Classifiedआगामी सूचनादुर्गाशक्तीदेश विदेशप्रोजेक्टस्ब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)युनिटी बिझनेसवैशिष्ट्यपूर्ण / फिचर
Trending

Cyber Security  आपली सुरक्षा आपलीच जबाबदारी.

Cyber Security

सायबर जगातील फ्रॉड आणि आपले व्हाट्स अँप किंवा गूगल  अकाउंट किंवा FB  सगळेच किती धोक्यात आणि धोकादायक आहे  बघा  … आजच घडलेला एक प्रसंग आणि त्यातून  शांत राहून काय काय करायचे याचे आणि मदत कशी मिळवायची याची एक घटनांची मालिकाच बघू

सर्वात पहिले म्हणजे हा फ्रॉड माझ्या बाबतीत घडला असता ……. घडलेला नाही .. पण ज्यांच्या मुळे सायबर गुन्हेगार माझ्या पर्यंत  आणि अश्या अनेक लोकांपर्यंत पोहोचले ते का आणि कसे याचे विश्लेषण करूया म्हणजे आपल्याला या पासून , स्वतःला , आपल्या सिनियर सिटिझन्स ना आणि मुलांना वाचवता येईल

ही घटना कोणाच्याही बाबतीत कधीही घडू शकते आणि आपली कोणाची काहीही चूक नसतांना ही  असे होऊ शकते यात किती मोठा धोका आहे पहा

 सांगतो …. . . . सांगतो …. . . .  माझ्या दृष्टिकोनातून

मला,  माझ्या मोबाईल मध्ये saved  असलेल्या एका कॉन्टॅक्ट कडून ( परिचित  .. नातेवाईत नाही – मित्र नाही – फक्त एका ग्रुप मध्ये असल्याने परिचित इतकंच )   मेसेज आला  दुपारी १२ ३५ ला ,  इंग्लिश मध्ये ,   कि मला पैसा हवे आहेत आणि मी संध्याकाळी रिटर्न करतो . , मुळात मी काही त्यांच्या जवळचा नाही त्यामुळे मला का असा मेसेज पाठवला .. . तरी  मी विचार केला कि  चार पाच तासासाठी का पैसे हवे आहेत अशी काय urgency  आली म्हणून त्यांना कॉल केला कि काय नक्की मदत हवी म्हणून   पण मोबाइल फोन बंद ..  मी  त्यांना असा रिप्लाय केला कि  आपण एकमेकांना इतके ओळखत नाही , भेट ही नाही त्यामुळे तुम्हाला जी  हवी असलेली मदत आहे ती आधी  तुमच्या स्नेही, नातेवाईक आणि आसपास राहण्यारा शेजाऱ्यांना विचारावे  आणि पाच सहा तासासाठी मदत पेक्षा ज्यांना हे पैसे द्यायचे आहेत त्यांना पाच सहा तास थांबायला सांगावे  आणि संवाद बंद केला   त्यांनी thumb  दाखवून विषय पुढे नेला नाही

त्या दिवशी पुढे काही संवाद नाही झाला, मला वाटले चुकून मेसेज केला असणार कोणा  सिमिलर  नावाच्या ऐवजी मला आला मेसेज असे समजून त्यांची अडचण काही असल्यास तो solve  झाली असावी अश्या समजुतीने गप्प बसलो

आज सकाळी ७. ३५ मिनिटांनी त्यांच्याकडून एक मेसेज आला  पुन्हा इंग्लिश मध्ये , कि तुम्हाला एक कोड  (सहा आकडी ) येईल तो मला पाठवा ,  आपण सर्व जण ऑन  लाईन फ्रॉड बद्दल ऐकतो वाचतो त्यामुळे थोडी सावधानता आपण  घेतोच   तशी मी घेतली आणि त्यांना विचारले हा कोड  कसला आहे , त्या वर व्हॉट डू  यु  mean  माझ्या फोन वर येत नसल्याने मी तुमच्या फोन वर पाठवला आहे ,  माझा आहे  , मला हवा आहे   असा थोडा स्ट्रिक्ट भाषा वापरून पाठवलेला मेसेज मी  ऑन  लाईन असल्याने लगेच वाचला आणि शंकेची पाल चुकचुकली  कारण तो कोड  आला होता आणि त्या वर  खाली दिलेले  ((रेफ युनिटी एक्स्प्रेशन लिंक ऑफ आर्टिकल )  चित्र   ज्या मध्ये दोन मोबाईल बाजूबाजूला दिसत असून त्यांच्या  टॉप वर  एक कोड  दिसत होता ,

 

 

आणि हे परिचित हा कोड  फोर्सफुल्ली , थोड्या स्ट्रिक्ट भाषेत मागत होते   

प्रोटेक्ट अँड डिफेन्ड फर्स्ट या डोक्यात  फिट्ट बसलेल्या विषयामुळे मी विचार करून  गूगल वर असा प्रश्न टाकला कि   “इफ सम वन  जेनेरेट्स  व्हाट्स अँप कोड .” . नुसते इथे इतके लिहिल्यावर लगेच गूगल ने सांगितले कि तुम्ही  generate  केलेला कोडे नसेल तर मोस्ट ऑफ द टाइम्स हा फ्रॉड चा हॅकिंग चा असा विषय असू शकतो म्हणून मी त्यांना पुन्हा कॉल केला त्या वेळी ही  लागला नाही

मग मी त्यांना मेसेज करून सांगितले कि असा कोणताही कोड तुम्हाला तुमच्या घरच्या व्यक्ती च्या मोबाईल वर generate  करता येतो मग माझ्या कडे का पाठवला आणि त्या नंतर क्लिअर सांगितले कि असा कोणताही कोड  मी share  करणार नाही

आणि त्यांचा नंबर ब्लॉक केला व्हाट्स अँप ब्लॉक केले

=================================

आमच्या ब्राह्मण  युनिटी फाऊंडेशन ची मेंबर असलेली आणि आमच्या ग्रुप मध्ये असलेली व्यक्ती कदाचित अडकली असावी या विचाराने स्वस्थ बसवेना आणि  फाऊंडेशन च्या मेम्बरशिप मध्ये यांचे नाव होते हे कळल्यावर त्यांचा नंबर, नाव चेक करून ऍड्रेस  मिळवला  आणि डिटेक्टिवगिरी करायला त्या ऍड्रेस कडे निघालो ,

पत्त्यावर पोहोचल्यावर कळले कि ते  दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले आहेत ती जागा समजून त्यांच्या  बिल्डिंग मध्ये security  मधून  सर्व एन्ट्री करून घरी पोहोचलो 

रिटायर्ड गृहस्थ , घरात होते आणि दार उघडता उघडता त्यांची पत्नी याच विषयावर कोणाशी तरी फोन वर बोलत होती  तेव्हाच कळले कि या काकांचा नंबर कोणीतरी हॅक  केला आहे म्हणून .

ओळख झाल्यावर काकूंनी काकांना सांगितले मी कशासाठी आलो आहे ते  आणि त्यांना ही  ते असह्य झाले आहे याची मला  जाणीव झाली

हे काका आहेत ७१ ७२ वर्षाचे आणि थोडा  आजार आहे त्यांना ,  मी जेव्हा त्यांना विचारले कि हे कसे झाले त्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी  सांगितले कि त्यांच्या एका  शाळेतील मित्राचा  त्यांना मेसेज आला  कि आलेला  व्हाट्स अँप कोड  पाठव आणि त्यांनी  मित्रच आहे असे समजून कोड पाठवल्यापासून त्यांचा मोबाईल Hack  झाला  आणि आता त्यांच्या मोबाईल मधील सर्व कॉन्टॅक्टस ना ही  तोच धोका निर्माण झाला होता  ज्यामुळे मला आणि माझ्या सारख्या किती तरी जणांना असेच मेसेज गेले होते

काकांचा नंबर काकूंनी लगेच त्यांच्या ओळखीचे असलेल्या सायबर फ्रॉड कंट्रोल मध्ये ओळख असणाऱ्या व्यक्तीकडे त्यांनी दिला for checking  , तो बंद  होता

आणि ज्यांच्याकडे काकूंचा नंबर  होता  ते विचारून समजून घेत होते तर काहींनी काही emergency  असेल असा विचार करून पॆसे पाठवले ही  होते  , आता त्यांना complaint  करून ते परत मिळवणे  किंवा पाणी सोडणे हे क्रमप्राप्त .

इथे मला त्यांची  मदत करता आली ,  आमच्या सायबर सेल मध्ये काम करणाऱ्या  मित्रामुळे ही मदत झाली त्याचे  म्हणजे आमोद वाघ याचे मनापासून  धन्यवाद   कॉल वर आमोद ने त्यांना काय काय करायला हवे आणि कुठे Complaint  करायची ,  बँकेत काय करायचे ,  क्रेडिट कार्ड email पासवर्ड आणि बँकिंग अँप ला two  स्टेप व्हर्टिफिकेशन का आणि कसे करायचे याची संपूर्ण माहिती देऊन कंप्लेंट करण्यासाठी guide  केले ..

 आता त्या काकू ही  प्रोसेस करून पुढच्या काही दिवसात यातून ते सर्व सुखरूप बाहेर पडतील .. त्यांना आपण आपल्या सर्वांतर्फे  काळजी घ्यायला सांगून यातून ते सुखरूप बाहेर पडतील अशी अशा करूया

 ==================================  

 प्रत्येक घर पर्यंत पोहोचलेली ही  थ्रेट / धमकी ,  घोक्याची सूचना ऑलरेडी  आता फार जास्त वेळा  आपल्याला संकटात टाकू शकत आहे

 आपण यातून काय घ्यायचे ??

 

 मी काही S O P देत नाहीये  कारण मी यातला एक्स्पर्ट नाही  , पण जे आपण करू शकतो त्याची एक चेक लिस्ट तरी पाहू करून

 1 एक तर कितीही जवळचे किंवा ओळखीचे कोणी असल्यास असा मेसेज आल्यावर आधी कारण काय ते जाणून घेण्यासाठी त्यांना किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना  कॉल  करून विचारावे

2 डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करूच नयेत बोलल्या ,  विचारल्या शिवाय , विचार करावा शांतपणे

3 आपल्या आप्त किंवा स्नेह्याला पैसे हवे असल्यास ती व्यक्ती आपल्याला कॉल का नाही करणार  नुसता मेसेज का करेल याचा विचार करायला हवा आणि आपणही कॉल   करायला हवा असा मेसेज बघितल्यावर

4 आपल्या बाबतीत असे घडले तर आपल्या मोबाईल मध्ये saved  असणाऱ्या सर्व कॉन्टॅक्टस ही  तितक्याच रिस्क मध्ये आहेत याची ही  महत्वाची जाणीव ठेवावी , आपल्याला सगळे कळते आणि आपल्या फसवू शकत नाही हा अति-आत्मविश्वास तर जराही नसावा , सिनियर सिटीझन नि या साठी आपल्या मुलांची मदत जरूर घ्यावी आणि ५० ६० वर्षाच्या लोकांनी — मुलांना काय कळते असे विचार न करता त्यांना विचारून  मोबाईल मधल्या परमिशन आणि ऍक्सेस  व्यवस्थित चेक करावे  Our Children are very smart and know more than you feel that they know

5 पासवर्ड बदलणे, अत्यंत सोपा  obvious  जन्मदिवस , नाव आणि अशी  कॉम्बो पासवर्ड न ठेवणे

6 अश्या बऱ्याच लहान लहान गोष्टी करून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही व्हाट्स अँप पोस्ट वर डोळे बंद करून trust ठेऊ नये हेच खरे

The statement “If anything is free, then you are the product” means that when a service or product is offered without a direct monetary cost, the provider is likely generating revenue by leveraging the user’s data, attention, or created content. Instead of paying with money, users pay with their personal information

“जर काहीही मोफत असेल, तर तुम्हीच प्रॉडक्ट आहात” या विधानाचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी सेवा किंवा उत्पादन थेट आर्थिक खर्चाशिवाय दिले जाते, तेव्हा प्रदाता वापरकर्त्याच्या डेटा, लक्ष किंवा तयार केलेल्या सामग्रीचा वापर करून महसूल निर्माण करत असतो. पैशाने पैसे देण्याऐवजी, वापरकर्ते त्यांच्या वैयक्तिक माहितीने पैसे अपहार करू शकतात

AI पण आता यात भर घालत आहेच आपल्याच मुलांचा , भावाचा,  वडिलांचा,  आईचा, बहिणीचा , मित्र-मैत्रिणीचा आवाज हे AI कॉपी करून आपल्याला कॉल वर तेच बोलत आहेत असे भासवून पॅनिक करू शकतात ,

विडिओ कॉल करून पैसे मागू शकतात .. अश्यावेळी आपली काय अवस्था होईल ,,

पॅनिक न होता परवलीचा शब्द प्रत्येक फॅमिली आपल्यासाठी असा स्पेसिफिक ठरवू शकते ज्यामुळे हे कळेल कि बोलणारी व्यक्ती खरी आहे का नाही , किंवा काही जुन्या आठवणी अश्यावेळी विचाराच्या कि एखाद्या प्रवासात काही महत्वाचे घडले ,  घटना किंवा जागा किंवा एखादा पासवर्ड किंवा आई वडिलांचे नाव किंवा गाव असे काहीही एक कन्फर्म करणारे वाक्य शब्द किंवा विडिओ कॉल असेल तर action तर ओरिजिनल आणि AI मधील फरक कळेल ,, नाहीतर येणार काळ अजून कठीण असेल

 ============================

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन या वर सतत काही ना काही अवेअरनेस पोस्ट शेअर करत असते त्याच मालिकेतील एक पोस्ट आपल्याला इथे वाचायला मिळेल 

============================

Brahman Unity Foundation

Social Awareness Drive

Be Aware – Cyber Crime – They are Following You

 

रोज कोणत्या ना कोणत्या फोन नंबर्स वरून अनेक कॉल्स येतात,  कोणता घ्यायचा कोणता नाही हा नेहमी पडणारा प्रश्न आहे.

True Caller वर खात्री केल्याशिवाय Unknown Calls घेऊ नये वा कॉलबॅक करू नयेत.

 आज तुमची इलेक्ट्रिसिटी, गॅस कनेक्शन बंद करणार आहोत.

  1. तुमचे पार्सल आले आहे, OTP द्या आणि पैसे भरा.
  2. CID / CBI / RBI मधून बोलत आहोत, तुमच्या फोन चा गैरवापर होत आहे.
  3. तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा अपघात झाला आहे.
  4. चुकून तुमच्या अकाउंटला पैसे भरले आहेत, ते परत देण्यासाठी नंबर द्या.

अशा प्रकारच्या अनेक कारणांनी, विविध प्रकारे तुम्हाला फसवले जाऊ शकते.

 आपले पर्सनल डिटेल्स त्यांना देऊ नये.

आपला कोणताही पासवर्ड वा OTP / CODE शेअर करू नये

*+91 या भारतीय नंबर्सच्या सिरीज शिवाय इतर कोणतेही कॉल्स शक्यतो अटेंड करू नये, (परदेशी नातेवाईकांचे नंबर्स आधीच सेव्ह करून ठेवावेत).

सर्वात महत्वाचे म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत पॅनिक न होता, शांत पणे परिस्थिती हाताळावी.

आपली सुरक्षा आपलीच जबाबदारी.

ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}