कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 10

कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक )
Day 10
काल रात्री मस्त झोप लागली दमूनही आलेलो होतो आणि थंडगार हवा आणि सुंदर दरी चे दृश्य दुरवर दिसणारे lights बघत रात्री कधी झोप लागली तेच कळलं नाही
सकाळी डायरेक्ट सात वाजता जाग आली आणि आवरून आम्ही पावणे नऊला ब्रेकफास्ट ला गेलो आणि सव्वा दहाला साडे दहा ला तळ कावेरी म्हणजे कावेरी नदीचा उगम बघायला हॉटेलमधून बाहेर पडलो
ब्रेकफास्ट एकदम मस्त होता इडली वडा त्याच्यानंतर शिरा आणि सांबार अतिशय सुंदर सांबाराबरोबरची चटणी एकदम फ्रेश आणि त्याचबरोबर आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चहा विदाऊट शुगर सुद्धा छान लागत होता मी खूप दिवसांनी आणि असा ट्राय केला आणि मला आवडला … तर तो घेऊन आम्ही बाहेर पडलो
तळ कावेरी जवळपास 44 किलोमीटर आहे इथून आणि छान आहे रस्ता अतिशय सुंदर
कूर्ग जिल्ह्याचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे जगातला सर्वात जास्त हिरवा गार असलेला हा जिल्हा आणि कुठेही असं मोकळं ग्राउंड घर नसेल तर दिसतच नाही अदरवाईज सगळ्या ठिकाणी एकतर हिरवी शेती तरी आहे किंवा झाड तरी अतिशय सुंदर असा हा जिल्हा आहे
सर्वांनी एक लक्षात घ्या की कूर्ग अशी कोणतीही जागा नाही कूर्ग कोडगु हे एक ठिकाण नाही हा एक जिल्हा आहे , कोडगु ही येथील एक संस्कृती आहे कूर्ग नावाचे गाव /शहर/ हिल स्टेशन असे इथे काहीही नाही , कूर्ग जिन्ह्याचे कॅपिटल मडिकेरी आहे ..आणि लोक जेव्हा कूर्ग ला गेलो असे म्हणत असतात तेव्हा ते मडिकेरी इथेच येतात त्यामुळे l कुर्ग आणि मडिकेरी हे वेगवेगळे हिल स्टेशन्स आहेत ही चुकीची बाब डोक्यातून काढून टाका
आणि त्या जिल्ह्याच्या इतक्या डीप (इंटरियर्स) मध्ये जाऊन आम्ही कावेरी चा दर्शन घ्यायला निघालो होतो वाटेमध्ये खूप छान छान छोटी छोटी गावाला लागली अशी २० ५० १०० घरांची वस्ती अगदी आपल्या कोकणातील गावे असल्याचा फील येत राहिला इथे असलेली अशी छोटी छोटी गाव पण सोयी चांगल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेही मोबाईलची रेंज एफ्फेक्टड नाही सगळ्या ठिकाणी मोबाईलची रेंज आहे
ऑफ कोर्स मी जिओचा बोलतोय सो छान सगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळत गेली आणि शेवटी एक तीन चार किलोमीटर ला मोठा घाट चढ आहे एकदम ब्रह्मगिरी डोंगरावर जायला , आहे कावेरी नदीच्या उगमापाशी जायला आणि तिथे जाताना प्रचंड धुकं म्हणजे दहा मीटर सुद्धा दिसत नाही इतकं प्रचंड दाट धुके असं त्या भागात आहे
तिथे हेडलाईट ब्लिंकर्स असे सगळं चालू ठेवून हळूहळू , हळू हळू जात गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्यानंतर गाडीतून उतरून आम्ही तळ कावेरी कडे चालायला लागलो , थंड तर होतच , वाराही जोरदार आणि धुकही मस्त अशा हवेत कावेरी नदीच्या उगमाचे दर्शन करण्यासाठी आम्ही गेलो
ते एक मंदिर आहे , एक हौद आहे त्याच्यासमोर कावेरी नदीची देवी म्हणून एक प्रतिमा आहे तिथे सगळेजण पूजा करतात आणि त्या हौदामध्ये स्नान करण्याची सुद्धा सोय आहे त्याच्यानंतर पुढे कावेरी नदीचं मंदिर आहे कावेरी नदीच्या मंदिरापाशी कावेरी नदीचा उगमस्थानी म्हणजे तळ कावेरी येथे मुख्यतः श्री कावेरी अम्बा मंदिर आणि अग्निश्वरा किंवा अगस्थेश्वर मंदिर आहेत. हे दोन्ही मंदिर ब्रह्मगिरी पर्वतावर वसलेले आहेत आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जातात.
तळ कावेरी हे कर्नाटक राज्यातील कोडागू (कूर्ग) जिल्ह्यात ब्रह्मगिरी पर्वतावर वसलेले आहे. येथेच कावेरी नदीचा उगम मानला जातो, जरी काही भूगर्भशास्त्रज्ञ नदीचा खरा उगम थोडा वेगळ्या ठिकाणी मानतात. धार्मिक दृष्टिकोनातून तलाकावेरी हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
तळ कावेरी परिसरातील प्रमुख मंदिरे:

– 🛕 श्री कावेरी माता मंदिर
हे मंदिर कावेरी देवीला समर्पित आहे. येथे एक पवित्र कुंड आहे ज्यातून कावेरी नदीचा उगम मानला जातो. दरवर्षी तुला संक्रांतीच्या दिवशी येथे विशेष पूजाअर्चा केली जाते आणि कुंडातून पाणी उसळते, ज्याला भक्त पवित्र घटना मानतात.
– 🔥 अगस्तेश्वरमंदिर
हे मंदिर अग्नि देवतेला समर्पित आहे. कावेरीच्या उगमस्थानी अग्नि आणि कावेरी यांचा धार्मिक संबंध मानला जातो. येथे अग्निश्वरा आणि कावेरी देवीची संयुक्त पूजा होते.
ब्रह्मगिरी पर्वतावर ती कावेरी नदीचा हा जो उगम आहे हा अत्यंत सुंदर जागी आहे आणि नुसतीच छोटीशी धार वगैरे काही नाही चांगला मोठा फ्लो आहे पाणी कुठून येतं काही कळत नाही पण प्रचंड पाणी आहे आणि सुरुवातीपासूनच कावेरी नदीचं एक मोठं रूप आपल्याला तिथेच बघता येतं
ते बघून येताना आम्ही भागमंडला नावाच्या एका ठिकाणी आलो तिथे त्रिवेणी संगम आहे तिथे कावेरी कनिका आणि सुज्योती अशा तीन नद्या एकत्र येऊन मिळतात ती जागा म्हणजे ही त्रिवेणी संगम – भागमंडला
– 🕉️ भगमंडला मंदिर समूह (थोड्या अंतरावर)
तलाकावेरीपासून काही किलोमीटरवर भगमंडला नावाचे एक तीर्थक्षेत्र आहे, जिथे कावेरी, कनिका आणि सुज्योती या तीन नद्यांचा संगम होतो. येथे भगमंडलेश्वर मंदिर आहे, जे शिव आणि अन्य देवतांना समर्पित आहे.
या परिसरात निसर्गसौंदर्य आणि धार्मिक वातावरण यांचा सुंदर संगम आहे. तलाकावेरीला भेट देताना भक्त आणि पर्यटक दोघेही या मंदिरांना भेट देतात आणि कावेरीच्या उगमस्थानी स्नान व पूजाअर्चा करतात.
ते करून आम्ही संध्याकाळी परत आलो मडेकरीला आणि आज ढगाळ हवा आहे पाऊस कुठे पडलेला नाही पण थंडी बऱ्यापैकी कमी झाली आणि आता 18 19 डिग्री टेंपरेचर आहे रात्रीपर्यंत 14 15 पर्यंत येईल सो अशा रीतीने आजचा हा दिवस आमचा फार छान झाला आणि फोटो बरोबर कावेरी नदीच्या उगम आणि गोमूख त्याचबरोबर कावेरी नदीचा मंदिर याचे फोटो शेअर करत आहे
=============================================================
थोडे मनातले — एक मोठा योगायोग त्यानिमित्ताने जमून आला
गंगा , यमुना , गोदावरी, सरस्वती , नर्मदा , सिंधू , कावेरी पवित्र सप्त नद्या भारतीय उपखंडातील
((गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेतस्मीन सन्निधी कुरू))
कैलास मानस पहिल्या वेळी करतांना सिंघू उगम 2006
गोमुख तपोवन नंदन वन ट्रेक रक्तवर्ण ग्लेशियर गंगा गोमुख आणि त्याच्या हि पलीकडे 1986
चार धाम पैकी यमुनोत्री यमुना 1986
अमरकंटक मा नर्मदा प्रथम दर्शन 2022
त्र्यंबकेश्वर ब्रम्हगिरी गोदावरी 1998
आणि आज उगम स्थळ तळ कावेरी 2025
===========================
39 वर्ष लागली हा योग पूर्ण व्हायला
सरस्वती सोडून ….आज माझी सर्व ही सहाच्या सहा पवित्र नद्यांच्या उगमाची यात्रा संपन्न झाली
ऍक्टच्युअली हर कि दून मध्ये सरस्वती उगम आहे असे म्हणतात , ((कोणी म्हणतात मानस सरोवरातूनच आहे))) आणि हा ट्रेक मी १९९६ मध्ये केला आहे पण गुप्त नदी असल्याने त्या वेळीही उगम असा काही पाहायला मिळाला नव्हता
सरस्वती ही गुप्त नदी असल्यामुळे त्याचा दर्शन आणि उगम आपल्याला माहिती नाही पण बाकी सप्त नद्यांपैकी सहा नद्यांचे उगम मी आता माझे बघून झालेले आहेत आणि यासाठी टोटल वर्ष गेली ती म्हणजे 39 वर्ष 1986 पासून 2025 म्हणजे ही २००० मधील 25 आणि ती १९०० मंडळी 14 अशी 39 वर्षे लागली हे बघायला पण एक सॅटिस्फॅक्शन आहे की भारतातल्या सगळ्या महानद्या ज्या म्हणतात त्या सगळ्या महानद्यांच्या उगमाचे दर्शन माझं झालेलं आहे
आज हाच विचार घेऊन शुभ रात्री
गुड नाईट

