*मुड * श्रध्दा जहागिरदार
*मुड *
माझा कशातच मुड नव्हता. काहीच करा वाटत नव्हते. पुस्तक वाचते”नको
बाई कंटाळा आला “गाणं म्हणू ” ते म्हणायची ईच्छा नाही” घरातील जास्तीचे काम करु या ” दिवसभर काम आणि स्वच्छता. बस जरा निवांत” हे सर्व प्रश्न माझी मला मी देत आहे बरका. म्हणजे आज कशातच ‘ ‘मुड’ लागत नव्हता. बसले सोफ्यावर निवांत , मनाला विचारले ” काय रे आज का असा बचैन आहेस? मनाने उत्तर दिले ‘ मुड ‘ च नाही लागत गं ”
डोक्यात विचार आला ” आहे तरी काय नेमका ‘मुड ‘ हा प्रकार?
अंतर्मनात गेले विचार करत करत. सगळे भेटले, राग, लोभ, मत्सर, द्वेष, माया, मोह अबब!! किती ते प्रकार. शोधत शोधत हा ‘मुड ‘ एके ठिकाणी सापडला. मनाची बरीच जागा व्यापली होती बरका त्याने.
मनाला विचारले एवढा हा ‘ मुड ‘ महत्वाचा आहे आयुष्यात?
माझी मीच उत्तरं सापडत बसले दिवसभरातील सगळी कामं आपल्या ‘मुड ‘ वर तर अवलंबून असतात. सकाळी उठले की कधीकधी ईतका छान मुड असतो की पटपट कामं करतो. उत्साहात स्वयंपाक करतो, ऑफिस मध्ये जातो. त्या सकाळच्या ‘मुड’ ला पकडून आपला अख्खा दिवस छान जातो.
” आज माझा सकाळ पासून मुडच नाही बाई”. काय झालेले असते? काहीतरी वाईट बातमी ऐकलेली असते, उगाच उदास वाटते, कोणाशी तरी वादावादी होते वगैरे.या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर होतो व ते ‘मुड ‘ मध्ये परिवर्तन करते.मुड ने मनाचा ताबा घेतला की शरिराची
सगळी परिस्थिती ढासळते.
कोणाकोणाचा कोणत्याही गोष्टी मध्ये नेहमीच मुड नसतो. आपण म्हणतो “कधी बघा ह्याचा कशातच मुड नसतो ”
हा मुड बदलण्यावर काही औषध आहे का? असे पण असते एखाद्याच्या आयुष्यात अशी कोणती तरी घटना घडते, घडलेली असते, सद्य परिस्थिती
वाईट असते ही व्यक्ती नेहमी नाराज, तिचा कशातच ‘ मुड ‘ लागत नाही. तरी बळेच आयुष्य जगत असते. मुड सुधारण्यावर कोणत्या डॉ.कडे जाण्याची गरज नसते. त्याचे आपणच डॉ. व्हावे लागते. ती उत्तरं आपणच शोधायची असतात. मुड नसतो पण अचानक मित्र- मैत्रीणी भेटतात. ‘ मुड ‘ एकदम फ्रेश होतो. तेथून पुढचा दिवस नक्कीच चांगला जातो.
‘ मुड ‘ नाही , ‘गाणं ‘पण ऐका वाटत नाही तरी मनाला बजावा ” तुला गाणं आवडतं ऐक,” मुड चांगला होईल. आणि खरच गाणं ऐकले की माणसाचा मुड, मन एकदम आनंदी होते. झाला ना बदल?”पुस्तक पण
वाचा वाटत नाहीये” तरी पण अशावेळी कथा, कादंबरी न वाचता तुम्हाला उत्साही करणारे, प्रेरणा देणारे, तुमच्यात बदल घडवून आणणारे मोठ्या लोकांचे सुविचार, त्यांची व्याख्याने ‘ मुड ‘ ला घट्ट पकडून वाचा, ऐका. ( युट्युब) वर आयते सगळे मिळते. त्यासाठी कोठे जाण्याची पण गरज नाही. पण ती कृती लगेच करा. बघा दिवस चांगला जाईल.
पण माझा ‘ मुड ‘ आज सकाळपासून नाहीचय. असे म्हणून त्याला कुरवाळत बसलात तर तो स्वत:चे अजून कौतुक करुन घेईल. स्वत: चे स्वरुप मोठे करेल. त्याचा परिणाम सहाजिकच तुमच्या शरिरावर, दिवसावर होईल.
बायको नवर्याला म्हणते ” मला
तुमचा सारखा मुड संभाळावा लागतो” किंवा ” त्याचा, तिचा मुड गेला ना तर ‘ती’, ‘तो ‘ काहीच काम करणार नाही
म्हणजे आयुष्यात ‘ मुड’ हा ईतका महत्वाचा आहे? म्हणजे ‘ राग, द्वेष, मोह, माया, मत्सर, लोभ या षड्रिपू मध्ये हा सातवा पण आहे का?
ईश्वराने मानवाची निर्मिती करताना हे षड्रिपू मानवाला दिले पण ‘ मुड ‘ हा
तुमच्या हातात आहे. ”तुमचा मुड संभाळावा लागतो” “त्यांचा मु ड गेला तर काहीच काम होणार नाही.” आपण दुसर्यांचा ‘मुड’ संभाळण्यापेक्षा प्रत्येकानेच आपला मुड संभाळला तर रोजचा दिवस आनंदात जाईल.
*मुड को खराब मत होने देना
याद रखो, पुरा दिन खराब हो जायेगा*
एवढ्यात माझ्या आवडीचे गाणे ऐकू आले. ” जिंदगी हर कदम एक नयी जंग है”
गेलेला मुड परत आला व उत्साहाने कामाला लागले.
श्रध्दा जहागिरदार 🙏🙏
छान