मनोरंजनदेश विदेश

9 सप्टेंबर 2023 रोजी मयुरेश बुधकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम फनकार ने अतिशय नितांतसुंदर असा हिंदी चित्रपट गीतांचा रेट्रो टू मेट्रो हा कार्यक्रम पुण्यातील एस एम जोशी सभागृहात सादर केला.

🛑🛑ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन सारेगम ग्रुपतर्फे हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर 🛑🛑

9 सप्टेंबर 2023 रोजी मयुरेश बुधकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम फनकार ने अतिशय नितांतसुंदर असा हिंदी चित्रपट गीतांचा रेट्रो टू मेट्रो हा कार्यक्रम पुण्यातील एस एम जोशी सभागृहात सादर केला.

ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन सारेगम तर्फे या 2023 वर्षभरात एकूण सात टीम वेगवेगळ्या थीम घेऊन आपले कार्यक्रम सादर करत आहेत त्या मालिकेतील हा पाचवा कार्यक्रम. यापूर्वी 90s हिट्स, विविध रागावरील आधारित असा रागरंजन, जलसा चा महाराष्ट्राची लोकधारा आणि मेहेकचा इबादत ए इश्क असे चार कार्यक्रम सादर झाले आहेत.

रेट्रो टू मेट्रो या कार्यक्रमात टीम फनकार ने अगदी बोलपटांच्या सुरुवातीपासून म्हणजे अगदी 1940 पासून ते अगदी सध्याच्या हिंदी चित्रपट संगीतांपर्यंतचा हिंदी चित्रपटगीतांचा प्रवास दाखवणारा एक सुरेल असा कार्यक्रम अतिशय देखण्या सादरीकरणा सहित पेश केला. नावाला साजेसा अशा या रेट्रो टू मेट्रो या कार्यक्रमाने अगदी कुंदनलाल सेहगल यांच्या काळातील गम दिये मुस्तकिल ते अरिजित सिंग यांच्या सुनो ना संगेमरमर, बाजीराव मस्तानीतील मोहे रंग दो लाल म्हणजे अगदी अलीकडच्या काळापर्यंत संगीत सृष्टीतील दशकपरत्वे झालेले सांगितिक, तांत्रिक आणि संकल्पनात्मक बदल त्या त्या दशकांतील विविध गाणी सादर करून ऐकवत सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले . 300 आसनव्यवस्थेच्या या सभागृहात प्रेक्षकांनी अगदी तोबा गर्दी करत या हाउसफुल शो चा अगदी मनमुराद आनंद लुटला.

अनोखे थीम, स्टेजवरील रंग बदलती प्रकाश व्यवस्था, सादरीकरणातील सुसूत्रता, त्याला साजेशा गायकांच्या वेशभूषा आणि तिकीट खिडकी बंद करावी लागली इतकी प्रेक्षकानी केलेली हाउसफुल तुडूंब गर्दी यामुळे हा कार्यक्रम अतिशय लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण असा ठरला.

या ही कार्यक्रमाने सारेगम च्या लौकिकास साजेसा आणि प्रत्येक कार्यक्रमानंतर मैलाचे दगड सिद्ध होणारे पायंडे पडतील अशा काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अमलात आणल्या. हे सारेगम चे आणि या कार्यक्रमाचे खरेखुरे यश. यामध्ये कार्यक्रमानंतर केलेल्या खानपान सेवेचा सुटसुटीतपणा, कॅरिओके ट्रॅकसाठी वापरलेला अनोखा मॉनिटर डिस्प्ले, स्टेजवरील रंगीत प्रकाशव्यवस्था आणि फनकार व्यतिरिक्त इतर सारेगमकर आणि एकंदरीतच इतरही यूनिटी सदस्यांचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात करून घेतलेला समावेश आणि सहभाग ह्या इतर बाबी खरोखर वैशिष्ट्यपूर्ण होत्या.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ब्राह्मण यूनिटी च्या व्यवसायिक सदस्याना आपल्या जाहिराती देण्याची केलेली व्यवस्था त्यामार्फत आपली उत्पादने आणि सेवा कल्पकतेने आपल्या सदस्यापर्यंत पोहोचवण्याची संधी आणि त्यांनी केलेला या संधीचा पुरेपूर वापर आणि त्याचबरोबर सारेगम टीमचा सारेगम बाहेरील यूनिटी च्या रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एकंदरीतच एक देखणा आणि खुर्चीला खिळवून मनोरंजन करणारा असा हा फनकारचा रेट्रो टू मेट्रो हा कार्यक्रम.

मयुरेश आणि मधुरा बुधकर, अंकुश आणि पद्मा राजूरकर, सुधीर देशपांडे, विभा देशपांडे, मृदुल निकते, विक्रांत कानडीकर, सरिता लिमये आणि नवीन अगरखेडकर या सर्व फनकारांचे ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन कडून मनापासून कौतुक.

या उत्कंठा आहे ती 28 ऑक्टोबर च्या राजेश सहस्र्बुद्धे मार्गदर्शक असलेल्या आणि दिग्ग्ज कलाकारांची रेलचेल असलेल्या आर्ट अटॅक टीमच्या कार्यक्रमाची.

टीम आर्ट अटॅक ला तयारीसाठी खूप शुभेच्छा ….!

अंकुश राजूरकर 98811 99341

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}