Classified

अतरंगी रे डॉक्टर विभा देशपांडे यांची अतरंगी बातमी

अतरंगी रे

चोर एखादी चोरी करण्यापूर्वी त्या ठिकाणाचा, घरातील प्रत्येक माणसाच्या येण्या-जाण्याचा अभ्यास करुन ठेवतात. तसेच चोरी करताना कोणत्या दरवाजे आत जायचे आणि कोणत्या दरवाजाने बाहेर जायचे याचा देखील आधीच प्लान केलेला असतो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चोराचा डाव पूर्णपणे फसला आहे. त्याने चोरी करण्यासाठी स्वयंपाक घरातील एक्झॉस्ट फॅनसाठी करण्यात आलेल्या छिद्राची मदत घेतली होती. मात्र, ऐनवेळी चोर या छिद्रामध्ये अडकला आणि संपूर्ण डाव अपयशी ठरला आहे. आता नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…

राजस्थानातील कोट्यातून एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरात चोरी करण्यासाठी घुसलेला एक चोर स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅनच्या छिद्रात अडकून पडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी खूप मेहनत घेतल्यानंतर चोराला बाहेर काढले आणि त्याला अटक केली. ही घटना कोट्यातील बोरखेड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ३ जानेवारी रोजी सुभाष कुमार रावत हे त्यांच्या पत्नीसोबत खाटूश्यामजीच्या दर्शनाला गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरांनी सुभाषच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. मात्र

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दोन्ही चोर स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅनच्या भोकातून घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यातील एक चोर त्या भोकातच अडकून पडला. ४ जानेवारीच्या रात्री जेव्हा सुभाष घरी परतले, तेव्हा स्वयंपाकघराच्या खिडकीत माणूस लटकलेला पाहून ते थक्क झाले. सुभाषने लगेच ओरडा सुरू केली. आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमले तेव्हा त्यांना चोर एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकलेला दिसला. गर्दी पाहून चोराचा साथीदार तेथून पळ काढला. सुभाष यांनी तातडीने पोलिसांना फोन केला.

पोलिसांनी बाहेर काढले

पोलीस घटनास्थळी पोहोचताच चकीत झाले. त्यांनी चोराला बाहेर काढण्याच्या प्रयत्न सुरु केला. बराच वेळ मेहनत घेतल्यानंतर चोराला बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केली आहे. कोटा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चोर ज्या कारने चोरीला आले होते, त्या कारवर पोलिसांचेच स्टिकर लावलेले होते. पोलिसांनी ती कारही जप्त केली आहे. तर चोराच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

 

डॉक्टर विभा देशपांडे यांची अतरंगी बातमी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}