Classifiedदुर्गाशक्तीदेश विदेशब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
डॉक्टर विभा देशपांडे यांची संकल्पना , डीव्हीडी कॉर्नर , आजची खुश खबर* २८ ५ २०२४
डॉक्टर विभा देशपांडे यांची संकल्पना , डीव्हीडी कॉर्नर , आजची खुश खबर* २८ ५ २०२४
आपल्याच ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन मधील समुह सा रे ग म मधील मेंबर्स च्या पाल्यांनी १० वी शालान्त परीक्षेत घवघवीत यश मिळवून ह्या मुलांनी आपल्या घरच्यांनाच नाही, तर आपल्या सगळ्यांनाच आनंद दिला आहे.
1.आपली लाडकी अदिती चा मुलगा
ओजस पुष्कराज देशमुख
Marks : 92 %
संस्कृत : 100/100 मार्क्स
Board : सीबीएससी
शाळा : सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल
2. विद्यानंद.देशपांडे ह्यांची मुलगी
कु. आद्या ही नुकतीच दहावीची (सीबीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला ९१% गुण मिळाले असून संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. ती श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगांव या शाळेची विद्यार्थीनी आहे.
3. श्री रवी (शिशिर) लोखंडे ह्याचा सुपुत्र चि. अर्णव शिशिर लोखंडे, राहणार नागपूर याने दहावीच्या सीबीएससी बोर्ड परीक्षेत 94% मिळवून भरघोस यश संपादन केले.
आणि
श्री विद्यानंद देशपांडे ह्यांचा पुरस्कार ही ह्यात अजून एक आनंद वार्ता आहे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचा वर्धापनदिन दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो आणि त्यानिमित्त परिषदेतर्फे विविध नामवंत कलाकारांच्या / व्यक्तींच्या नावे वेगवेगळ्या कलाकारांना पारितोषिके देण्यात येतात.
दि. २५ मे रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
यापैकी ज्येष्ठ दिवंगत गायक अभिनेते डाॅ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा संगीत सेवा पुरस्कार यंदा विद्यानंद देशपांडे यांना देण्यात आला
संतोष देशपांडे ह्यांचा मुलगा, नंदन ह्याने दहावी एसएससी बोर्डाची परीक्षा डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण केली आहे
——————————————-