देश विदेशमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 6 and 7

कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 6 and 7

आज सकाळी वूड हाऊस च्या सीटिंग viewing गॅलरी मध्ये बसून मस्तपैकी चहा घेतला , आपल्या कीटल मध्ये करून आणि आज कुन्नूर ची व्हिजिट होती कुन्नूर साईट सिईंग त्याच्यासाठी साडेनऊ वाजता गाडी येणार होती माझी गाडी पार्क होतीच , आम्ही इकडची लोकल वेहिकल हायर केली कारण इथे पार्किंगचा बराच प्रॉब्लेम आहे म्हणजे कुठल्याही स्पॉटला गेल्यानंतर आपल्याला पटकन पार्किंग मिळेल असं नाही आहे इथे जागा खूप कमी आहे त्याच्यामुळे ड्रायव्हर असलेली गाडी बेटर ऑप्शन म्हणून आम्ही आमची गाडी इथेच ठेवली आणि हायर केलेली वेहिकल घेऊन जायचं ठरवलं

सकाळचा नाश्ता इडली सांबर आणि वडा असं सांगितल्यावर त्यांनी दोन इडल्या आणि एक वडा असं पॅकेज करून दिलं आणि त्याच्याबरोबर चहा झाला आणि फुल्ल एनर्जी घेऊन आम्ही आमच्या ड्रायव्हर साठी आणि गाडीसाठी वाट बघत थांबलो

त्याच्या आधी आम्ही इथे खाली नवीन छान ग्राउंड वरती कर्नाटक हॉर्टिकल्चर एक सुंदरसं केलेलं ग्राउंड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये आकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चालणं आहे ही व्हेईकल आहे सो असा सगळा अनुभव घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो

थोडेफार डीपी साठी तयारी केली वेगवेगळ्या ठिकाणी छान फोटो ऑटो काढले आणि तोपर्यंत ड्रायव्हरचा नऊ वाजून 28 मिनिटांनी फोन आलाच आणि नऊ 35 ला आम्ही गाडीत बसून निघालो

कुन्नूर नावाच्या आपल्या उटीपासून जवळपास 22 22 किलोमीटर वरती असलेल्या अशाच एका निसर्गरम्य ठिकाण बघायला आणि त्याच्या आसपासचा असलेल्या साईट seeing

उटी हुन निघून कुन्नूर च्या वाटेवरती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागते ती केटीज व्हॅली एकदम अशी पिक्चर्स आणि सुंदर व्हॅली आहे की सगळ्या बाजूने डोंगर आणि वर वर अशी येणारी घर त्याचबरोबर हिरवं गार सगळीकडे एका साईडला निलगिरीची झाड दुसऱ्या बाजूला सिल्वर ओक मध्येच मेडोज आणि मध्ये मध्ये छान सुंदर सुंदर घर असे ती पिक्चरच व्हॅली होती आणि असे पुंजके पुचके होते छोट्या गावांचे किंवा अशा वाड्या असतात ना अशा टाईपचे सो बघायला खूपच सुंदर वाटत होतं इथे एकच जाणवला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉईंटला यांची एन्ट्री फी असते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला भुर्दंड आहे काही कारण नाही खरंतर म्हणजे एकदा बनवून ठेवलेली जागा आणि कायमचे पैसे वसूल करण्याची पद्धत हा काही प्रकार तितकासा पटत नाही पण ठीक आहे आपण एकदाच येतो कधीतरी म्हणून आपल्याला करायला काही विषय नाही

केटी व्हॅली मधून छानसे फोटो काढले दोन चार डीपी काढले इथे एक माने नावाचे पुण्याहून आलेले गृहस्थ आणि त्यांची फॅमिली मुलं वगैरे सगळे भेटले म्हैसूर मध्ये त्यांचा मुलगा इन्फोसिस मध्ये कामाला आहे आणि अख्खी फॅमिली त्याला भेटायला म्हणून आलेली आणि तिथून पिकनिकला पुढे आलेले होते

कॅट्स व्हॅली नंतर आम्ही पुढे गेलो ते वेलिंग्टन मिलिटरी कॅन्टोन्मेंट कडे इथे मद्रास रेजिमेंट हेडकॉटर आहे त्यांचं म्युझियम पण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं वार मेमोरियल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी गाजवलेल्या शौर्यगाथा याचं पिक्चर्स मध्ये केलेले प्रेझेंटेशन एक बोट आहे त्यांची त्याच्यानंतर मोठी तोफ आहे एक विमान मेक २१ पण त्यांनी प्रतिकृती केलेली आहे आणि असं सगळं बघत बघत कारण आपल्याला काही ठराविक एरियातूनच जायला लागतं आणि तिथे कुठल्याही प्रकारे गाडी थांबवायची आपल्याला सोय नसते त्याच्यामुळे फोटो काही खूप सारे नाही काढता आले आणि काढायची असं वाटलं नाही कारण आपलं मिलिटरी इन्स्टॉलेशन आहे ते कुठेही अशा प्रकारे फोटोमध्ये न येणे जास्त चांगलं त्यादृष्टीने आम्ही नुसतं बघत गेलो आणि मद्रास रेजिमेंटच्या गोल्फ कोर्स कडे गेलो तिथे मात्र फोटो काढायला अलाऊड आहे आणि त्याचे फोटो मी काढलेले आहेत गोल्फ कोर्स बघून आम्ही कुन्नूर मध्ये सीम्स पार्क अशा नावची गार्डन साईट seeing प्लॅन नुसार जी होती त्या ठिकाणी पोचलो

 

सिम्स पार्कमध्ये पाईन , सिल्वर ओक , यूकॅलिफ्टस , त्याचबरोबर हो टर्पेंटाइन होतं, रुद्राक्षाचे झाड, निलगिरी अशा प्रकारची विविध झाड आणि प्रचंड उंच उंच वाढलेली झाड त्याचेही काही फोटो आम्ही काढले आणि खाली एक लहान मुलांसाठी छोटासा लेक होता त्या लेक ला एक राऊंड मारली आणि फिरत फिरत वर आलो आणि सिम्स पार्क चांगला स्पॉट आहे पण प्रत्येक ठिकाणी तिकीट हा एक विषय आहेच आणि ते बघून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो ते गेलो निलगिरीच्या फॅक्टरीला तिथे ती गार्डन होते ती गार्डन फार छानच आहेत म्हणजे कुन्नूर मध्ये आणि उटी मध्ये प्रचंड चहाची लागवड आहे ही लागवड रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिसते त्याचबरोबर ही झाडं जी आहे ती साधारणपणे आपल्या कमरेएवढी किंवा अगदीच जास्तच उंच वाटली तर आपल्या छाती एवढी याच्याच पलीकडे त्याच्या पलीकडे ती काही झाड उंच होत नाहीत आणि या सगळ्या झाडांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चहाचं सॉर्टिंग करून आपल्यापर्यंत चहा पोहोचवला जातो तो अगदी दोनशे रुपये किलो असेल किंवा एक लाख रुपये किलो असेल तर त्याप्रमाणे त्याचा कटिंग होतं आणि अगदी वेगवेगळे पोर्शन्स कसे असतात आणि त्याचा कशा प्रकारे चहा मध्ये रुपांतर केलं जातं याच्यासाठी आम्ही नंतर एका फॅक्टरी सुद्धा जाऊन आलो

       

इथे मसाला चहा, दालचिनी चहा , जिंजर चहा , चॉकलेट चहा आणि असे शेकडो प्रकारचे चहाचे व्हरायटीज आहेत त्याच्याबरोबर प्लेन टी पण आहे आणि ते बघून आम्ही थोडासा चहा त्या टी फॅक्टरीतून घेतला त्याचबरोबर त्या टी फॅक्टरी च्या वरती स्ट्रॉबेरी फार्म एक होतं त्या आपल्या महाबळेश्वर सारखी नबीला नावाची जी स्ट्रॉबेरी आहे ती स्ट्रॉबेरी इथे पिकवली जाते आणि त्या स्ट्रॉबेरी फार्म मध्ये सुद्धा , आम्ही साबण बघितले वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॉबेरी खाऊन बघितल्या त्याचबरोबर तिथे वाईन टेस्टिंग सुद्धा होतं त्याचा आनंद घेतला आणि त्याच्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइल आणि अशा सर्व प्रकारच्या वस्तू लोकल मेड होत्या

तिथून आम्ही पुढे गेलो ते लॅम्बस रॉक आणि डॉल्फिन न्यूज बघायला तिथून कोइमतूर शहराचं अतिशय सुंदर असं दर्शन होतं आणि निलगिरी हिल्स म्हणून ज्याला आपण म्हणतो त्या खरोखर निलगिरी सारख्याच म्हणजे निळ्या निळ्या अशा दिसणारा ते आकाश आणि उंच उंच वाढलेली आकाशापर्यंत पोहोचणारी झाड असं सुंदर दृश्य तिथून बघता येते आपल्याला डॉल्फिन नोज म्हणजे असा जागा आहे की तिथून जो समोर असलेला हे दिसतो डोंगर दिसतो तो डोंगर आपल्याला डॉल्फिनच्या नो सारखा दिसतो म्हणून त्याला डॉल्फिन नोज पॉइंट म्हणतात ते सगळं बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि परतीच्या वाटेवरती आम्ही आलो कुन्नूर च्या मार्केटमध्ये
परंतु कुन्नूरच्या मार्केटमध्ये कुन्नूर मधली अशी कुठली वस्तू वेगळी म्हणून आम्हाला काही दिसली नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ न दवडता परतीच्या दोडाबेट्टा हे जे उटीच्या जवळ असलेलं एक सगळ्यात उंच शिखर आहे त्या शिखरावरती जायला निघालो

दोडाबेट्टा हे शिखर या पर्वत रांगेतले दुसरे सर्वात उंच शिखर आहे जायला यायला अत्यंत सोप्प आठ हजार सहाशे फूट डोडाबेट्टा हे दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत:

🌄 स्थान व उंची
– हे शिखर तमिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात ऊटकमंड (ऊटी) जवळ आहे.
– याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे २,६३७ मीटर (८,६५० फूट) आहे.

🌿 भूगोल व वनस्पती
– डोडाबेट्टा शिखर ग्रॅनाइट खडकांनी बनलेले असून गवताने आच्छादलेले आहे.
– परिसरात सिंकोना वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

🔭 पर्यटन व वेधशाळा
– शिखरावर एक वेधशाळा आहे जी पर्यटकांना दूरबीनद्वारे निसर्गदृश्य पाहण्याची संधी देते.
– ही वेधशाळा तमिळनाडू पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवली जाते.
– उन्हाळ्यात गिर्यारोहणासाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे.

📍 विशेष नोंद
– हे शिखर पश्चिम घाटातील अनाईमुडी शिखरानंतर दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर मानले जाते.

दोडा बट्टा शिखरावरती खूप गर्दी होती पण जागाही तशी मोठी आहे त्याच्यामुळे सर्वांना शिखरावरून दिसणारे दृश्य नीट बघता आली आणि तिथून दिसणारे उटीचं अत्यंत सुंदर सुदर्शन मिळालं त्याचबरोबर कुन्नूर सुद्धा दिसत होते दोन्ही शहर एकाच पीक वरून ही दिसत होती आणि टेंपरेचर पण पटापट कमी होत गेलेलं होतं त्यामुळे 14 15 डिग्री टेंपरेचर होतं आणि 8600 फूट उंची वरती गेल्याचं एक समाधानही होतं सो तिथे थोडावेळ भटकलो आणि त्याचबरोबर चहा घेतला मसाला चहा आणि थोडा वेळाने तिथून खाली यायला सुरुवात केली

नंतर आम्ही आलो बोटॅनिकल गार्डन मध्ये सगळ्या शहरातल्या बोटॅनिकल गार्डन सारखेच ही पण एक गार्डन फुलं खूप सारी प्रचंड प्रकारच्या व्हरायटीज ग्लास हाऊस मध्ये ठेवलेले शेकडो वेगवेगळ्या प्रकारची झाड आणि फुल झाड त्याचबरोबर एक मस्त ग्राउंड त्याच्यामध्ये लोक बसून मस्त गप्पा मारत होते फोटो काढत होते त्याचबरोबर काही लहान मुलं खेळत होती अशा प्रकारचा मोठा ग्राउंड आम्ही तिथे थोडा वेळ फोटो काढले

खूप सारे फुलांचे ताटवे तिथे होते सूर्यफूल होतं वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती आणि त्याच्यामध्ये थोडेसे फोटो काढले आणि नंतर बेंच सारखा आकार दिलेला एक कारल्याचा बेंच होता तसाच एक सफरचंदाचा सुद्धा बेंच होता त्या दोन्ही बेल्टचे फोटो काढून आम्ही बाहेर पडलो आणि मग तिथून बाहेर पडलो ते रोज गार्डन बघायला

रोज गार्डन पण खूप छान आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबांची फुले तिथे आहेत पांढऱ्या गुलाब पिवळा गुलाब मिक्स कलरचा गुलाब त्याच्यानंतर लाल गुलाब लाल मधले वेगवेगळे कलर साडेसातशे पेक्षा जास्त जाती आणि 7500 पेक्षा जास्त झाड गुलाबाची ही एका ठिकाणी आपल्याला अशा ठिकाणी बघता येतात या प्रत्येक ठिकाणी जायला फी ही आहेच तिकीट काही कमी होत नाही

दिवसभराच्या अशा या मोठ्या टूर नंतर आम्ही घरी आलो आणि छान पैकी डिनरचा आस्वाद घेतला रिसॉर्ट मध्येच आणि थंडी आता खूप वाढलेली आहे 13 14 डिग्री 12 डिग्रीपर्यंत टेंपरेचर रात्री येणार आहे त्याच्यामुळे वेळच्यावेळी पांघरूणामध्ये गुडुप्प होऊन उद्या सकाळी फ्रेश होऊन अजून काय काय बघण्याची तयारी करणार आहोत

गुड नाईट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}