डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर ०१-०७-२०२५ किमयागारांचा सलाम किमयागारांना

किमयागारांचा सलाम किमयागारांना 🙏🏻
आज जागतिक डॉक्टर दिवस, आपल्या सारेगम परिवारात अनेक डॉक्टर सहभागी आहेत..हे सारे मित्र मैत्रिणी सुरांचे जादूगार आहेतच त्यासह व्याधी, दुखणी दूर करणारे आणि त्यांच्या फक्त असण्याने अनेकांना धीर देणारे किमयागार पण आहेत..आज त्यांच्या याच पैलूला उजाळा देत आहे टीम किमयागार. Dr म्हणून अनेक कृतार्थ क्षण त्यांनी जगले असतील..पण त्यातला सर्वोत्तम कोणता हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीम ने एकेका Dr शी संपर्क साधला…आणि एक कॅलिडोस्कोप समोर आला
Dr Milind Rajurkar Dr. म्हणून नियुक्त झाल्याच्या पहिल्या दोन महिन्यातच दोन अत्यंत अवघड प्रसूती च्या केसेस जवळपास एकट्याने हाताळून दोन कुटुंबांना पुत्र जन्माचा आनंद देता आला आणि वडिलांच्या अपघातानंतर त्यांच्यासाठी वैद्यकीय ज्ञान उपयोगी आले तेंव्हा Dr झाल्याचे सार्थक वाटले.
Dr. अचला दीक्षित
जन्माचा सोहळा अनेक वेळा साजरा होतो असे प्रसूतिगृह सांभाळते जवळपास रोज हा आनंद अनुभवते..पण अपघातात एकुलता एक मुलगा दगावल्यावर तो स्वप्नात येऊन परत जन्म मागतो म्हणून गर्भवती होणारी, नऊ महिने भ्रमिष्ट असल्यासारखी वागणारी बोलणारी आणि त्याच मुलाच्या विचारात प्रसूतीवेदना सोसणारी , आई नवजात मुलासह , अगदी सामान्य स्वस्थ मानसिक अवस्थेत घरी जाताना पहाणे हा कृतार्थ क्षण अजून आठवते..आणि त्यानंतर अठरा वर्षांनी ती आई आपल्या गेलेल्या मुलाच्या फोटोंसह हुबेहूब दिसणाऱ्या दुसऱ्या तरुण मुलाला घेऊन आली तो सार्थकतेचा परमोच्च क्षण
Dr.रवींद्र जोशी
रुग्णांना बरे करून घरी पाठवणे नेहेमीच समाधान देते..पण कोविड काळात वयाची साठी उलटून गेल्यावर देखील PPE kit घालून त्या लढ्यात सामील होणे हे Dr. म्हणून विशेष समाधान देणारे होते..याच काळात संजीवन हॉस्पिटल मध्ये दोन cevere breathing problem असणाऱ्या केसेस हाताळून त्यांना सुखरूप आपल्या कुटुंबात परत पाठवले..ते सार्थकतेचे क्षण, त्या दोन्ही रुग्णांनी दिलेला अभिप्राय आपल्या क्लिनिक मध्ये लावून त्यांनी जपून ठेवले आहेत.
Dr. Smita Joshi रक्तपेढी मधील काम हे मुळातच जीवनदानाचे पुण्य देणारे काम..त्यात कोविड सारख्या आपत्ती किंवा इतर काही कारणाने निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्ताचे पाणी करणे हे अनेकदा करावे लागले..अर्थात हे रक्त जेव्हा एखादा जीव वाचवते तेव्हा याचे सार्थक होते..कोविड काळात एका ज्येष्ठ मैत्रिणीसाठी प्लाझ्मा ची योग्य वेळेत सोय झाली आणि तिचा जीव वाचला तसेच एका रस्ता अपघातातील तरुण मुलासाठी विपरीत परिस्थिती मध्ये रक्त उपलब्ध करवून त्याचे प्राण वाचवले हे दोन क्षण सर्वात मोलाचे वाटतात ते याच मुळे
Dr. Richa Pandit
घरात तीन पिढ्यांचा वैद्यकीय वारसा असल्याने याच व्यवसायात येणार हे ओघानेच आले तसेच हा निव्वळ व्यवसाय नाही त्यामुळे केवळ नैमित्तिक आजारावर उपचार न करता त्याच्या मूळाशी जाऊन सर्वांगीण उपाय शोधणे हे संस्कारातून आले. त्यामुळे अनेक समाधानाचे क्षण मिळतातच परंतु Dr म्हणून सर्वाधिक आनंदाचा क्षण म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलासाठी काही करताना त्यांना व त्यांच्या पालकांना देता येणारे समाधान..असे अनेक मोलाचे क्षण मी या व्यवसायामुळे जगते.
Dr Kishor Patki रोजच या व्यवसायात आल्याचे समाधान असते परंतु याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांना करून देता येतो त्यावेळी त्याचे सार्थक वाटते..असे एक नाही अनेक प्रसंग आहेत..इथल्या अनेकांची मैत्री केवळ वेळेवर केलेल्या छोट्याशा वैद्यकीय मदतीमुळे कौटुंबिक स्नेहात बदलली..एक विस्तारित कुटुंब मिळाले जे माझ्या कलागुणांना कौतुकाने नावाजते असे प्रेमाचे सार्थकतेचे अनेक क्षण देणारा हा व्यवसाय करायला मिळणे शक्य झाले तोच माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे..आणि असे अनेक memorable moments ही जमा पूंजी जी रोज वाढते आहे
Dr. विभा देशपांडे
एक डॉक्टर म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे ज्यावेळी मी भारतीय सैन्यासाठी परफॉर्म केले. DOCS या आमच्या Dr गायक समूहाला भारतीय सैन्यासाठी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील तवांग या ठिकाणी आमची कला सादर करण्याची संधी मिळाली. आपल्या सैनिकांसह आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी आमंत्रित होते. आपल्या रक्षणासाठी सदैव तयार असणाऱ्या आपल्या सैनिकांना आणि त्यांच्या मदतनीसांना आमच्या कलेने आनंद देताना आणि त्यांना आमच्या गाण्या वरती थिरकताना पहाणे सर्वांसाठीच खूप आनंदाचे होते.
माझ्यासाठी हा क्षण डॉक्टर आणि गायक म्हणूनही आजवरचा सर्वाधिक आनंददायी आणि गौरवशाली क्षण आहे.
डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर
०१-०७-२०२५
Excellent Dedication by each mentioned doctor above for the benefit of the society. Very humble approach by every one . Today , I would like to salute all the doctors who helped people to bring happiness in their lives . Truly grateful to each one of you! Regards Prashant Kulkarni, Banker Pune.