेल आणि पॉझिटिव्हिटी खूप येईल असं बाहेरून पाहून वाटले
मैसूर सोडता सोडता मार्बलची अशी एकापेक्षा एक प्रचंड मोठे मोठे दुकान अशी लाईनीने कमीत कमी शेकडो दुकान होती कदाचित इथे मार्बलचं काहीतरी हे असावं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग तरी असावं किंवा तयार होत असावा कुठेतरी त्याच्यामुळे इथे प्रचंड मार्बलची दुकान होती आणि खूप मोठे मोठे मार्बल म्हणजे आपण दोन फूट बाय दोन फूट , ३ x ३ च्या टाईल्स बघतो पण इथे 20 20 25 फुटाचा सुद्धा सिंगल मार्बल होते
मैसूर मधून बाहेर पडताना मैसूर एअरपोर्टचा हा रस्ता आपल्याला लागतो गुंडलपेट पर्यंत जायला आणि ह्या रस्त्यावरती म्हणजे केरळचा फील ऑलरेडी किंवा तामिळनाडूचा फील ऑलरेडी यायला लागलेला होता कारण प्रचंड अशी केळ्यांची झाडं तू रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली होती
गुंडल पेट मार्गे जायचा तीन सव्वातीन तासाचा साधारणपणे जर्नी म्हणून दाखवत होता आणि वाटेमध्ये मधुमलाईच फॉरेस्ट होतं तिथे आमचे दीड दोन तास जाणार होते सो पाच सहा तासाचा ओव्हरऑल प्रवास पण किलोमीटर काहीच नाही जेमतेम सव्वाशे दीडशे किलोमीटर एवढेच प्रवासाला छान सुरुवात ही झाली आणि चांगला मस्त रस्ता आहे
गुंडल पेट पर्यंत अगदी आरामात आलो , 50 60 किलोमीटर त्याच्यानंतर पहिल्यांदा बंदीपूरचं जंगल लागलं आणि बंदीपूर हे एका एंड च गेटचं नाव आहे आणि दुसऱ्या एन्ड चे नाव आहे मधुमलाई , मला वाटत तामिळनाडूची बॉर्डर पण लागते आणि त्याच्या आधी मधुमलाईचे जंगल सुरू होतं मधुमलाईच्या जंगलामध्ये आम्हाला खूप सारे प्राणी दिसले एक काळवीट दिसलं त्याच्यानंतर खूप सारी हरणं होती आणि चक्क एक हत्ती बघायला मिळाला
ते बघून आम्ही मधुमालाच्या जंगलामध्ये जंगल सफारी करायला निघालो त्याच्यात सुद्धा खूप सारी काळवीट आणि हरण आम्हाला बघायला मिळाली पण बाकी काही तसं बघायला मिळाले नाही कारण एक तर थोडीशी वेळ आमची चुकलेली होती आणि ज्या भागात गेलो त्या भागामध्ये सकाळी टायगर स्पॉट होऊन गेलेला होता त्याच्यामुळे तिथे टायगर के परत आम्हाला मिळाला नाही

त्यांनी ऑफरोडींग करण्यासाठी आम्हाला एका जीपमध्ये बसवून एका मस्त जागी नेलं ती जागा म्हणजे तीन स्टेट चा बॉर्डर तिथे मिळते म्हणजे कर्नाटक त्याच्यानंतर तामिळनाडू आणि केरळा अशा तीन स्टेट ची बॉर्डर तिथे मिळते तर ती जागा बघून तिथे एक देऊळ आहे ते बघून आम्ही मग जंगल सफारीला गेलो दीड एक तासाची जंगल सफारी करत बरच काय काय शोधत होतो पण हरणांशिवाय दुसरं काही दिसलं नाही पण हरण छान मिळाली , भरपूर हरण बघायला मिळाली त्यानंतर जिथे टायगर सफारी एंड झाली आणि आम्ही रिटर्न यायला निघालो तो भाग म्हणजे वीरप्पांच्या जंगल याचा चंदनाच्या जंगल तस्करीचा भाग तिथून सुरुवात होते आणि त्याच्या पलीकडे कोअर जंगल आहे तर तिथे जायची काही परमिशन आपल्याला नसते त्याच्यामुळे आम्ही तिथून परत आलो आणि आमची गाडी घेऊन आम्ही उटी कडे निघालो
36 हेअर पिन बेंड असणारा आणि प्रचंड चढ असणारा रस्ता हा उटीचा रस्ता अत्यंत कठीण असा चढ म्हणजे अशा प्रकारचे चढ आणि अशा प्रकारचा रस्ता मी आयुष्यात पहिल्यांदा क्रॉस करून आलो , जमला व्यवस्थित . कुठेच काही प्रॉब्लेम आला नाही पण काही गाड्यांची वाटेमध्ये बोनेट उघडून बसलेले ड्रायवर owner असे दिसत होते , कोणाचा काही प्रॉब्लेम झालेला होता गाडी raise झाल्यामुळे आणि मग थोडासा काहीतरी विषय होतो कोणाचा इंजिन गरम होऊन. आणि गाड्या थांबायला लागल्या आणि मेन्टेनन्स चांगला नसला कि असे होते किंवा ड्रायविंग स्किल्स कसे त्या वर अवलंबून असते
आमच्या wagonR गाडीला काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि आम्ही फर्स्ट , गिअर सेकंड गियर करत छान व्यवस्थित वर आलो , आरपीएम कमी ठेवला त्याच्यामुळे गाडी कुठे गरम झाली नाही आणि मस्त वर आली ७८०० फूट
कड क थंडी आहे आम्ही येत असतानाच २४ चे १८ असे temp drop झाले त्यावरून थंडी रात्री मस्त पडणार आहे त्याची मज्जा मस्त घेता येईल याची खात्री झालीच
उटी मध्ये आल्यानंतर कर्नाटक टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच एक सुंदरच रिसॉर्ट आहे इथे मयुरा सुदर्शन या नावाने आणि त्याच्या खाली जवळपास 45 एकरची त्यांची गार्डन आहे जी हॉर्टिकल्चर आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर्नाटकचे इको उद्योग त्याच्यामध्ये आहेत


आज कुठली ट्रिप अशी आम्ही ठरवलेली / केलेली नव्हती त्याच्यामुळे आज लोकल खूप फिरलो लोकल मार्केट बघितलं त्याच्यानंतर खूप साऱ्या दुकानांमध्ये जाऊन छोटी-मोठी खरेदी केली पण लोकल खरेदी होती , कुठलाही ज्या वस्तू मुंबई पुण्यामध्ये किंवा अशा ठिकाणी मिळतात, त्यांना इथे आम्ही हात नाही लावला आणि कम्प्लीटली लोकल खरेदी कॉफी बघितली , लोकल कॉफी त्याच्यानंतर युकॅलिप्टस आणि वेगवेगळ्या प्रकारची ऑइल त्याच्यानंतर लोकल बिस्किट आणि काही लोकल सुवेनीयर्स अशी सगळी छोटे-मोठी खरेदी झाली
चाय वाले नावाचं एक छान जॉईंट आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी मसाला चहा पीत बसलेलो होतो बराच वेळ त्याच्याच बरोबर खाल्लेल्या लोकल कुकीसची चव अजूनही जिभेवरती रेंगाळत आहे आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी मार्केटमध्ये चक्कर मारून येताना एक ऑटो करून आमच्या रिसॉर्टला परत आलो
गाडी नेलीच नव्हती जातानाही ऑटो केली आणि येतानाही ऑटो करून आलो कारण तिथे पार्किंग हा मोठा विषय आहे त्यामुळे गाडी पार्क करणे हे अत्यंत जिकिरीचं काम आहे उटीच्या मेन रस्त्यांवर त्यामुळे कुठेही गाडी न घेताच फिरण्याला जास्त बरं
कडकथंडी आहे इथे एकदम छान वातावरण फ्रेश हवा आणि मस्त क्लिअर स्काय
और क्या चाहिए
उद्या कुन्नूर डे ट्रिप
उपेंद्र पेंडसे
