2 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
१. सुरुवात.
अखंड हिंदुस्थान पारतंत्र्यात जखडला गेला होता. येथील लोकांना आपल्या हक्काचे स्वातंत्र्य अजिबात मिळेनासे झाले होते. इंग्रजांनी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यास ग्रहण लावले होते. या ग्रहणामुळे हिंदुस्थानचे अवघे आसमंत व्यापून गेलेले होते. या पारतंत्र्याच्या ग्रहणातून हिंदुस्थानची पुन्हा कधी सुटका होईल याची किंचितशी अशा देखील तेव्हा अशक्यप्राय वाटत होती. सन १८५७चे इंग्रजांविरुद्धचे पहिले स्वातंत्र्य समर होऊन साधारणपणे पंचवीस वर्षे उलटली होती. आपल्याविरुद्ध असणाऱ्या लोकांचा इंग्रज साम, दाम, दंड आणि भेद ही नीती वापरून त्यांचा मोड करत करत होते.
झांशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे इत्यादींनी १८५७ च्या स्वातंत्र्य समरात केलेले पराक्रम लोकांच्या स्मरणात होता. पण पुन्हा एखाद्या क्रांती समराचा उदय होईल अशी अशा वाटत नव्हती. इंग्रजांनी अतिशय अमानुषपणे स्वातंत्र्य समर मोडून काढले होते. इंग्रज आपले पाय अधिकच मजबुतीने रोवून देशावर राज्य करत होते. स्वतःचा मनमानी कारभार इंग्रज स्वत:च्या फायद्यासाठी करत होते.
महाराष्ट्र मात्र इंग्रजांच्या सत्तेने संतप्त झालेला होता. अवघ्या हिंदुस्थानचे राज्य हिंदवी स्वराज्याकडे येत असतानाच घात झाला आणि मोघल जाऊन त्या ठिकाणी इंग्रजांनी राज्य संपादिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वराज्य अनुभवण्याची सवय असलेल्या येथील जनतेला इंग्रजांचे राज्य नको होते. मुळात इथले लोक शांतपणे पारतंत्र्य सहन करणारे नव्हतेच. त्यांची जडणघडण मुळातच तशी नव्हती. स्वातंत्र्याची आणि स्वराज्याची किंमत इथल्या मातीला, लोकांना चांगलीच माहित होती. अशातच वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे हत्यार उपसले. ‘आम्हास इंग्रजांचे राज्य उलथवून पाडून हिंदुस्थानात स्वतंत्र लोकसत्ताक स्वराज्य स्थापावयाचे आहे.’ अशी प्रकट इच्छा व्यक्त करतच वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र क्रांतीचे रणशिंग फुंकले. ती सुरुवात होती सन १८७९ ची.
त्यांनी अनेक शूरवीरांना सोबत घेतले. या सगळ्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. क्रांतीचा अग्नी भडकत होता. त्यांच्या सोबत असलेले सरदार दौलतराव रामोशी यांनी इंग्रजांशी लढताना वीरमरण पत्करले पण वासुदेव बळवंत आणि इतर सहकाऱ्यांची माहिती दिली नाही.
महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून हे लोक राहत होते. अचानक छापा घालत होते. आणि इंग्रजांना शह देत होते. स्थानिक इंग्रज पोलिसांच्या आवाक्याबाहेर प्रकरण गेल्यावर त्यांनी शेवटी इंग्रजांना वासुदेव बळवंत फडकेंना पकडण्यासाठी मुंबईहून खास सैन्यदल बोलवावे लागले. दिनांक २० जुलै १८७९ रोजी वासुदेव बळवंत इंग्रजांच्या हाती लागले. त्यांच्यावर राणी सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे इत्यादी आरोपांखाली खटला भरण्यात आला. तो खटला पुण्यास चालला. जेव्हा वासुदेव बळवंत फडकेंना पुण्याच्या न्यायालयात आणले जात असे तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः शेकडो लोक गोळा होत आणि वसुदेवांच्या नावाचा जयजयकार करत.
कारागृहात असतानाच सन १८८३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन झाले पण त्याच वेळी क्रांतीचा महायज्ञ पुन्हा प्रज्वलित झाला. लवकरच त्यात शेकडो तरुण आपले जीवन समिधांसारखे अर्पण करणार होते.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.
संकलन ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन साठी ..
उपेंद्र पेंडसे ९०२१५२४१८८

