Classifiedदुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर
इंजिनिअरिंगला असणाऱ्या सार्थकचा आज वाढदिवस, एकवीसावा ! Shared by Aarti Sinnarkar
इंजिनिअरिंगला असणाऱ्या सार्थकचा आज वाढदिवस, एकवीसावा !
नव्या रितीला अनुसरून आईबाबांनी काल रात्री बारा वाजता त्याला फोन केला.
पूर्ण बेल गेली ,महाशयांनी फोन घेतला नाही.मनातल्या मनात आईबाबांनी त्याच्या सौख्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली आणि झोपले.
रात्री दिड वाजता सार्थकने परत फोन केला. “वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा बेटा!”
“मी मित्रांसोबत होतो म्हणून फोन नाही उचलला. त्यांनी केक आणला होता,सोबत फोम स्प्रे पण आणला होता.स्प्रे उडवला केक कटिंग झालं,त्यांनी मला बर्थडे बंप्स दिले,थोडी मस्ती केली…पण एक प्रॅाब्लेम झाला…”
“काय झालं?”
“तो स्प्रे किंवा केकची आईसिंग डोळ्यात गेली बहुतेक…आग होतेय डोळ्यांची आणि पाठीलाही मार बसलाय बहुतेक…पाठ एकाच जागी दुखतेय…”
या नव्या प्रकारच्या वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीची खरं म्हणजे खुप चीड येते दोघांनीही,पण नाईलाज !
“थंड पाण्याने डोळे धुवून घे दोन तीनदा ,आणि पाठीला मलम लावून झोप आता…”
पहाटे पाच वाजता परत आईचा फोन वाजला .“मम्मी,माझे दोन्ही डोळे खुप सुजलेत…मला उघडताही येत नाहीत…खुप दुखतही आहेत…मला काही दिसतही नाहीये…आणि उठताही येत नाहीये”सार्थकचा रडवेला आवाज .
आईने गडबडीत बाबाला उठवलं,तणावात येऊन त्याला रागावणं झालं,तो घरापासून ५०० किमी दूर ,लगेच पोहोचणं अशक्यच !
पण मन मात्र खुप गतीने नकारात्मकतेकडे पळतं.म्हणतात ना मन चिंती ते वैरीही न चिंती अशी अवस्था झाली आईची.मनात शेकडो विचार…’हा सुखरूप तर आहे ना…डोळ्यांना जास्त इजा तर नसेल झाली ना….दृष्टी तर जाणार नाही ना…तो अंधळा झाला तर…’ अशा विचारांनी तिच्याच डोळ्यांसमोर अंधार होऊ लागला,तिलाच ताण येऊ लागला.सोशल मिडियावरचे केकमुळे होणाऱ्या अपघाताचे सगळे मेसेज आणि व्हिडिओ आठवू लागले.
त्याला ताबडतोब मित्राला घेऊन हॅास्पिटलला जायला सांगितलं आणि यांनी तिकडे निघण्याची तयारी केली.
नशीब बलवत्तर म्हणून सार्थकच्या डोळ्यांना काही झालं नाही…दोन प्रकारचे ड्रॅाप्स वापरून २४ तासात डोळ्यांना आराम पडला…मात्र बंप्समुळे एका मणक्याला गंभीर इजा झाली…त्याच्या उपचारात भरपूर पैसा आणि वेळ दोन्हीही गमवावे लागले.सार्थकचं तर बेडरेस्टमुळे एक सेमिस्टर वाया गेलं.
पण यातून त्याने आणि त्याच्या मित्रांनी अशाप्रकारे वाढदिवस साजरा न करण्याची शपथ घेतली.पण हे सगळं समजण्यासाठी ,आईबाबांचं म्हणणं पटण्यासाठी सार्थकला भरपूर किंमत मोजावी लागली.
सोशल मिडियावर असे व्हिडिओ अधूनमधून येतच असतात,सगळेच पहातात.आईवडिल मुलांना सजग करतात.मुलंही तात्पुरता विचार करतात.पण वाढदिवस,नववर्ष किंवा अजून कोणताही प्रसंग साजरा करायचा असला की मजा मस्ती करत हे सगळं करतातच !
परवा तर एका मुलाने यात जीव गमावल्याचा मेसेज व्हायरल झालाय.
वाढदिवसाच्या दिवशी आईवडिलांना किती यातना झाल्या असतील त्याची कल्पनाही करवत नाही आपल्याला!
आपली संस्कृति कुंकुमतिलक लावून औक्षण करायची….या वर्षी काहीतरी नविन आणि चांगलं करणार असा संकल्प करायचा हा दिवस….कालानुरूप प्रत्येक गोष्टी बदलतातच….कपाळावर लावायच्या टिळ्याची जागा पुर्ण तोंडाला फासायच्या केकने घेतलीय…आणि संकल्पाची जागा मौजमस्ती आणि हॅाटेलातल्या पार्ट्यांनी घेतलीय!
नव्या पिढीची तर यात चुक आहेच पण लहानपणापासून केक कापून मुलांचा वाढदिवस साजरा करणाऱ्या आईवडिलांचीही तितकीच मोठी चुक आहे….त्यांनी आपली पद्धत सोडून आपल्याच वागण्यातून मुलांवर ही प्रथा बिंबवली आहेच की !
दुसऱ्यांच्या संस्कृतींत आदर करण्याची आपली शिकवण…त्यामुळे केक कापायचाच नाही असं जरूरी नाही.बदल म्हणून,आपल्या मिठाया खाण्याऐवजी वेगळा पदार्थ खाण्यापुरतंच केकला महत्व द्यावं.
सध्या केक आणि बेकरीचा व्यवसाय हा खुप मोठा व्यवसाय आहे.त्यांनीही केक बनवतांना ,त्याची सजावट करतांना लागणाऱ्या सामानाचा जाणिवपूर्वक वापर करावा. तब्येतीला,खासकरून डोळ्यांना आणि त्वचेला अपायकारक ठरतील अशा केमिकल्सचा वापर न करण्याचं सामाजिक भानही ठेवावं. सिनेमा सिरियल्सवाल्यांनीही त्यांच्या कथेत वाढदिवस साजरा करण्याचे अघोरी प्रकार दाखवू नयेत,कारण अनुकरण करण्याची सुरूवात तिथूनच होते बहुतेकवेळा !
अर्थात सगळ्यांना बदलणं ,सल्ला देणं,उपदेश करणं आपल्याला शक्यच नाही आणि ते कुणी ऐकणारही नाही.पण आपल्यापुरतं ‘मी केक कापणार नाही आणि केककटिंगच्या अशा धुडगुसात उपस्थित राहून प्रोत्साहन देणार नाही…मी मिठाई वापरूनच माझा,शक्य झालं तर परिवारातील सदस्यांचा वाढदिवस साजरा करेन…’असा सुज्ञ संकल्प करायला काय हरकत आहे ?
सुप्रभात
रश्मी.#rashmilahoti
Shared By Aarti Sinnarkar