शक्ती_भाग_१ 🔱 लेखक अक्षय चंदेल संदर्भ : शिवभारत,सभासद बखर,राजा शिवछत्रपती
#शक्ती_भाग_१ 🔱
छोटेसे गाव तुळजापूर…
सकाळी सकाळी उन्हाच्या सोनेरी किरणांनी चकाकले होते…. पक्ष्यांच्या किलबिलाटीने मंदिरात घंटानाद सुरु झाला आणि काकड आरतीला माणसं जमली… इथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी उभी होती… श्री आदिशक्ती तुळजाभवानी… कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कुकर या दैत्याची तीच्यावर नजर गेली आणि तीच्या शरीरावर हात घालण्यासाठी कुकर अनुभूती कडे धावला…
तेवढ्यात अनुभूती ने श्री जगदंबेस आवाहन केले आणि आपल्या भक्ताच्या शिल रक्षणासाठी देवीने दैत्याचा वध केला… अखेर अनुभूतीच्या आग्रह खातर देवी तुळजाभवानी नावाने इथेच थांबली…
पण…पण… याच तुळजापूर च्या वेशीवर मोठीच फौज येऊन उभी राहिली…… दिन….दिन…..करत जमाव घातलेली ही फौज आदिलशाही ची…..!!!
अरे हो… आदिलशाही च्या दरबारात अफझलखान नावाच्या भयंकर सरदाराने हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करुन शिवाजी राजे भोसलेंना संपवण्यासाठी विडा उचलला होता… त्याचीच फौज ही…
खानाने, तुळजापूर वरुन नजर फिरवली आणि, बाजुला उभ्या असलेल्या त्याचा वकील कृष्णा भास्कर ला विचारले,
“क्यो ,ये जगह काफरोके…. तुम हिंदुओ की, बहोत दिल के करीब है ना…?”
बाजूला उभा असलेला , “कृष्णा भास्कर म्हणाला,
“जी हुजूर, हमारा श्रद्धा स्थान है, मा भवानी का मंदिर… ”
आपल्या दाढी वरून हात फिरवत खान म्हणाला..
“वो….सिवा बहोत मानता है ना इसे…??”
आणि कृष्णा भास्कर ने खानाचे डाव ओळखले.. खानाला तो म्हणाला,
” हुजूर अगर यहा हात दाला तो हमारे सभी हिंदू सरदार तुट जाएगे….”
ओरडून म्हणाला खान..,
“खामोश…. इतनी औकात…किसी की , जो गर्दन उठाएगा उसकी गर्दन कटेगी….”
आणि खानाचा खरा चेहरा पुढे आला खानाची सैन्य ,आणि खान तुळजापूर बेचिराख करत सुटले.. तुळजाभवानी च्या मंदिरात
देविचे भोपे (पुजारी) पुढे आले त्यांना मारले बाहेर काढून टाकले, अत्याचार च्या सिमा तुटल्या.
भर रस्त्यावर मायमाऊलींचे पदर उडाले , गायांच्या मासांनी रस्त्यावर शिंपण घातलं,
जी येईल ती मुर्ती तोडत खानाचे गाभाऱ्यात प्रवेश केला…
पुढे ऊभी होती आदिमाया, आदिशक्ती अष्टभुजा तुळजाभवानी हातात शस्त्र धारण करून, पायाखाली महिषासुर ला धरून हातातील त्रिशूळ महिषासुरमर्दन करत होता, आपल्या शांत नजरेने देवी , समोर उभ्या अफझलखान ला बघत होती…
अफझलखान ने मंदिरात असलेल्या नंदी, आणि सर्व मूर्त्या तोडल्या होत्या…
त्याने एक नजर मराठ हेंदव कुलस्वामिनी आई तुळजाभवानी कडे बघितले.
कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात – धर्मराजासाठी व कलियुगात- शिवरायांसाठी आशिर्वादरूप ठरलेली ही महिषासुरमर्दिनी भवानी…
आणि पुढे उभा होता नरामध्ये महिषासुर राक्षस म्हणजे दिनदार बुतशिकन, दिनदार कुफ्रशिकन- कातील ए मुतमरिदान, काफरान शिकंदर बुनियादे बुतान (काफरांच्या व बंडखोरांच्या कत्तल करणारा व मुर्त्यांचे विध्वंस करणारा ) अफझलखान…
देवी कडे बघत खान मोठ्याने हसला… सर्व गाभाऱ्यात आवाज कहर करत उठला…
महिषासुरमर्दिनी भवानी माते पुढे खान ओरडला,
“ऐ बुते काफरान… बताव मुझे तेरी करामत ! बताव तेरी अजमत!, सुना है बहोत ताकद है तुझमे… बेइंतहा इख्तयार बुलंद है तेरा… तो बता तेरे हातो की ताकद मुझे… बता…..!!”
खानाचे हात उचलले गेले… अष्टभुजा मुर्तीवर घाव पडला…
” ऐय्य भवानी ये गाझी खान तुझे तोडता है…….है…..य्य….भ…व्वा….न्नी……!!
आणि तुळजाभवानी कलली, भंगली, फुटली, खंडित झाली…
प्रत्येक प्रवाह बरोबर खान हसत होता. देवीचे तुकडे, ठिकरे उडाली, देवीचे देऊळ लुटले …गाभाऱ्यात गाय मारली.
तुळजापूर अवघे हादरले… गाव बेचिराख झाले होते.
महिषासुर अवतरला… सह्याद्री हादरवून गरजला…।।।।
क्रमशः . . .
लेखक अक्षय चंदेल
संदर्भ : शिवभारत,सभासद बखर,राजा शिवछत्रपती