आपल्या जीवनात ग्रुप, / समुदाय / मित्र / गट का महत्वाचा आहे.. ?. ग्रुपचे सर्व सदस्य हे एकत्र ऊर्जेचा, ज्वालेचा भाग आहेत
एका गावात एक ग्रुप होता 25/ 30 जण एकमेकांचे खुप चांगले मित्र मैत्रिणी होते. दर गुरवारी ते भेटायचे .. उपासना करायचे .. एकदाही भेटल नाही तर त्यांना चैन पडत नसे. सर्वजण आनंदाने स्वतः हुन एकत्र येत असत…
त्यातला एक जण जो नियमित येत होता. त्याचा सर्व कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा. त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची… तो
मात्र मागील दोन गुरवार गैरहजर राहीला ते ही कोणतीही सूचना न देता,.
त्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर, मित्र मंडळीतल्या गटनेत्याने त्यांच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले…
एका हिवाळ्याच्या गारठलेल्या सकाळी तो त्या माणसाच्या घरी गेला…
त्या तरुणाने शेकोटी पेटवली होती आणी थंडीत उब मिळण्यासाठी तो एकटाच शांतपणे बसला होता…
त्याने गटनेत्याचे थंडपणे स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही. नुसते अभिवादन. त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता. दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले होते…
काही मिनिटांनंतर गटनेता उठला, त्यांनी त्या शेकोटीमधील एक जळणार लाकुड, शेकोटीतून बाजूला काढले . आणी परत जागेवर येऊन बसला…
तो तरुण हे सर्व निर्विकारपणे पहात होता. थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या ज्वाळा कमी झाल्या. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ते काळ दिसू लागल. थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते. तो एक निर्जीव काळा लाकडाचा कोळसा उरला होता…
अजूनही दोघा मध्ये काहीच संवाद झाला नव्हता. निघण्याची तयारी करण्यापूर्वी, गटनेत्याने ते लाकुड उचलले आणि पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवले…
ताबडतोब, ते लाकुड पुन्हा पेटले . . तेजस्वी दिसू लागले व जळू लागले…
गटनेता निधाला तेव्हा तो तरुण म्हणाला “तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद. मी लवकरच परत उपासनेला येईन. ”
आपल्या जीवनात ग्रुप, / समुदाय / मित्र / गट का महत्वाचा आहे.. ?.
कारण मागे राहिलेला …विझत चाललेला सदस्य, बाकीच्यांकडून उर्जा, तेज घेत असतो…
ग्रुपचे सर्व सदस्य हे एकत्र ऊर्जेचा, ज्वालेचा भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे…
आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत…
ग्रुप देखील एक कुटूंब आहे
आपण येथे संदेश देण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत . . तसेच आपल्यापैकी कोणीच एकटा नाही हा विश्वास देण्यासाठी आहोत . . …