दुर्गाशक्तीदेश विदेशब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय

कथा नंबर 37 “हेमा मालिनी ‘ प्रदीप केळूसकर — शिवकाशी चे सत्य

माझी गेल्या तीन वर्षातील कथा नंबर 37 “हेमा मालिनी ‘ वाचका समोर ठेवत आहें. माझ्या कथा हजारो वाचक अनेक फेसबुक साहित्यिक ग्रुप्स वर आणि व्हाट्सअप च्या अनेक ग्रुप्स वर वाचत आहेत. तसेच असंख्य श्रोते यू ट्यूब वरील माझ्या चॅनेल्स वर ऐकत आहेत. तुम्ही सर्व प्रोत्साहन देता म्हणून लिहावेसे वाटते. असेच वाचत राहा, ऐकत राहा.
पण माझी विनंती अशी, नुसते like किंवा नमोजी देऊ नका, निदान चार ओळी तरी लिहा. वाचकांच्या मनातले कळायला हवे. तसेच माझे यू ट्यूब वर माझ्या कथा ऐका, चॅनेल subscribe करा आणि विविध ग्रुप्स वर ऑडिओ पाठवा.
“हेमा मालिनी ‘
मी शाळेतून येऊन चहा चपाती खात असताना आई म्हणाली, विजू मामा आला होता, सुजय राजे रविवारी सकाळी काही काम नसेल, तर सकाळी घरी ये म्हणाला.”
” रविवारी सकाळी म्हणजे परवा, जातो मी मामाच्या घरी’.
रविवारी सकाळी विजू मामाकडे म्हणजे गोरेगाव पूर्वेला मी गेलो. आमचे घर गोरेगाव पश्चिम ला आणि विजू मामाचे गोरेगाव पूर्वेला. मध्ये फक्त रेल्वेचे फाटक. मी विजू मामाकडे पोचलो किंवा मामा आणि मामी गॅलरीत काहीतरी करत होती. मी आत गेल्यावर मी पण गॅलरीत गेलो. तेथे पाहतो तर फटाक्यांचा ढीग. माझी नजर पटकन सर्व फटाक्यावर फिरली. ॲटम बॉम्ब, फटाके, भुईछत्र, अनार इत्यादी सर्व फटाके तेथे होते. मी मामाला म्हटले ” एवढे फटाके कोणासाठी? कारण मामाची मुलगी फक्त दोन वर्षाची होती.
मामा – अरे कोणासाठी नाही फटाके विकण्यासाठी.
मी – मग फटाके विकणार कोण आणि दुकान कुठे?
मामा- दुकान वगैरे काही नाही फटाके घरोघरी विकायचे.
मी -म्हणजे?
मामा – म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन फटाक्यांची ऑर्डर घ्यायची. मग ऑर्डर प्रमाणे म** बांधायचा बिल करायचे आणि गिर्‍हाईकांच्या घरी बिल आणि म** पोच करायचे एवढेच.
मी – पण गिर्हाईकांच्या घरी गेल्यावर ते ऑर्डर देतात काय?
मामा -का नाही देणार? आपण मार्केट पेक्षा जर दर कमी दिले तर सर्वजण ऑर्डर देतात. आणि त्यांना पण घरपोच सर्विस मिळते. सुरुवातीला आपले नातेवाईक तसेच बिल्डींग मधील मंडळी यांच्याकडे ऑर्डर साठी जायचं. हळूहळू शेजारी पाजारी इतर लोकांकडे पण आपण धंदा वाढवू. मी तुला मुद्दाम बोलावलं कारण यावर्षी तू मला या धंद्यात मदत करायची.
मी – हो मामा माझी तयारी आहे.
मामा – मग आज सायंकाळ पासून ऑर्डर घ्यायला घरोघरी जाऊ. मी दरपत्रक तयार करतो.’
मी पुन्हा सायंकाळी चार वाजता मामाकडे आलो. मग मामा आणि मी जयप्रकाश नगर मध्ये ओळखीच्या ठिकाणी ऑर्डर साठी गेलो. मामा त्याच भागात राहत असल्यामुळे बरेच जण मामाच्या ओळखीचे. आमचे दर मार्केट पेक्षा कमी होते, त्यामुळे आम्हाला ऑर्डर मिळू लागल्या. दुसऱ्या रविवारी गोगटेवाडी, अरे रोड या भागात आम्ही फिरलो. आम्हाला एकंदरीत साडेतीन ते चार लाखाच्या ऑर्डर मिळाल्या.
मामाने मज्जिद बंदरला खरेदीला जाताना मला बरोबर नेले. आणि पहिल्यांदाच युसूफ भाईची गाठ पडली.
मामा – आदा युसूफ भाई!
युसूफ भाई – आदा, कैसे हो मिया?
मामा – फटाके का धंदा करना चाहता हु, ऑर्डर लाया हु आपसे माल लेना है लेकिन क्रेडिट से.
युसूफ भाई – किसने ना कहा है? जो ऑर्डर लाये हो वो हमारे आदमी के पास दो, दो दिन मे तुम्हारे पत्ते पर म** पहुचा जायेगा.
मामा – युसुफ भाई पेमेंट?
युसूफ भाई – जो तुम्हारे पास है वो देना, बाकी की अमाऊंट का दीपावली के बाद चेक देना, लेकिन एक ध्यान मे रखो चेक पास होना चाहिये, यदि कोई समस्या ही तो फोन करके बताना. कोई भी हालत मे चेक रिटर्न नही आना चाहिए.
मामा – चेक दही रिटर्न आयेगा युसूफ भाई.
युसूफभाई – मै जानता हूँ, तुम मराठी लोक बडे इमानदार होते हो.
मग विजू मामाने युसुफ भाईला वीस हजार रुपये रोख दिले आणि बाकीच्या रकमेचा चेक दिला.
युसूफ भाई ने शब्द दिल्याप्रमाणे दोन दिवसात सर्व मालपोच झाला. विजू मामाने त्याच्या बिल्डिंगच्या गॅरेजमध्ये सर्व म** उतरून घेतला.
आणि मग माझा फटाक्याच्या व्यवसायाशी पहिला संबंध आला. मामा ऑर्डर प्रमाणे म** बांधून द्यायचा आणि सोबत बिल द्यायचा, ते पार्सल मी पोच करायचं आणि पैसे वसूल करायचं. मामाचा जवळ जवळ सर्व माल संपला. मामा खुश झाला, पहिल्याच वर्षी त्याला जवळ जवळ 50 हजाराच्या वर फायदा झाला. मामाने मला नवीन सायकल घेऊन दिली आणि एक आणि एक घड्याळ ठेवून दिले.
माझे बाबा दुरून सर्व पाहत होते. कुठेतरी उनाडक्या करण्यापेक्षा मी मामा बरोबर व्यवसायात अडकलो हे त्याला आवडले. त्यामुळे माणसांची बोलता येते व्यवहार करतो. पैसे कसे येतात आणि कसे जातात हे पण कळते, म्हणून ते खुश होते.
पुढच्या वर्षी पण मामाने मला सोबत घेतलं. परत एकदा युसूफ भाई कडे जाणं झालं. आता युसूफ भाई मला ओळखू लागले. पुढील चार वर्षे मामाने आणि मी एकत्र धंदा केला. आमचा धंदा तीन लाखापासून 15 लाखापर्यंत वाढला.
आता मी बारावी पास होऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बीएससी ला केमिस्ट्री विषय घेऊन मी कॉलेजमध्ये प्रवेश केला. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना मामाची नगरला बदली झाली. आणि मामा मामी आणि मामाची छोटी मुलगी नगरला गेली. जाताना मामा मला म्हणाला ” फटाक्याचा धंदा तुला आता कळला आहे, आपली गिर्हाई के फिक्स आहेत, तू अभ्यास सांभाळून हा व्यवसाय करू शकतोस. तरी हा व्यवसाय बंद करू नको थोडे पैसे तुला मिळतील.’
मी अभ्यास सांभाळून मामाचा हा व्यवसाय चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. बाबांकडून तात्पुरते उसने पन्नास हजार रुपये घेतले. बाबांच्या एका मित्राची शेड पडून होती ती बाबांनी मला मिळवून दिली.
आता मला फटाक्याचा व्यवसाय सुरू करायचा होता. माझा छोटा भाऊ नववीत होता, तो माझ्या मदतीला होता. जुलै महिना आला तसा मी युसुफ भाई कडे गेलो. युसुफ भाई दुकानाच्या आतल्या खोलीत कुणाशी तरी बोलत होते. नोकराने मला आत पाठवले.
मी – युसुफ भाई, मेरे मामा की ट्रान्सफर बाहेरगाव हो गई है, इसीलिए मामा ये धंदा नही करेगा, मगर अभी मै ये धंदा करुंगा, आपका सहाय्य चाहिये.
मामा – तो ना किसने कहा है? मगर तुम्हारे मामाने जैसा व्यवहार रखा वैसा व्यवहार रखो. दिवाली के बाद पेमेंट पुरा होना चाहिये.
मी – हा युसूफ भाई, वैसा ही होगा.
मी युसूबाईच्या माणसाकडे ऑर्डरचा कागद दिला आणि आणि 50 हजार रुपये कॅश दिले. त्यांच्या माणसाने माझा पत्ता विचारून घेतला आणि दोन दिवसात तुमची डिलिव्हरी मिळण्याचा शब्द दिला. मी बाहेर पडलो आणि मुख्य रस्त्यावर आलो, एवढ्यात ” भैया भैया इधर देखो,’ असं म्हणत मघाशी युसूफ भाई बरोबर जो बोलत होता तोच माणूस माझ्यासमोर आला.
” मै अन्वर अली, राजधानी फायर वर्स का आदमी हु.
मी – क्या काम है?
अन्वर अली – देखो शेठजीं, तुम जो युसूफ भाई से म** लेते हो, वो सब हमारे कंपनी का ही है. यदि तुम डायरेक्ट हमारे कंपनी से मार लेंगे, तो तुम्हारे कम से कम 25% बच सकते है.
मी – मगर मेरे पास क्या नही है हम क्रेडिट पे मार लेते है.
अन्वर – कोई बात नही, ये मुंबई में कोई भी कॅश से माल लेता नहीं, हम सब को क्रेडिट देते है, मगर डिसेंबर तक पेमेंट पुरा होना चाहिये.
मी – आप कौन है? कंपनी के मालिक?
अन्वर – नही मै सेल्समन हू. ये मेरा कार्ड.
असं म्हणून अनवर ने आपले कार्ड मला दिले.
अन्वर – हमारे मालिक तिरुपती नाम के है, मै उनको तुम्हारे बारे मे बोलता हु. हो तुमको जरूर क्रेडिट देंगे.
अन्वर ने माझ्याकडे राजधानी फायर वर्क्स चे प्राईज लिस्ट दिले. मी त्याला नमस्कार करून चालू लागलो.
रेल्वेत बसल्यावर सहज मी अनवर ने दिलेले प्राइस लिस्ट चेक केले. खरोखरच युसुफ भाईंच्या दरापेक्षा बरेच दर कमी होते. जवळजवळ पंचवीस टक्के वाचणार होते. मी मनात म्हटले आता शिवकाशी गाठायलाच हवी.
दोन दिवसांनी युसूफ भाईचा म** आला आणि मी ऑर्डर्स मध्ये गुंतलो. परंतु मला शिवकाशी खुणावत होती. माझा धाकटा भाऊ पण माझ्याबरोबर असल्याने मला थोडी उसंत मिळत होती.
यंदा आमच्या ऑर्डर्स वाढल्या,स्टॉककमी होणार असे वाटू लागले, अजून दिवाळीला वीस दिवस बाकी होते. मी छोट्या भावाकडे जबाबदारी सोपवून शिवकाशीला जाण्याचा निर्णय घेतला.
मी आई-वडिलांना माझा निर्णय सांगितला आणि मदुराईचे रेल्वेचे तिकीट काढले. मी अनवर ला फोन करून शिवकाशीला येत असल्याचे कळवले. त्याने आपण शिवकाशीत असून लॉज बुक करतो, यायला लागा, अस फोन वर सांगितलं.
शेवटी मी रेल्वेने मदुराई पोहोचलो. अन्वर ने सांगितल्याप्रमाणे बस पकडून शिवकाशी ला गेलो. बस स्टॉप वर अन्वर माझी वाटच पाहत होता. त्याच्या स्कूटर वर बसून मी लॉजवर पोचलो. लॉजवर फ्रेश होऊन दोन तासांनी अन्वर बरोबर राजधानी कंपनीत पोचलो.
राजधानी कंपनीत जाताना वाटे ठीक ठिकाणी फटाके वाळत घातल्याचे दिसत होते. आपल्याकडे पापड वाळत घालतात तसे.
अन्वर ने स्कूटर थांबवली आणि एका पत्र्याच्या शेडमध्ये मला घेऊन गेला. मी उतरून पाहिले, या ठिकाणी पण सर्व ठिकाणी फटाके वाळत घातलेले दिसत होते, मी अनवरच्या पाठोपाठ आत गेलो, वाटे छोटी छोटी मुले फटाके हाताळत असताना दिसली.
बाहेर ऊन कडाक्याचे पडले होते, ती पत्र्याची शेड तव्यासारखी तापली होती, तशा त्या तव्यासारख्या शेडमध्ये छोटी मुले केमिकल हाताने घेऊन कागदावर पुसत होती. मी मालकाच्या केबिनमध्ये गेलो ते केबिन मात्र एअर कंडिशन होते. त्यामुळे थंडावा होता.
आत मध्ये मालकांबरोबर अनेक लोक बोलत होती, सर्व तमिळ भाषेत, त्यामुळे मला काहीच कळत नव्हते. अनवर ने तिरुपतीची माझी ओळख करून दिली.
तिरुपती – बोलिये शेठ, मुंबई से आये क्या? हमारे पास मुंबई पुन्हा नागपूर सब जगा के ऑर्डर हें, अनवर ने मुझे बोला की आप मुंबई के सब मे फटाका बेचते है. यदि आप हमसे माले तो हमारा भी कोपरेशन होगा,
एवढ्या तिरुपती ने कॉल बेल वाजवली, तशी 10 11 वर्षाची काळी सावळी मुलगी दरवाजा ढकलून आत आली. माझ्याकडे पहात आणि हसत हसत तिरुपती म्हणाले ” ये है हमारे कंपनी की हेमा, हम इसे हेमामालिनी बोलते है. ” तिरुपती आणि अन्वर जोराने हसले. त्या मुलीला हिंदी कळले नसावे, पण हेमामालिनी म्हणून आपली चेष्टा करत आहे हे तिला कळले, ती लाजली आणि हसली आणि बाहेर पळाली.
मग तिरुपती आपला धंदा, आपला म** कुठे कुठे पर्यंत जातो हे सर्व सांगत बसला, एवढ्यात परत मघाची मुलगी आत आली, माझ्यासमोर केळीच्या पानावर इडली व व छोट्या वाड्यातून सांबार घेऊन आली.
तिरुपती – लिजिये साब, हमारे हेमामालिनी इडली कशी बनाई बताओ.
मी समोरील इडलीतील इडली चा एक छोटा तुकडा हाताने तोडला आणि चटणी बरोबर तोंडात टाकला. काही सेकंदात तोंडातल्या तोंडात विरघळून गेला. मग मी भराभर भराभर इडली खाऊ लागलो. इतकी चवदार इडली मे कितने वर्षात खाली नव्हती. तिच्याकडे पहात “बढिया, बढिया ‘ म्हणत होतो पण ते तिला कळले नसावे. फक्त आपण बनवलेली इडली यांना आवडली एवढेच तिला कळलं.”थांकु ‘ म्हणत ती बाहेर पळाली आणि येताना कॉफीचा मग घेऊन आली.
मग मी तिरुपती बरोबर धंद्याच्या गोष्टी केल्या. मला हवे असलेली मालाची ऑर्डर दिली. मी 25000 ऍडव्हान्स दिले. बाकी रकमेचा चेक दिला.
तिरुपती – हमारे यहा हर साल नये नये प्रोडक्स आती है. हम पहली बार शिवाकाशी मे ये बनाते है. इसीलिए तुम हर साल यहा आयेगा तो अच्छा होगा. तुम्हारा जैसा प्रॉडक्ट मुंबई मे और कम लोगों के पास रहेगा.
मी – ह मे अग्नी साल भी आऊंगा.
असं म्हणून मी केबिन बाहेर पडलो. केबिनच्या बाहेर असलेली छोटी फॅक्टरी दाखवू लागला.
वर ऊन तापत होतं. तव्यासारखा पत्रा कडकडीत तापला होता. मी पाहिलं कॅडनियम, मॅग्नेशिअम, कॉपर, सोडियम SULPHATE यांचे ढीग पडले होते. आणि ती दहा-बारा वर्षाची मुलं हातात काहीही न घालता हाताळत होती. मी केमिस्ट्रीचा स्टुडंट असल्यामुळे मला माहित होतं, हे किती डेंजरस आहे ते. आम्ही प्रयोगशाळेत एका वेळेला असे एकच द्रव्य वापरतो, पण त्यासाठी किती काळजी घेतली जाते! आणि इथे कॅडनियम ही मुलं हातात घेऊन कागदावर ओतत होती. मी अनवरला म्हणालो
मी – ये सब केमिकल बहुत डेंजरस है. इसे कभी भी आग लग सकती है. कॅडनियम से कॅन्सर की बिमारी हो सकती है. और यहा ये छोटे बच्चे इधर काम कर रह है. इनकी सुरक्षा का क्या प्रोव्हिजन किया है?
अन्वर – ये है ना दो सेलिन्डर्स.
तेथे दोन छोटे सिलेंडर टांगलेले होते.
मी – ये काफी नही है, यदि आग लग गई तो इसे कुछ नही होगा. और तुम लोगो ने ये छोटे बच्चों को काम पे लगाया है!
अन्वर – क्या करेंगे साब? यहा गरीबी बहुत है. ये बच्चे घर मे भुके रहते है यहा इसलिये काम पर आते है. शिवा काशिमे तुम जहा जाओगे वहा ऐसा ही दिखाने मिलेगा.
मी – ये डेंजरस है!
एवढ्या त्या छोट्या मुलात हेमा दिसली. ती इतर मुलांप्रमाणे कागदाच्या सुरळ्या करत होती. त्या सुरवात एकत्र केलेले केमिकल्स ठेवत होती. मला पाहतात हळूच हसली.
मी – अरे ओ हेमामालिनी, संभालके काम करो!
असं मी म्हणालो खरे पण हेमाला माझे हिंदी करणार होते थोडेच?
मला अनवरने हॉटेलमध्ये सोडले. थोडा वेळ आराम करून मी मदुराई गाठली आणि रात्रीच्या ट्रेनने मुंबईला पोहोचलो.
माझ्या लक्षात आलं शिवकाशीच्या मालामुळे मला जवळजवळ 40 हजाराचा जास्त फायदा झाला होता.
दुसऱ्या वर्षी जुलै महिना आला, कसे मला परत शिवकाशी ला जाण्याचे वेध लागले. आता माझा राजधानी फायर वर्स बरोबर चा व्यवहार जमला होता. पण मालक तिरुपती मला म्हणाले होते ” तुम्ही स्वतः या, आमचे नवीन प्रॉडक्ट खरेदी करा, मुंबईमध्ये क्वचितच असे प्रॉडक्ट तुम्हाला मिळतील ‘.
मी पुन्हा यावर्षी शिवकाशीत पोहोचलो. पुन्हा तिरुपतीच्या ऑफिसमध्ये, माझे स्वागत करून झाल्यानंतर तिरुपती नी ” हेमा अशी हाक मारली. यावेळी हेमाने गरमागरम उत्तप्पा आणला. आता हेमाची थोडी थोडी ओळख झाली होती. म्हणून मी तिला गमतीने हाक मारली ” कैसी हो हेमामालिनी?’ अर्थात तिला हिंदी कळत नसल्यामुळे ती फक्त हसली आणि तिने पांढरे शुभ्र दात तेवढे दाखवले. मग माझ्यासाठी कॉफी घेऊन आली.
माझ्या लक्षात आलं इथल्या सर्वात मुला मुलींच्या अंगावर अगदी सामान्य दर्जाचे कपडे आहेत. मुंबईतील झोपडपट्टी मधील मुलां चे कपडे यांच्यापेक्षा कितीतरी चांगले. माझ्या ऑर्डर चे काम झाल्यावर मी परत त्यांच्या फॅक्टरीत गेलो, मागील वर्षा सारखीच परिस्थिती होती. ही मनातल्या मनात हिशेब घातला, तिथे अंदाजे 12 मुलगे आणि दहा मुली आहेत. मोठी माणसे आहे ती वेगळी.
राजधानी कडून मला वेळेवर मला मिळत होता, मी मुंबईत चांगला धंदा करत होतो, मी राजधानीचे पैसे वेळेवर पाठवत होतो. माझ्या लक्षात आले, राजधानी बरोबर धंदा सुरू केल्यापासून दरवर्षी मी साडेतीन लाखावर पैसे कमवत होतो. तरी थोडा म** शिल्लक राहत होता. माझा धंदा वाढत होता.
पुढील वर्षी परत शिवकाशीला जाताना मी अंधेरीच्या मार्केटमधून दहा मुलांसाठी चड्ड्या आणि शर्ट आणि सर्व मुलींसाठी गाऊन घेतले. हेमा साठी जरा विशेष चांगले गाऊन घेतले.
शिवकाशिला पोहोचलो. त्यावेळी मी राजधानीच्या ऑफिसमध्ये जाण्यापेक्षा फॅक्टरीत गेलो. जोरात काम सुरू होतं. मी हेमाला शोधू लागलो. हेमा यावेळी सर्व केमिकल मिक्स करण्याच्या कामात होती. माझ्या लक्षात आलं हेमा अगदी ज्वालाग्रही पदार्थ हाताळत होती. मला पाहताच ती हसली आणि काम थांबवून पुढे आली. मी विचारलं ” कैसी हो हेमा मालिनी?’
“अय्यो ‘ तोंडावर हात ठेवत ती म्हणाली. मी तिच्या हातात मुंबईवरून आणलेल्या कपड्यांची बॅग दिली. मुलांचे कपडे याची बॅग बाहेर काढून या सर्वांना वाट असे खुणेने सांगितले. तसेच मुलींसाठीचे गाऊन दाखवून हे सर्व मुलींना वाट असे खुणेने सांगितले. मग एक वेगळी पिशवी काढून हेच तुझ्यासाठी असे परत खुणेने सांगितले. ते कपडे पाहून ती हरखून गेली.
तिने मुलांचे कपडे एका मुलाच्या हातात दिले आणि सर्वांना घ्या म्हणून सांगितले. मग मुलींचे गाऊन सर्व मुलींना एक एक वाटू लागली. आणि शेवटी आपल्यासाठी ते गाऊन बाहेर काढून ती विस्थारीत नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. केवढी खुश झाली ती हे कपडे बघून. ते गाऊन आपल्या अंगाला लावून बघत होती. मला हळूच “थांकु ‘ म्हणाली आणि लाजली. तेथील प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या डोळ्यात आज आपल्याला देव भेटल्याची भावना होती. त्या मुलांना त्याची अपूर्वाई होती.
मी तिरुपतींच्या ऑफिसमध्ये गेलो. तिरुपती शी बोलत असतानाच हेमा आमलेट आणि ब्रेड घेऊन आली. तिरुपती हसून हसून म्हणाला” देखो साब, हेमा कितनी खुश है तुम पर. इधर कौन कौन और कहा से व्यापारी आते है, मगर उन्हे इतना जल्दी नाश्ता नही लाती वो ‘.
मी पण जोरात हसलो. हिमाला हिंदीतले बोलणे कळत नसल्यामुळे, ती फक्त”अय्यो ‘ म्हणत लाजून पळाली.
तिरुपती ने मग त्यांचे नवीन प्रॉडक्ट दाखवले. मी भली मोठी ऑर्डर दिली. थोडी केस दिली चेक दिला आणि बाहेर पडलो. बाहेर पडण्याच्या मार्गावर हेमा उभी होती. मला बघताच “थांकु थांकु ‘ म्हणत लाजली आणि दूर पळाली. मी दरवर्षीप्रमाणे फॅक्टरी जाऊन सर्व मुला मुलींना भेटलो. सर्वजण माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. कदाचित याआधी त्यांना कोणीच कधी कपडे आणले नसावेत.
मी मुंबईत आलो. दिवाळीत जोरदार धंदा केला. मी फोन करून अजून ऑर्डर्स दिल्या. यंदाच्या दिवाळी मोसमात मी सहा लाखापेक्षा जास्त फायदा मिळवला.
माझे आई बाबा पण खुश होते. शिकता शिकता आम्ही पार्ट टाइम हे पैसे मिळवत होतो. मी आता एम एस सी च्या दुसऱ्या वर्गाला होतो. फटाक्याच्या धंद्यासाठी एखादा गाळा विकत घ्यावा असा विचार चालला होता. योगायोगाने आमच्याच एरियात एका बिल्डिंगचे काम सुरू झाले. मी बिल्डरशिप थोडाफार बोलून ठेवलं. थोडे ॲडव्हान्स पैसे देऊन एक गळा फिक्स केला.
आता धंदा वाढवायचा होता. पश्चिम उपनगराचा स्टॉकिस्ट व्हायचं होतं. मी दोन माणसे कामाला ठेवली. हिशेब करण्यासाठी एक कॉम्प्युटर वाली मुलगी नेमली.
जून जुलै उजाडला तसा मला शिवकाशीला जायचे वेध लागले. राजधानी फायर मधल्या मुला मुली आता एक वर्षांनी मोठी झाली म्हणजे मुलांना आता फुल पेंट ची गरज होती. मुलींना आता ड्रेस मटेरियल ची गरज होती.
मी मुलांसाठी फुल पॅंटी आणि टी-शर्ट विकत घेतले. दहा-बारा मुलींसाठी ड्रेस मटेरियल घेतली. हेमा साठी जास्त विशेष चांगले असे ड्रेस मटेरियल घेतले.
माझी यावर्षीची कपड्याची बॅग जरा मोठी आणि जरा जास्त जड झाली. पण मला त्याची पर्वा नव्हती. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला जास्त महत्त्वाचा.
मी दरवर्षीप्रमाणे मदुराईला उतरून शिवकाशिला पोहोचलो. लॉजवर उतरून फ्रेश झालो आणि राजधानीच्या ऑफिस कडे निघालो. सोबत कपड्यांची मोठी जड बॅग होती. मी दिलेले कपडे पाहून मुलं मुली खुश होणार होती. हेमा परत एकदा खुश होणार होती आणि लाजून थँक्यू म्हणणार होती. ड्रेस मटेरियल पुन्हा पुन्हा अंगाला लावून बघणार होती. सारे चित्र माझ्या डोळ्यासमोर येत होते.
मी रिक्षा थांबवली आणि आत जायला निघालो. मी गेली चार वर्षे या कंपनीत येत होतो. पण आज प्रथमच मला काहीतरी विचित्र विचित्र वाटत होते. नेमके काय ते लक्षात येईना. आणलेले कपडे प्रथम हिमाला आणि इतर मुलांना देऊया म्हणून मी ऑफिसमध्ये जाण्याऐवजी फॅक्टरीत गेलो. पण तीन-चार वर्षात थोडे थोडे ओळखीचे झाले चेहरे आज दिसत नव्हते. नवीन मुलं मुली दिसत होती. मी हेमाला शोधू लागलो. पण त्या मुलीत हेमा नव्हती. मी त्या मुलींना हेमा… हेमा असे विचारून तिची चौकशी केली. त्या मुली काहीतरी सांगत होत्या पण माझं हिंदी त्यांना कळत नव्हतं आणि त्यांचं तमिळ मला कळत नव्हतं.
शेवटी मी ऑफिसमध्ये प्रवेश केला. तिरुपती कॉम्प्युटरवर हिशेब तपास होत होता. मला पाहताच “आईये साब ‘म्हणत माझे स्वागत केले.
तिरुपती – कब आये साब?
मी – आज सुबह..
त्याने कॉल बेल वाजवली आणि एक काळी मुलगी आत आली. मी पहात राहिलो. गेली चार वर्षे हेमा यायची. मग इडली सांबार उत्तप्पा काहीतरी आणायची. त्याने तमिळमध्ये इडली कॉफी असं काहीतरी सांगितलं, आणि ती मुलगी बाहेर गेली. मला आश्चर्य वाटले.
मी – हेमा कहा गयी?
असं विचारतात तिरुपतीचा चेहरा पडला.
तिरुपती – क्या बताऊ साब, हमारा ये धंदा मालूम है ना आपको. यहा केमिकल्स के साथ खेलना पडता है. ये लडको को कितना बार बोला संभाल के काम करो, तो भी सुनते नही.
छे मैना पहिल फॅक्टरी को आग लग गई और चार लडकिया और दो लडके जल के मर गये.
मी ओरडलो -क्या? छे जन मर गये.
तिरुपती -हा, बडा नुकसान हुआ हमारा.
मी -और हेमा? मी किंचालत विचारले.
तिरुपती – हेमा भी जल गयी.
ये देखो सब ये अखबार देखो.
मी किंचाळत विचारले “क्या बात कर रहे हो, हेमा जल गयी?
“हा साब, हमे बहुत दुःख हुवा ‘.
काही कळायचंय आत मी उठलो आणि तिरुपतीचा गळा पकडला
“तुमने मार डाला वो छोटे बच्चको, ती अकरा बारा वर्षाची लहान मुलं, घरी अन्न मिळत नाही म्हणून तुझ्याकडे कामाला आली होती, आग विझवण्याची कसलीही योजना नसताना असली केमिकल सरळ सरळ उघडी टाकलीस तू?’
मी गळा कापताच तिरुपती ने बहुतेक कॉलबेल दाबली असावी. त्यामुळे बाहेरची सर्व मुलं-मुली केबिनमध्ये घुसली. मी त्यांच्या मालकाचा गळा पकडलेला पाहून ती आश्चर्यचकित झाली. त्या मुलांकडे पाहून मी तिरुपतीचा गळा सोडला.
” क्या करेगा सब, हमारे यहा गरीबी ही बहुत.’
” ही एवढी गरीब मुल आहेत म्हणून तुम्ही कारखानदार त्याला पिळून घेता. लहान मुलांना असली काम देणं हा गुन्हा आहे हे माहिती आहे ना तुला.’
” हा साब सब मालूम है, लेकिन कॉम्पिटिशन के जमाने मे ये सब करना पडता है. शिवा काशी मे हर जगह यही है.’
“तुम खुनी हो तिरुपती, you are murderer, सात बच्चको मार डाला तुमने और हेमाको भी…
मी रडू लागलो. तसा तिरुपती माझ्याजवळ येऊन मला थोपटू लागला. मी रडत रडत त्याला म्हणालो
” मुझे हात मत लगाओ तिरुपती. मै तुझे और तुम्हारे जैसे और कारखानदार को छोडूंगा नही. मै बंबई के पेपर मे सब पब्लिश करूँगा ‘
” उसका कोई फायदा नही है साब, बहुजन ने आज तक लिखा है, थोडा दिन ये बंद होता है फिर शुरू ‘.
और साब, ऐसा उनका कोई नुकसान हमने नही किया, ये बच्चों के घर पर हमने एक एक लाख रुपये भेजें,
मी म्हणालो – तिरुपती ये बच्चों ने जन्म क्यू लिया था, दस बारा साल गरिबी मे जीना और एक लाख रुपये के लिए मरना, बस..
तिरुपती गप्प बसला. मी शांत झाल्याचे पाहून बाहेरून आलेली मुलं हळूहळू बाहेर गेली.
पाच मिनिटे शांत बसून मी उठलो. तसा तिरुपती म्हणाला ” साब, ऑर्डर नही लाया?
मी – तिरुपती आज के बाद में फटाका का धंदा नही करुंगा. या मुलांच्या रक्ताने बनवलेले फटाके मला नाही विकायचे.
तिरुपती – मगर साब, लास्ट इयर आपने अच्छा धंदा किया था.
मी – आजचे सब बंद. या नंतर फटाका विकत घेणार सुद्धा नाही आणि कधी फोडणार पण नाही.
मी बाहेर पडलो. तिरुपती माझ्या मागोमाग “साब साब ‘ करत भागवत होता. मी त्या नवीन मुला मुलींच्या जवळ गेलो. मग हा माझ्यासाठी इडली आणि कॉफी आणणारी मुली माझ्याकडे पाहत होती. मी तिला जवळ बोलावले. हे कपडे सर्वांना वाट म्हणून तिला खुणा केली. ती मुलगी अधाशासारखी धावली. तिने कपड्यांची बॅग ताब्यात घेतली.
गेल्या वर्षी अशीच कपड्यांची बॅग घ्यायला धावली होती हेमा, हेमा मालिनी!.
याच कारखान्यात हेमाचा कधीतरी कोळसा झाला होता. त्या सात कोळशातला एक कोळसा.
माझ्या मनात आलं, अशा फटाक्याच्या कारखान्यात किती हेमामालिनी येथील जळतील आणि परत परत येतील. जोपर्यंत आपल्या देशातली गरिबी संपत नाही, तोपर्यंत अशाच हेमामालिनी जळून मरतील.
प्रदीप केळूसकर 9422381299/9307521152

 

Pic courtesy biz std

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}