कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 11
लास्ट डे इन मडिकेरी गोल्डन टेम्पल आणि elephant camp
आज सकाळी नुसता आरामात उठलो अर्धवट आवरलं ब्रेकफास्ट केला आजचा ब्रेकफास्ट म्हणजे मस्त होता एकदम डोसा आणि स्वीट आणि सांबार खूप छान जेवण इकडचं खरंच चांगला आहे त्यामुळे मस्त ब्रेकफास्ट झाला आणि ज्यूस पण घेतला आणि ज्यूस च्या बरोबर आज नंतर चहा पण झाला संपूर्ण हेवी ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही थोडेसे रिसॉर्ट मधले काही फोटोज असे काढले स्विमिंग पूल आणि काही डीपी साठी
आणि मग आम्ही निघालो गोल्डन टेम्पल म्हणजे तिबेटियन नॉनस्ट्री बघायला तिथून जवळपास 38 किलोमीटर लांब आहे आणि कुशल नगर नावाचा एक गाव आहे ते त्या गावापासून पुढे तीन सव्वा तीन किलोमीटर वरती ही मॉनेस्ट्री आहे

खूप छान आहे मोनेस्ट्री प्रचंड मोठी आहे आणि सगळ्या बाजूंनी त्यांनी अगदी भूतान मधल्या मॉनेस्ट्रीचा त्याला एक छान इफेक्ट असा दिलेला आहे आणि व्हेरी सक्सेसफुल कारण खूप छान आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्या माँक्स पर्यंत सगळ्या प्रकारचे भूतानि आणि हिमाचल प्रदेश मधल्या दलाई लामांच्या गायडन्स आणि त्यांचे जे अनुयायी आहेत , त्यांनी ही 1960 मध्ये बांधलेली मॉनेस्ट्री आहे
ह्या लोकांना एक PRO किंवा गाईड काही ट्रेन करून ठेवले असते तर ही संस्कृती बद्दल काही माहिती मिळाली असती. ते इथे missing होते आम्ही आपले आपले फिरून जे पाहिले तेच , बाकी माहिती अशी काहीच नाही मिळाली
तिबेटियन लोक हातात फिरवतात त्या वस्तूला “प्रेयर व्हील” (Prayer Wheel) म्हणतात. तिबेटी भाषेत याला “मणि चक्र” किंवा “मणि व्हील” असेही म्हणतात. ते आम्ही एक घेतले विकत
हे प्रेयर व्हील बौद्ध धर्मात एक अत्यंत पवित्र आणि ध्यानात्मक साधन मानले जाते. खाली याची सविस्तर पुढे देत आहेच
🌀 प्रेयर व्हील हे एक लाटण्या सारखे साधन असते जे एका दांडीवर फिरवले जाते.यामध्ये “ॐ मणि पद्मे हूँ” ही पवित्र मंत्र असलेली कागदाची पट्टी किंवा कापड गुंडाळलेली असते.हे व्हील फिरवताना असे मानले जाते की त्या मंत्राचे उच्चारण केल्यासारखे पुण्य प्राप्त होते.
🙌 तिबेटियन लोक हे व्हील उजव्या हाताने घड्याळाच्या दिशेने फिरवतात. फिरवताना ते ध्यान, प्रार्थना किंवा मंत्र उच्चारण करतात काही वेळा हे व्हील मोठ्या आकारात मंदिरातही असते, जे भक्त हाताने किंवा यंत्राद्वारे फिरवतात. पण ती तसं या मंदिरात कुठे दिसलं नाही आम्हाला
🌟 धार्मिक महत्त्व बौद्ध धर्मात असे मानले जाते की प्रेयर व्हील फिरवल्याने पाप नष्ट होतात, शांती प्राप्त होते, आणि ध्यानाची गती वाढते. हे साधन विशेषतः महायान आणि वज्रयान बौद्ध परंपरेत वापरले जाते.
📜 ऐतिहासिक प्रेयर व्हीलचा उल्लेख पद्मसंभव या तिबेटी बौद्ध गुरूच्या काळापासून आढळतो.हे साधन तिबेट, नेपाळ, भूतान, आणि भारतातील लडाख, स्पीती, अरुणाचल प्रदेश अशा भागात प्रचलित आहे.
त्यानंतर तिथे चांगले चांगले की चेन आणि त्याच्यानंतर नजर न लागणारे इव्हिल आय अशा काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आम्ही मडेकरीला परत आलो
वाटेत elephant कॅम्प्स लागले
🐘 डुबारे हत्ती शिबिर , कुर्ग, कर्नाटक)
पर्यावरण पर्यटन केंद्र: Jungle Lodges & Resorts यांच्या व्यवस्थापनाखाली चालणारे हे ठिकाण पर्यटकांना हत्तींबद्दल शिकण्याची संधी देते.
कर्नाटक वन विभागाच्या हत्तींसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे., प्रशिक्षण केंद्र: पूर्वी येथे मैसूर दशरा उत्सवासाठी हत्तींचे प्रशिक्षण दिले जात असे.
पर्यटकांना हत्ती जवळून पाहता येतात आणि त्यांना खाऊ घालणे, अंघोळ घालणे यामध्ये सहभागी होता येते.
हत्तींबद्दल शिकणे: हत्तींचा इतिहास, पर्यावरणशास्त्र व जीवशास्त्र याबद्दल काळजी वाहकांशी माहुतांशी संवाद साधता येतो.
ट्रेकिंग, निसर्गभ्रमण यांसारखे उपक्रमही येथे उपलब्ध आहेत.

डुबारे हत्ती शिबिर हे पर्यावरण पर्यटन, वन विभागाचे हत्तींचे केंद्र, आणि सांस्कृतिक वारसा यांचे एकत्रित ठिकाण आहे. येथे पर्यटकांना हत्तींबरोबर थेट अनुभव घेता येतो, तसेच निसर्गाशी जवळीक साधता येते.
येताना वाटेत प्रचंड मोठ्या मोठ्या कॉफीच्या इस्टेटस आम्हाला लागल्या तर एका कॉफीच्या इस्टेटमध्ये (न विचारता ) घुसून मी चार कॉफीची बीन्स आणली आणि कॉफीचे पान कशी दिसतात ते बघायला दोन-चार पान त्याच्याबरोबर घेऊन आलो
नंतर आम्ही मडेकरी फोर्ट आणि गव्हर्मेंट म्युझियम बघायला गेलो होतो गव्हर्मेंट म्युझियम खूप छान आहे त्याच्यामध्ये जुन्या जुन्या म्हणजे अगदी सोळाव्या आणि 18 व्या शतकातल्या मूर्ती आणि काही वापरणारी साहित्य त्याचबरोबर ओल्डेस्ट वर्किंग टाईपराईटर असा तिथे आम्हाला एक बघायला मिळाला
त्याचबरोबर गणपतीची मोठी मूर्ती आणि छोटासा राहण्यासारखा असलेला असा हा किल्ला अशा दोन तीन गोष्टी चांगल्या बघायला मिळाल्या त्या बघून आज आमचं मडेकरी साईट सिंग अब्सोल्युटली पूर्ण झाले आहे

किल्ल्यामध्ये महागणपती आहे आणि महागणपतीचा सुंदर संबंधित आहे त्याचा दर्शन घेऊन आम्ही बाहेर येत असताना आम्हाला चॉकलेटी रंगाचं एक कबूतर दिसलं त्या कबुतराचे चित्र याच्याबरोबर पाठवत आहेत विशेषतः पाळीव कबूतरांमध्ये.
काही कबूतरांमध्ये ब्राऊन रंगाच्या छटा पंखांवर, शरीरावर किंवा डोक्यावर दिसतात, तर काही पूर्णपणे ब्राऊन असतात.
विशेष माहिती अशी कळली कि पाळीव कबूतरांचे रंग आणि छटा शतकानुशतकांच्या निवडक प्रजननामुळे विकसित झाल्या आहेत.
अशा रीतीने आमच्या मडेकरीचा सुंदर स्टे आज पूर्ण होत आहे उद्या सकाळी आम्ही इथून निघून चीकमंगळूर मार्गे शृंगेरी आणि त्याच्यामध्ये शृंगेरी मठ असा आमचा उद्याचा प्लॅन आहे आणि त्याबद्दल उद्या ट्रॅव्हल सुरू झाल्यानंतर मी माहिती देतो
धन्यवाद , चला गुड नाईट
