Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर — डीव्हीडी कॉर्नर – आजची खुश खबर १५-१२-२०२५

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर — डीव्हीडी कॉर्नर – आजची खुश खबर
NEWS 1
पुण्याच्या PHDच्या विद्यार्थिनीने शोधली नवी गॅलक्सी, हा शोध का आहे महत्त्वाचा?
पुण्यातल्या संशोधकांनी एका नव्या दीर्घिकेचा म्हणजे गॅलक्सी चा शोध लावलाय. या दीर्घिकेला – अलकनंदा नाव देण्यात आलंय.
आपल्या गॅलक्सीला आकाशगंगा, मंदाकिनी किंवा Milky-Way या नावांनी ओळखलं जातं आणि या नव्या अलकनंदा दीर्घिकेचं आपल्या आकाशगंगेशी साधर्म्य आहे.
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) मधील पीएचडीची विद्यार्थीनी राशी जैन हिने वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दीर्घिका शोधली असून ही आत्तापर्यंतची सर्वात दूरची सर्पिलाकार दीर्घिका असल्याचं ते सांगतात.
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने हा अभ्यास करण्यात आला. भारतीय शास्त्रज्ञांनी या दीर्घिकेला ‘अलकनंदा’ हे नाव दिलं आहे.
हिमालयात असलेल्या अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन नद्यांवरून हे नामकरण करण्यात आलं आहे. भारतीयांनी आपल्या दीर्घिकेला ( मिल्की-वे किंवा आकाशगंगा) ‘मंदाकिनी’ हे नाव दिले आहे.
अलकनंदा नामकरण कसं करण्यात आलं?
‘अलकनंदा’ ही ‘मंदाकिनी’ची भगिनी नदी मानली जाते. त्यावरून हे नामकरण करण्यात आलं आहे.
याबाबतचे संशोधन युरोपमधील खगोलशास्त्र जर्नल ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये प्रकाशित झाले आहे.
विश्वाचे वय आताच्या वयाच्या केवळ 10%, म्हणजे फक्त दीड अब्ज वर्ष असताना, पूर्णपणे विकसित झालेल्या या दीर्घिकेमुळे दीर्घिकांच्या उत्पती बाबतच्या समजुतींचा फेरविचार करण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे
———————————————–
NEWS 2

खरच कौतुक आहे तुझं नविन
नविन अगरखेडकर हा आपल्या ब्राह्मण यूनिटी चा सारेगम समूहाचा चा सदस्य आहे..
अतिशय गुणी आणि सह्रयदायी कवि…ह्या विषयी आज ची न्यूज आहे
त्याच्या एका कवितेची निवड हैदराबाद येथे होणाऱ्या विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा आणि अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रस्तरीय मराठी काव्य संमेलन २०२५ या काव्य संमेलनासाठी झाली होती. माझी वारी पंढरीची या कवितेची निवड या काव्य संमेलनासाठी झाली. महाराष्ट्राचे वैभव अधोरेखित करणाऱ्या पंढरीच्या वारीवर आणि प्रत्यक्ष विठ्ठलावर केलेल्या या कवितेच्या सादरीकरणासाठी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी त्याला हैदराबाद येथे आमंत्रित केले होते. संपूर्ण भारतातून म्हणजे मणिपूर आसाम त्रिपुरा तेलंगणा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश केरळ या सर्व राज्यातून ५० कविता आणि कवी या काव्य संमेलनासाठी निवडले होते कारण हे बहुभाषिक काव्य संमेलन होते. संस्थेने सर्व कवींची राहण्याची व्यवस्था केली होती काव्य संमेलनाच्या आदल्या दिवशी दोन डिसेंबरला हैदराबाद येथे पोहोचला .. काव्यसंमेलन तीन तारखेला सकाळी नऊ वाजता सुरू झालं सर्व कवींचं कवी कट्टा च्या वतीने औक्षण करून स्वागत करण्यात आल. मानाचा फेटा आणि कवी संमेलनाच्या बॅच देऊन त्यांनी सगळ्यांचे स्वागत केल. त्यानंतर काही समूह गान झाली आणि प्रत्यक्ष काव्य संमेलनाला सुरुवात झाली. ३० कविता सादर झाल्या ज्याच्यामध्ये नवीन ची एक कविता होती. ती कविता त्यांना अतिशय आवडली खूप कौतुक केलं त्यांनी त्या कवितेच . आणि काव्यरत्न मानकरी हा पुरस्कार त्यांनी नवीन ला दिला . पुरस्काराचे स्वरूप म्हणजे एक अतिशय सुंदर मानपत्र अतिशय एक सुंदर असं स्मृतीचिन्ह आणि मेडल देऊन, व शाल आणि फेटा घालून त्यांनी सत्कार केला . अनेक दिग्गज मान्यवर या काव्य संमेलनाला उपस्थित होते.
Dr विभा देशपांडे
डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर १५-१२-२०२५
