डॉ विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 01-11-2026
डॉ विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 01-11-2026

ब्रेकिंग : भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. अशोक सेन यांना प्रतिष्ठित ऑस्कर क्लेन मेडल भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील मोठा सन्मान!बेंगळुरूस्थित इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरेटिकल सायन्सेस (ICTS) चे प्राध्यापक अशोक सेन यांना 2026 चे ऑस्कर क्लेन मेडल जाहीर झाले आहे. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ठरले आहेत.
हे पदक स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ ऑस्कर क्लेन यांच्या नावाने स्टॉकहोम विद्यापीठ आणि रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसची नोबेल कमिटी फॉर फिजिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिले जाते. 1988 मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्काराचे यापूर्वीचे मानकरी नोबेल विजेते चेन-निंग यांग, स्टीव्हन वाईनबर्ग, हान्स बेथे, तसेच स्टीफन हॉकिंग, पीटर हिग्स आहेत.
पुरस्काराचे कारण:
प्रा. सेन यांना स्ट्रिंग थिअरी, स्ट्रिंग फिल्ड थिअरी आणि ब्लॅक होल एन्ट्रॉपीच्या अचूक मोजमापातील त्यांच्या क्रांतिकारी कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. त्यांचे S-duality वरील कार्य हे आधुनिक स्ट्रिंग थिअरीचा पाया मानले जाते. या सन्मानाचा भाग म्हणून त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी स्टॉकहोम विद्यापीठाच्या अल्बानोव्हा सेंटरमध्ये ‘Gravity from Strings and Strings from Gravity’ या विषयावर 2026 चे ऑस्कर क्लेन मेमोरियल लेक्चर दिले. प्रा. सेन हे सध्या ICTS-Infosys माधव चेअर प्रोफेसर आहेत. त्यांना यापूर्वी 2012 चा ब्रेकथ्रू प्राइज इन फंडामेंटल फिजिक्स, 2014 चे डिराक मेडल, 2001 मध्ये पद्मश्री आणि 2013 मध्ये पद्मभूषण हे पुरस्कार मिळाले आहेत. 1998 मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले होते.
डॉ विभा देशपांडे
डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर
01-11-2026



