गुंतवणूकदेश विदेशब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)मनोरंजनयुनिटी बिझनेसवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय

अक्षय पारखी – लेख क्रमांक १ – प्रत्येक व्यक्ती करोडपती या आपल्या संकल्पनेवर आधारित ९ ते १५ ऑक्टोबर या इन्व्हेस्टमेंट वीक मधील इन्वेस्टर्स अवेअरनेस वीक मधील हा आज चा पहिला लेख

फंडामेंटल्स ऍनालिसिस

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन नेहमी वेगवेगळ्या विषयावर सतत काम करत असते , असच आज पासून ७ दिवसांचा विषय – इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक –  SEBI च्या भारत इन्व्हेस्टमेंट वीक ची सुरुवात शेअर मार्केट च्या फ़ंडामेंटल्स पासून

Share Market हा इकॉनॉमिक इंडिकेटर मानला जातो. मराठी आणि ब्राह्मण समुदाया साठी Share Market इन्व्हेस्टमेंट काही नवीन नाही. ऐके काळीं गुजराथी, कच्छी समाजाचे वर्चस्व किंवा त्यांनाच Share Market कळू शकते, असे काहीसे जरी वाटत असले तरी, Share Market हा बुध्दी चा विषय आहे. बुध्दी म्हणाली कि ब्राह्मण हे अघोषित सत्य आहे. एखाद्या विषयांत अभ्यासाने , सखोल analysis करून प्राविण्य मिळवणे हा तर ब्राह्मणाचा हातखंडा.

अशा कामात काहीवेळा समाजात लागणारी जवळीक किंवा समाजातील लोकं बरोबर मिळून कामं करण्याची थोडी वृत्ती कमी असल्याने आपण कुठे मागे आहोत असे कधीतरी वाटते.

अर्थात ब्राह्मण युनिटी सारख्या सामाजिक चळवळी मूळे हे बोलणे थोडेसे चुकीचे ठरेल. whatsapps  ग्रुप पासून इन्व्हेस्टमेंट शिबीर किंवा monthly मीटिंग, प्रत्येक मेंबर्स शी ठेवलेला पर्सनल touch त्यामुळे share market बद्दल असण्याऱ्या शंका, इन्व्हेस्टमेंट guidance, फंड allocation अशा प्रश्नांचे निरासन केले जाते. ब्राह्मण युनिटी या चळवळीला शतशः प्रणाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा.

इन्व्हेस्टमेंट / Trade कशी सुरवात करावी- थोडक्यात

एखादी इन्व्हेस्टमेंट किंवा Trade करायचे  तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे Systematic Planning. काही जवळचे लोकं ह्यात पैसे टाकत आहेत, आपण पण थोडे टाकून बघू. किंवा कमी वेळात भरपूर रिटर्न्स मिळून जातात त्यात आपण पण आपले नशीब आजमावून बघु अशा गोष्टीने सुरवात करणे किंवा होत असावी. ह्या विचाराने entry होणे पर्यन्त योग्य आहे, पण हि आपल्याला जमेल किंवा आवडेल अशी गोष्ट आहे तर थोडा pause घेऊन systematic इन्व्हेस्टमेंट/Trade चे प्लांनिंग करावे.

Systematic Planning मंध्ये ह्यात लागणारा पैसा, द्यावा लागणारा वेळ, आपला स्वतः चा अभ्यास आणि आपल्याला काही adviser ची लागणारी जरुर ह्या काही बेसिक गोष्टी चे deep thinking आणि योग्य वाटले तर ते लिहून ठेऊन मग पुढे जाणे योग्य. हा फक्त नवीन लोकं जे entry घेतात त्यांच्या साठी नाही तर सगळ्या लोकांना जे Share Market शी संलग्न आहेत त्यांना हे ठरवावे लागेल.

Analysis Technique ऑफ market

Share Market च्या संदर्भात दोन प्रकारचे Analysis केले जातात. Fundamental Analysis आणि Technical Analysis. दोन्ही analysis, करण्याची पध्दत खूप वेगळी आहे. ह्या लेखात मी Fundamental Analysis वर माहिती देणार आहे

Fundamental & Technical Analysis चा वापर किंवा Technique इन्व्हेस्टमेंट आणि Trading ह्या पॅटर्न मध्ये होत असते. मात्र Ultra Short Term Period मध्ये Fundamental Analysis ची technique वापरायला खूप knowledge अवगत लागते किंवा ते applied होईल असे नाही.

इन्व्हेस्टमेंट म्हणजे एखादा Share DEMAT account ला घेऊन काही ठराविक वेळेसाठी ठेऊन आपल्याला हवे असलेले रिटर्न मिळाले कि त्यातून बाहेर पडणे, असा काही Fundamental Analysis चा प्रवास असतो. वर म्हणाल्या प्रमाणे Investment हि Fundamental Analysis मधून योग्य पद्धतीने होऊ शकते

Fundamental Analysis in Detailed 

जेव्हा आपण Shares  म्हणजे एखाद्या कंपनी मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतो, साहजिक पणे ती कंपनी हि पैसे गुंतवण्यास योग्य आहे का नाही हे प्रथम ठरवणे महत्त्वाचे.

Stock selection हि महत्वाची गोष्ट. मी वर सांगितल्या प्रमाणे Fundamental Technique ऑफ Analysis ने, गोष्टी explain करणार आहे.

Fundamental Analysis मध्ये काही parameter असतात. त्यात कुठला stock निवडावा, ह्यात इन्व्हेस्टमेंट long, medium, शॉर्ट किंवा करू नये हे समजू शकते. Shares मधे Multibagger, Wealth Creation through stock market, value pick  हे Fundamental Analysis मुळे कळते. अर्थात ह्या साठी खूप सारी पूर्व तयारी, Experience, खूप सारे Patience, Stable Temperament लागते. हे एका दिवसात  येते असे नाही.

१) कंपनी निवडताना, कंपनी चे प्रोमोटर्स म्हणजे जे day to day कंपनी कशी चालवणार त्यांची माहिती असणे खूप जरुरी आहे. Infosys, ICICI बँक सारख्या कंपनी प्रोफेशनल ग्रुप ऑफ people manage करतात. ज्यांचा आजचा पर्यन्त चा प्रवास खूप चांगला आहे आणि ह्याचा पुढचा प्रवास growth related असणार. अशा  प्रोमोटर्स वर खूप माहिती गोळा केली किंवा नाही तरी चालून जाते. तीच गोष्ट टाटा समूह किंवा HDFC ग्रुप साठी लागू होते. आपल्या पोर्टफोलिओ मध्ये अशाच प्रकारच्या कंपनी असतील, तर ठीक. पण काही Unknown or प्रोमोटर्स with bad or wrong reputation असण्याऱ्या कंपनी मध्ये आपण इन्व्हेस्ट करीत आहोत का हे पडताळून घेणे जरुरी आहे.

Share Investment मध्ये Retail Investor हा जरी महत्वाचा घटक असेल तरी, तो खूप एकसंध/ एकत्र असा कधीच नसतो, म्हणजे ICICI बँक चे रिटेल इन्व्हेस्टर हे HDFC बँक मध्ये असतील असे नाही. त्यामुळे त्याची एकत्र कृती होऊ शकत नाही. एखादा प्रोमोटर जर आपणास योग्य नाही वाटलं तर त्याला कंपनी चा Directorship वरून आपण सहज बाहेर काढू शकत नाही. त्या मुळे काही प्रोमोटर्स ची Background योग्य नाही वाटली तर बरेच वेळा रिटेल investor, इन्व्हेस्टमेंट करत नाही. उदाहरण घ्याचे झाले तर Adani Group. आज एका वर्षात जेवढ्या काही बातम्या आल्या त्यामुळे ह्या ग्रुप च्या Corporate Governance वर काहीशी शंका आली आहे.

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी, हे प्रोमोटर बघून कुणाचे Share Purchase करायचे हे  आपापले आपण ठरवायचे.

प्रोमोटर्स चा त्याचा business मध्ये असणारा Experience, त्यांनी दिलेला Growth, future प्लॅन फॉर business, कंपनी पुढे घेऊन जाण्या साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी फक्त फक्त प्रोमोटर्स ड्राईव्ह करत असतात. एका इन्व्हेस्टर साठी हे आणि हेच महत्वाचे असते, ते समजून घेऊन इन्व्हेस्टमेंट करणे योग्य ठरते.

आपल्या या Analysis ची बरीच माहिती हि त्या कंपनी च्या Website, BSE, NSE च्या website वर मिळून जाते.

Official Information हा फक्त आणि फक्त इथेच असते. शॉर्ट cut म्हणून मार्केट मधील Readymade अँप वापरून काहीतरी झटपट शोधणे हे टाळलेले तर बरे. ह्या अँप ची information ची सत्यता पडताळता येत नाही. कंपनी website किंवा BSE NSE ला चुकीची माहिती दिली तर कंपनी वर लीगल Action होते. तेच आपण एक अँप वरून काही माहिती घेतली तर authenticate किंवा खरी आहेच हे गृहीत धरणे घातक ठरू शकते.

आपल्याला ह्यात प्रोमोटर्स बध्दल काही negative गोष्ट म्हणजे त्याच्या वर काही पर्सनल legal cases असणे, त्याने किंवा कंपनी ने Default इन payment ऑफ taxes/ Bank Interest केले आहेत का, social स्टेटस, ED किंवा अशी काही कारवाई सुरु आहे का हे check करायचे असते.

आज कुठली पण कंपनी, एक प्रोमोटर किंवा त्याचे डायरेक्टर चालवत नसतात. पण हे लोकं कंपनी चालवायला policy, procedure, ethics घालून देतात. ती त्याच्या कंपनी च्या employee ला binding असतात. Infosys मध्ये विशाल सिक्का आणि टाटा ची मिस्त्री फॅमिली बरोबर ची घटना हेच सांगतात कि प्रोमोटर्स कंपनी मध्ये daily active नसले तरी, if they see something not going as per कंपनी policy, ethics for which company is started then प्रोमोटर्स do take some strong/tough decisions. Company चे vision हे प्रोमोटर्स च ठरवतात, त्या प्रोमोटर्स च्या गाडीमध्ये आपण प्रवास करायचा आहे का नाही हि माहिती check करून पुढची दिशा ठरवणे योग्य राहते

२) कंपनी चे प्रॉडक्ट & सर्व्हिसेस ची माहिती.  हि अजून एक महत्वाची गोष्ट.  बरेच वेळेला investor ला कंपनी काय विकते हेच माहिती नसते.

आपली इन्व्हेस्टमेंट हि जरी आज करत असलो तरी, येणाऱ्या काळात त्याचे Demand चे काय समीकरण असेल ह्यावर  कंपनी चा future performance ठरतं असतो.

COVID नंतर बराच बदल झाला, भारताला COVID ची सगळ्यात जास्त झळ पोहचेल किंवा पोहचावी अशी काहीशी विचार धारणा जगातील काही प्रगत म्हणाल्या गेलेल्या देशांनी केली होती, पण झाले काहीतरी वेगळे. चांद्रयान III ने जगास भारत काय आहे आणि काय करण्याची ताकद ठेऊन आहे ते सांगून दिले आहे. भारत हा जगात असा एक देश आहे कि जो दुसऱ्याचा अधोगती वर आपली प्रगती साधत नाही.

खूप लिमिटेड पैस्यात आणि कमी वेळात भारत जगात वस्तू पुरवू शकतो  आणि हे त्यांनी जगाला सिद्ध करून दाखवले आहे. Defense सेक्टर मधे आलेला growth हे अजून एक उदाहरण आहे.

ह्या सगळया changes ला आपल्याला monitor करावे लागते. कंपनी च्या प्रॉडक्ट बद्धल ची माहिती आणि त्याचा business वर असलेला impact जाणून घेऊन इन्व्हेस्टमेंट करावी.

काही प्रॉडक्ट ची किंवा एका सेक्टर ची business cycle असते. जसे आता Speciality chemical हे तसे कमी समजणारे क्षेत्र/sector आहे, पण त्या कंपनीत बनलेल्या वस्तूंचा वापर  आपल्या दैनंदिन जीवनात directly/ indirectly  होत असतो . त्याची demand कमी होणार नाही . आता एक दोन quarters चे results या कंपनी चे फार चांगले नाहीत. पण भविष्यात जेव्हा world economy back on track येईल तेव्हा या कंपनी परत त्यांचा growth दाखवतील. हे असे business trends/cycles चेक करावे लागतात.

३) प्रॉडक्ट आणि सर्विसेस शी related असते ते, Current and Future Economic policies of the country. मागील काही महिन्यात Railways, Infrastructure sector ला खूप बुस्टिंग मिळेल असे changes झालेले दिसले. Railways ला या वर्षी रॅकोर्ड बजेट fund दिला आणि त्याचा impact असा झाला कि भारतात रेल्वेस ला नवीन बळ मिळाले.

इंडियन Govt. PLI scheme लाँच केल्या आहेत. ह्या scheme मूळे long term investment भारतात येणार आहे. त्यांनी इकॉनॉमी ला मोठा boost मिळेल.

हे जे पण बदल होत असतात, त्या companies’ आणि sectors वर विशेष लक्ष ठेवणे आणि अशा companies मधे इन्व्हेस्टमेंट करणे हा option असतो.

त्या मूळे कंपनी, product line, economic growth ऑफ the country, कुठे होणार आहे ह्याचा अभ्यास Fundamental Analysis मध्ये केला जातो.

४) Fundamental Analysis मधील अजून एक महत्वाचा भाग हा Study of Financial Statement चा असतो. ह्यात Financial statement वाचण्याचे  आणि त्यातील माहिती गोळा करण्याचे काम असते.

PE म्हणजे Price Earning Ratio, म्हणजेच Fundamental Analysis हा एक समज Investor मधे टाकलेला आहे. बरेच जण PE हे Fundamental Analysis चे सार समजून, मी हे बघितले असे सांगून Investment Decision घेतात.

Financial Analysis मध्ये खालील घटकांचा सखोल अभ्यास केला जातो :-

1 Understanding the growth ऑफ the company in last ४-५ years बघणे.

2 हा Growth Turnover आणि Profitability दिसत आहे का

3 Company बाकीची कंडिशन म्हणजे Reserve & Surplus, Secured Loan, इन्व्हेस्टमेंट In Group company, Cash & Bank Balances बघणे.

4 EBITA ( Earnings Before Interest & Tax ) किंवा operational margin improvement check करणे.

5 Manufacturing companies साठी, Raw Material cost stable असणे

6 Promoters Share pledging

7 Audit Report मधे qualification reported points बघणे

8 एक्स्पोर्ट Revenue growth आणि reduction इन Import cost check करणे

9 Comparing company with another company ऑफ the same सेक्टर

साधारण पणे आताचा Financial स्टेटमेंट ची reporting हि Year on Year म्हणजे Last Year आणि Current Year च्या financial numbers वर reporting होते. ह्या data मधे खूप variation आले तर ते further analysis केले जाते .

हे सोडून, कंपनी related news त्या newspapers मधील असेल किंवा Exchanges च्या website वर असतील, त्या वर लक्ष ठेवणे आणि त्या news चा impact Analysis करणे.

ह्या ज्या पण Steps आहेत त्याने कंपनी ची ३६० degree मधे checking केली जाते. त्यात मिळालेला comfort हे आपल्या stock selection च्या decision मधे मदत करते.

असे होऊ शकते कि या parameter मधे कंपनी योग्य बसत नाही, तरी कंपनी चे share price वरच जाते आहे. ह्यात कधी sector on focus असू शकतो, काही news आपल्याला माहित नसाव्यात म्हणजे वाचनात नाही येणे, किंवा immediate time period  मधे येणार असेल तर तो impact.

बरेच दिवस काहीच न होता one side share price वाढत असेल तर ते speculative movement मूळे होऊ शकते. अशा shares मधे investment करावी का नको हा प्रत्येकाचा decision असतो .

Summary

१) इन्व्हेस्टमेंट हि Fundamental, Technical analysis, कधी दोन्ही चे मिश्रण करून करतात. सगळयात महत्वाचे म्हणजे आपले इन्व्हेस्टमेंट vision, पोर्टफोलिओ growth, ह्यात लागणारा पैसा ह्याचा systematic planning करून गुंतवणुक केली तर चांगले results मिळू शकतात.

२) Fundamental Analysis हा जसा शाळेत गणित फार कठीण पेपर बरेच जणांना वाटत असायचा, तसा वाटू शकतो. पण Fundamental किंवा technical analysis असो वेळ द्यावाच लागतो. Fundamental analysis ला सुरुवातीला वेळ लागला तरी एकदा सवय झाली कि analysis लवकर होते.

३) Shares Investment हि साधणार पणे एक वर्ष करावी. एखादी कंपनी ला perform करायला तेवढा वेळ देणे आवश्यक असते.

४) IPO मधे आलेल्या कंपनी past trend नसल्यामुळे त्यांना Fundamental Analysis मधूनच buy करता येते.

५) इन्व्हेस्टमेंट मधे decision हा मुख्य भाग आहे , तसेच Investor ने ठरवायचे असते कि त्याचा इन्व्हेस्टमेंट horizon किती आहे. Ultra short term म्हणजे आज घेऊन आजच किंवा उद्या विकायचे असेल, तर fundamental of any company never change so fast.

Identifying right stock for reasonably good time is smart investing.

आपला,

अक्षय पारखी   98201 00464

Related Articles

4 Comments

  1. Very nice article Akshay Sir, पहिल्याच लेखात जोरदार सुरुवात झाली आहे, माहितीपुर्ण लेखासाठी धन्यवाद !

  2. अतिशय सोप्या आणि सुंदर शब्दांत माहिती दिली आहे. खूपच अभ्यासपूर्ण विवेचन. आमच्यासारख्या शेअर बाजारात एकदम नवख्या माणसाला सुद्धा पटकन योग्य माहिती कळेल अशा भाषेत समजावल्याबद्दल आपले खूप खूप आभार.

  3. खूपच छान आणि अगदी नवख्या ना सुद्धा समजेल असेच उदाहरणं देऊन उत्तम लेख झाला आहे. साहजिकच पुढच्या लेखाची वाट बघतोय 🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}