भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 9 लेखक राजेश सहस्रबुद्धे

भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 9 लेखक राजेश सहस्रबुद्धे
अंकलेश्वर हॉटेल परादिस 3
मंदारच्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली, परमेश्वरानेच तिला माझ्या मदतीसाठी पाठवलं असणार,तो हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागला,थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याला यश आलं. शरीराचा एक अन एक भाग वेदनेने ठणकत होता, कपाळाला लागलेल्या मारामुळे येणारी कळ सहन होत नव्हती. अधून मधून लांडग्यांचे विव्हळणे… कोल्हेकुई, आणि विचित्र आवाज कानावर पडत होते…. होणाऱ्या वेदनेमुळे त्याच्या तोंडातून पण आता विव्हळण्याचा आवाज बाहेर पडू लागला… तो कसंतरी स्वतःला सावरत उठून बसला… त्या बाईने मग त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याचे डोळे बंद केले आणि काहीतरी मंत्र पुटपुटू लागली.. त्या मंत्रामुळे त्याला शरीरातील वेदना कमी होतायत अस वाटू लागलं.
“बाई तुम्ही कोण आहात..” त्याने भितभित त्या बाईला विचारले..
मी एका अभागी मुलीची आई आहे, माझ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्या हॉटेलच्या मालकाने तिचा बळी घेतला..… आमचा चिपळूणला मोठा व्ययसाय होता आणि मला काही दैवी सिद्धी प्राप्त होत्या….. आमचं हसत खेळत आयुष्य ह्या हॉटेल मालकाने काही दिवसात उध्वस्त केलं… मी सुड घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला… पण त्याने आम्हाला ठार करून इथेच……ह्याच जागी पुरलय,
त्या नराधमाने मग देवा कडकोळ कडून अघोरी सिद्धी हस्तगत केल्या आहेत… त्यामुळे मी आतापर्यंत त्याच्या केसालाही धक्का लावू शकले नाही… कदाचित परमेश्वराने त्याचा बदला घेण्यासाठी तुला पाठवल आहे.. तुझ्या डोळ्यात बदल्याची भावना मी पाहू शकते… त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठीच परमेश्वराने तुझी निवड केली आहे.. मी तुझ्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे पाहू शकते.. तू जेव्हा त्याच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला… त्यावेळेस आम्ही हॉटेलच्या बाहेर उभे होते… मंदारच्या डोक्यात लक्ख उजेड पडला,त्याने त्या बाईच्या चेहेऱ्याकडे हळूच पाहिलं……. त्या काकूच होत्या……
काकू सांगू लागल्या,हॉटेलमध्ये प्रवेश करण्याच्या आधी ,इथे पण आणि पॅगोडा मध्ये पण तुला जे अनुभव आले होते…तुला जे काही दिसलं ,भास झाले ते सगळ मी माझ्या मायावी शक्तीने निर्माण केले होते…ह्या हॉटेलच्या मालकाने बळी दिलेल्या कित्येकांच्या आत्म्याला मी आव्हान केले.. आणि त्यांना तुझ्या मदतीसाठी पाठवलं…. त्यात माझी मुलगी देखील होती,ह्या हॉटेल मालकाने जिला मारली तिची धाकटी बहीण, आज ती 92 वर्षाची आहे, चिपळूण मध्येच असते, तिनी देवा कडकोळ ला आपल्या बाजूला करून घेतलं त्याच्या करवी ती आता मला मदत करत असते. अत्म्यांची शक्ती त्या मालका बरोबर दोन हात करण्यास कमी पडते…..त्या फक्त तुला संकटातून बाहेर काढू शकत होत्या… त्याच त्या तीन सावल्या होत्या ज्या तुला दुसऱ्या मार्गाने बाहेर घेऊन आल्या,पण मध्येच त्या मालकाने डाव साधला.. आणि घात झाला.
मी दूर झाडावरूनच सगळ पाहत होते.. पण माझ्यात पण तुला मदत करण्याच सामर्थ्य न्हवते… तुला जेव्हा ओढत त्याने खडय्यात फेकून दिलं.. तेव्हा माझ सर्वांग झाडावर उलट पालट लटकत संताप व्यक्त करत होतं… त्याच्या नरडीचा घोट घ्यावा अस वाटत होत… पण जर मी त्या क्षणी तुझ्या मदतीला आले असते तर माझी देखील अवस्था तुझ्या सारखी झाली असती… त्यामुळे मी स्वतःवरचा संयम ढळू दिला नाही…वाट पाहत होते योग्य वेळ येण्याची,जेव्हा तुला खड्ड्यात गाढून तो निघून गेला.. मी झाडावरून सूर मारून लगेच तुला खड्ड्यातून बाहेर काढले… तुझा श्वास चालू होता… याचा अर्थ तू अजूनही जिवंत आहेस हे मला कळले… देवा कडकोळनी मंत्र सिद्दीने बाहुलीच्या सहाय्याने तुझ्या श्वासावर नियंत्रण मिळवलं…मग खूप वेळ वाट पहावी लागली.. तुझ्या शुद्धीवर येण्याची… तु शुद्धीवर येई पर्यंत तुझी जगण्याची आशा खूपच कमी होती.. ह्या जंगलामध्ये प्राणी आणि अतृप्त आत्म्यांशिवाय कोणीही नाही.. त्यामुळे तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचा प्रश्नच येत नाही… अजुन एक त्याने तुझ्या साईटवरच्या माणसाला पण कुठे तरी नेलयं.. तुला त्याला ही शोधावे लागणार..
“तुमचं नाव काय आहे… मंदारने खात्री करून घेण्यासाठी त्यांना भावविवश होऊन विचारले.”
त्या म्हणाल्या मला तू चांगला ओळखतोस ,मी काकू. मंदार म्हणाला काकू तुम्ही मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलय.. तुम्ही माझ्यावर केलेले उपकार मी आयुष्यभर विसरु शकणार नाही.. इथून पुढे माझ्या जीवनाचं एकमेव ध्येय आहे.. ह्या हॉटेलच्या मालकाला संपवणं.. जेणेकरून तो अजुन तुमच्या मुली सारख्या निष्पाप मुलींचे बळी घेणार नाही.. मी त्याला त्याच्या मृत्यू ची भीक मागायला लावणार.. त्याचा वेदनेने भरलेला आवाज माझ्या कानावर पडल्याशिवाय मला शांती लाभणार नाही…
मंदारला बिचाऱ्याला कल्पना पण न्हवती चिपळूण आणि अंकलेश्वर वर त्याच्या साईट चालू होत्या म्हणून तो जात होता आणि तिथेच तो चिपळूण अंकलेश्वर भूत गॅंग वॉर मध्ये ओढला गेला होता……..