Achievements

हॅलो Unity Expression digital portal channel viewers

2018 मध्ये Non-Profit (Charitable) संस्था स्थापन झाली व जुलै 2021 पासून आपल्या संस्थेला 12A व 80G मिळाले आहे.
( आपल्या संस्थेला दिलेल्या देणगी / Donations वर देणगीदाराला 80G अंतर्गत Income Tax Deduction मध्ये सूट मिळु शकते. )

▶️आता पर्यंत ३५ पेक्षा जास्त संगीत प्रोग्रॅम वेगवेगळ्या ग्रुप साठी केले आहेत निवारा सारखे वृद्धाश्रम , आर्मी चे पॅराप्लेजीक , युनिट अश्या अनेक ठिकाणी आणि त्याच बरोबर 100 पेक्षा जास्त लोकांना संधी / exposure देण्याचे काम केले आहे , त्यांना त्यातून पुढे नक्कीच संधी मिळत जातील ही आशा आहे

▶️ब्राह्मण युनिटी जॉब search 10000 जॉब पोस्ट करून माहीत नसलेले जॉब लोकांपर्यंत पोचवायचे आणि त्यांना त्यांच्या आवडत्या फील्ड मध्ये संधी उपलब्ध करायचे काम केले या FB ग्रुप मध्ये 2500 ते 3000 लोक आहेत
खूप कमी रेस्पॉन्स आले लोकांचे हे ही खरे म्हणावा तसा रेस्पॉन्स आला नाही. जॉब देणाऱ्यांकडून आणि जॉब हव्या असलेल्या लोकांच्या अपेक्षा ही वेगवेगळ्या असतात त्यामुळे असावे कदाचित , यात अजून जॉब पोर्टल पण करू शकतो त्या साठी funding ची आवश्यकता आहे आणि या वर काम करणाऱ्या लोकांची सुद्धा

▶️दुर्ग प्रेमी या संस्थेबरोबर ट्रेक्स चे प्रोग्रॅम आखून पूर्ण केले आहेत 16 ते 18 ट्रेक्स 2 वर्षात त्यातील 1 हिमालयात सुद्धा , यात टोटल 1000 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला आहे . काही सोपे , कधी कठीण असे ट्रेक्स आणि त्यामुळे मदत करणे , एकमेकांत मिसळणे, साथ देणे , शेअर करणे याची प्रचिती सर्वांना मिळाली आहे

▶️ ब्लड डोनेशन कॅम्पस 250 लोकांनी रक्तदान केले. एक पुण्यात सिंहगड रोड ला आणि दुसरा pcmc मध्ये घेतला होता. कँप arrange करून participate करणे यात एक फार मोठे समाधान आहे टीम ला !

▶️ वृक्षारोपण कार्यक्रम
राम दरा येथे , 20-22 लोकांनी येऊन सफल केला. आणि ओळख वाढण्यासाठी वन भोजन पण केले होते.

▶️ दुर्गाशक्ती ग्रुप ने रेड डॉट प्रोजेक्ट मध्ये 15 -20 दुर्गानी वेगवेगळ्या 10 शाळेत जाऊन 8-9-10 च्या मुलींना पेपर बॅग बनवून सॅनिटरी pads चे disposal कसे करावे याचे प्रशिक्षण दिले आणि health कॅम्पस घेऊन त्यात वेगवेगळ्या टेस्ट चेक अप्स करून 125 स्त्रियांनी फायदा घेतला 1200 रु च्या टेस्ट 400 रु मध्ये करून देण्यात आल्या होत्या.

▶️ह्याच दुर्गानी आता सेल्फ फिटनेस चा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे आणि त्यात 22 25 महिला सहभागी आहेत रोजचे आपले चालणे आणि व्यायाम याचे कॉमन reporting करत गेले तीन महिने स्वतःचा फिटनेस वाढवत आहेत । एक अत्यंत प्रभावी तंत्र वापरून । सेल्फ कंट्रोल

▶️ युनिटी सपोर्ट फॉर entrepreneure (USE ) या अंतर्गत experts ( पेड बेसिस) च्या guidance ची तयारी करून व्यवसाय करणाऱ्या ग्रुप पर्यंत पोहोचवली आहे. जवळपास 100 पेक्षा जास्त experts 21 शहरांमध्ये हे काम करायला तयार आहेत, ज्यांना त्यांची मदत हवी आहे अश्यानी ग्रुप अडमीन ला संपर्क करावा ही अपेक्षा आहे.

▶️ 8000 आर्सेनिक अल्बम ह्या , त्या वेळी आवश्यक वाटत असलेल्या औषधांच्या कुप्या पोचवून 20000 पेक्षा जास्त लोकांना immunity मिळवून. देण्याचा प्रयत्न करोना काळात पहिल्या लाटेच्या वेळी केला, त्यात आपली मै हु ना या टीम चा सर्वात मोठा वाटा आहे.

▶️कोल्हापूर पुराच्या वेळी आपल्या लोकांनी जमाकरून दिलेली मदत , केर्ली नावाच्या गावात आपले कार्यकर्ते पोचवून आले 1200 किलो च्या वेगवेगळ्या जरुरी वस्तू, शाळेसाठी आणि गावासाठी led lights पण देण्यात आले

▶️ Covid काळात 39 पोलीस स्टेशन, निवासी शाळा, आश्रम शाळा, अग्निशामक दल अश्या ठिकाणी त्या लोकांची काळजी घेण्यासाठी सॅनिटीझर आणि हँडस फ्री ss 304 grade चे स्टँड बसवून दिले.

▶️ Eye डोनेशन आणि ऑर्गन्स डोनेशन ची 20 25 जणांच्या टीम ने 2018 ते 2020 या काळात exhibitions मध्ये सोशल अवेअरनेस स्टॉल मधून डोळे आणि अवयव दान या बद्दल जनजागृती केली आहे. त्या काळात बऱ्याच लोकांनी eye डोनेशन चे फॉर्म भरून दिले आहेत. काही govt चे नियम बदल आणि कॉविड मुळे ही ऍक्टिव्हिटी सध्या बंद केली आहे.

▶️ उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी 40 ते 50 मीटिंग arrange करून व्यवसायाच्या संधी वाढवल्या आहेत त्यात 500 हुन अधिक उद्योजक वेगवेगळ्या ठिकाणी आले आहेत

▶️ ६ प्रदर्शने केली आहेत गेल्या दोन वर्षात. गणपती आणि दिवाळी च्या एक आठवडा आधी आणि 200 पेक्षा जास्त व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय प्रमोट करण्याची संधी दिली आहे । त्यांचे व्यवसाय तिथे चांगले झाले असा फीड बॅक पण आहे

▶️ दिवाळी फराळ ,जो ब्रँडेड किंवा तत्सम दुकानात 1125 ला होता तो 799 मध्ये उपलब्द्ध करून दिला 500 लोकांनी त्या साठी ऑर्डर केल्या आणि त्यांना घरपोच फराळ मिळाला आहे त्यात 35 40 फूड मेकर्स ना व्यवसायाची संधी मिळाली आहे

▶️ क्रीडा दिवस
115 लोकांनी एकत्र येऊन 1 दिवस वेगवेगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करून मजेत घालवला आणि हेतू हाच की awareness फिटनेस साठी आणि मैदानी आणि ब्रेन गेम्स ची आवड !

▶️ इन्व्हेस्टमेंट ग्रुप साठी मार्केट अवेअरनेस प्रोग्रॅम आता सुरू आहे फेब 22 to मे 22.
170 लोकांनी यात भाग घेऊन आपले ज्ञान update करणे सुरू केले आहे. Share मार्केट मध्ये याचा त्यांना फायदा होईल हा हेतू. Share मार्केट च्या इन्व्हेस्टमेंट ग्रुप मध्ये आता पर्यंत १२०० पेक्षा जास्त लोक ऍड झाले आहेत आणि लाभ घेत आहेत research पोस्ट चा..

▶️ UBC युनिटी बिझनेस कल्चर , हा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म सुरू होता. covid मुळे सध्या बंद आहे तो 2023 मध्ये पुन्हा सुरू करून कोथरूड मध्ये तीन मीटिंग झाल्या आहेत.

▶️ 2022 चे कॅलेंडेर्स लोकांना 190 पेक्षा जास्त ठिकाणी 6000 qty वेळेत पोचवून 25 dec ला हा प्रोजेक्ट पूर्ण झाला* आहे । 23 व्यावसायिकांना त्याच्या जाहिराती करण्याच्या संधी मिळाल्या आहेत ।

▶️ Fb लाईव्ह B unity saregama या पेजवर 100 पेक्षा जास्त लोकोपयोगी कार्यक्रम 100000 पेक्षा जास्त लोकांनी आज पर्यंत पाहिले आहेत त्यात Doctors , Subject experts, इतिहास तज्ञ अशा वेगवेगळ्या विषयातील ज्ञानी आणि प्रख्यात मंडळींनी मार्गदर्शन केलं आहे.

▶️ बी युनिटी ची घरपोच डब्बा
70 फूड व्यावसायिकां ची लिस्ट जगभर फेमस होऊन गेली आहे. आणि त्यातून हजारो लोकांना कोरोना काळात किंवा सिनियर सिटीझन ना आज सुद्धा घरपोच डब्बा मिळत आहे.

▶️ गुरुजी , पुरोहित , घरी येऊन आणि ऑन लाईन पूजा सांगणारे पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींची लिस्ट पण आपण निवडक शहरांमध्ये प्रकाशित केली आहे । आपल्या सर्व लोकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा

▶️ BUF Health Care यूनिटीमधील डाॕक्टर्स ची लिस्ट व ऑन कॉल ची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्या डाॕक्टर्स ना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन Consult-Second Opinion करू शकता वा Family Doctor म्हणून नेमु शकता.

▶️ Volunteer नावाचा ग्रुप सिंगल स्टॉप मदत अशी योजना साकारत आहे. आपल्या प्रत्येक ग्रुप मध्ये एक एक मेंबर आता तयार झाला आहे.

▶️ सब्जेक्ट ग्रुप — ट्रॅव्हल, technical , फूड उद्योग , स्पोर्ट्स, फोटोग्राफी , दुर्गशक्ती , मेजवानी, असे आपल्याला आवडीचे ग्रुप आणि त्यात त्याच छंदाच्या इतर व्यक्तीशी तुमचा संवाद साधताना आवड पण जोपासली जात आहे

▶️ E learning किट आपल्यातील गरजू शिक्षकांना पहिल्या किट ने आता 21 नोव्हेंबर मध्ये नांदेड मधून सुरुवात करून दिली आहे. या वर्षी सुद्धा असे किट्स चे वाटप करायचे आहे.

▶️ ब्रह्म किचन- Saturday- sunday सोसायटी exhibition असे दोन नवीन उपक्रम आपल्यातील फूड आणि इतर उद्योजकांना मदत करणारे ठरतील अशी आशा आहे. या वर्षी याची तयारी सुरू आहे।

▶️ ब्रह्म कृषी – पुरोहित गुरुजींना कोरोना काळात उत्पन्नाचे साधन, मदत हे या प्रोजेक्ट चे दुसरे वर्ष. आणि गेल्या दोन वर्षात असे तीन प्रोजेक्ट झाले

▶️ मुलांना शैक्षणिक क्षेत्रात काही अडचणी कोरोना काळात आल्या, त्या वर उपाय असा सरस्वती प्रोजेक्ट या वर्षीपासून ट्रिगर करत आहोत २२ एप्रिल २०२३ रोजी एक नाट्यसंगीत कार्यक्रमाची आखणी ही सुद्धा याच सरस्वती प्रोजेक्ट साठी अत्यंत यशस्वी फंड रेझिंग ॲक्टिविटी ठरली आणि त्या मुळे मदत येणे आणि मदत करने सुरू ही झाले

▶️ ऑगस्ट २०२२ मध्ये आणि जून २०२३मुलांना व्यवसाय प्रशिक्षण म्हणून मुलांच्या पालकांच्या व्यवसायाचे स्टॉल त्यांच्या मुलांनी चालवावे अशी संकल्पना घेऊन एक exhibition केले ,त्यात मुलांना त्यातले श्रम कळले आणि आपले आई वडील आपल्यासाठी किती मेहेनत करत असतात याची जाणीव त्यांना झाली

▶️ २६ मार्च २०२३ ला एक दिवसीय मेडिकल कँप करून सहा डॉक्टर्स चे वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आणून , १०० पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ मिळाला आहे या वर्षीपासून ट्रिगर करत आहोत

▶️ Consumer कॉ ऑप store वर नाशिक मध्ये काम सुरू आहे 15 -16 जणांची टीम नाशिक मध्ये या वर काम करत आहे.

▶️ Matrimony या विषयावर काम सुरू आहे ग्रुप फॉर्म करून त्या वर लोक suggestion देऊन हा प्रकल्प लवकरच आकाराला आणतील अशी तयारी सुरू आहे.

या आणि अश्या अजून काही planned प्रोग्रॅम्स साठी डोनेशन ची गरज असतेच ।
म्हणून ही पोस्ट..

आणि यात अजून खूप लोकांचा सहभाग हवा आहे , आपल्या प्रिय जणांच्या स्मृती साठी असे काही करायचे असल्यास ग्रुप अडमीन शी संपर्क साधावा

हे ज्यांनी शक्य केले त्यांचे मनापासून आभार आहेत कारण त्यांनी त्यांच्या रोजच्या कामातून वेळ काढून जमेल तसे हे सतत सुरू ठेवले आहे

कोणी आढावा घ्यावा तर सर्व आहे फाऊंडेशन कडे । प्रोग्रॅम्स, नवीन प्लॅन येत आहेत, जुने सुरू आहेत , participation वाढत आहे पण याला जोर आणि बळकटी यायला हवी त्या साठी हे डोनेशन आणि सहभागाची इच्छाशक्ति ..

हे सर्व बघायला करायला वेळ हवा आपल्याला, आणि इतक्या फील्ड मध्ये वेगळे वेगळे प्रोजेक्ट आहेत करण्यासारखे , त्यात तुमच्या आवडीच्या एखाद्या प्रोजेक्ट मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन बघा , आनंद वाढेल । समाधान मिळेल । आणि या बद्दल तुम्ही पाहून , करून जेव्हा इतरांना सांगाल ना तेव्हा आपली ही ब्राह्मण युनिटी खऱ्या खुऱ्या अर्थाने बळकट होईल आणि जोमाने वाढेल

या । सहभागी व्हा । डोनेशन च्या बरोबरीने महत्वाचे आहे ते म्हणजे आपला सर्वांचा सहभाग ….

जय श्री परशुराम 🙏🏻

अधिक माहिती आणि सहभागासाठी संपर्क कधीही करू शकता, हे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी वाढवायचे आहे या साठी तुमची काय मदत होऊ शकते ती ही जरूर कळवा. तुमच्या रिप्लाय ची वाट पाहतो

धन्यवाद !
www.brahmanunity.in

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}