दुर्गाशक्तीदेश विदेशप्रोजेक्टस्ब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 01 01 2026

 

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर

—————————–

शनिवारी दिं. १३ रोजी “सोम फाऊंडेशन” तर्फे पल्लवी प्रसन्न ह्या सा रे ग म मधल्या गुणी सदस्य हीला हिरकणी पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत रायगडावर मिळाला.

त्याच झालं असं …

सोम फाऊंडेशन तर्फे १२ महिने १२ गड या दर महिन्याला एका गडाला भेट देण्याच्या उपक्रमात तिचा देखील सहभागी होता… शनिवारी रायगडावर या उपक्रमाचा एक टप्पा पार पडला. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. तिचा संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग आणि महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या साठी विविध उपक्रम राबवणे , त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे यासाठी त्यांना मंच उपलब्ध करून देणे अशा कार्यासाठी कौतुक करण्यात आले.

खालील मंडळींच्या हस्ते तिचा सत्कार झाला.
“किर्ती कोकाटे आणि हरीष कोकाटे ” , सोम फाऊंडेशन
“सचिन सदाशिव देशमुख” , अध्यक्ष -सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स भोर पुणे
अध्यक्ष -रवी सोहम दत्त फाउंडेशन भोर पुणे ..
“मा. योगेश सुदाम शेलार” , प्रदेशाध्यक्ष गड किल्ले संवर्धन सेल.
“मा. समीर संपत धुमाळ” , प्रदेश उपाध्यक्ष गडकिल्ले संवर्धनसेल
“मा. वल्लभ कृष्णा कोकाटे” ,राजगड तालुका अध्यक्ष गड किल्ले संवर्धन सेल
“कुमार सिताराम घाडगे” , सहा व्यवस्थापक पर्यटक निवास सिंहगड

.     

====================

अजून एक अतिशय हॅप्पी न्यूज

सा रे ग म समूहातील नितीन कुलकर्णी ह्यांच्या मुलाची ची आहे… त्यांचा मुलगा गंधार नितीन कुलकर्णी.
Avantika University, , Ujjain ह्याने Branch of M.I.T. Pune. येथून
Masters of Design, User Experience Design . ( Masters Degree )
ह्या Specialisation मध्ये , सर्वांमध्ये पहिला नंबर आला.

त्याला Gold Medal मिळाले. आहे
अवंतिका विश्व विद्यालय , उज्जैन , येथे नुकत्याच पार पडलेल्या पदविदान समारंभात त्याला हे पदक बहाल करण्यात आले.

Degree Course पूर्ण झाल्यानंतर तो सध्या IBM, कोची येथे User Experience Researcher म्हणून कार्यरत आहे.

       

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर

डीव्हीडी कॉर्नर

आजची खुश खबर

01-01-2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}