अनाहत प्रस्तुत करत आहे…. गुलझारियत
एका मनस्वी कवीच्या मुसफिरीचा मागोवा घेणारा सांगीतिक कार्यक्रम
अनाहत प्रस्तुत करत आहे…. गुलझारियत
एका मनस्वी कवीच्या मुसफिरीचा मागोवा घेणारा सांगीतिक कार्यक्रम
प्रवास पाकिस्तानातील दीना गावातून आलेला किशोरवयीन refugee ते भारतातील नामवंत गीतकार, दिग्दर्शक
मोटार मेकॅनिक ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेता साहित्यिक
आई विना मुलगा ते आसाम विद्यापीठाचे मानद कुलगुरू
संपूर्णसिंग कालरा ते गुलजार असा
हा थक्क करणारा आणि अजूनही चालू असलेला निरंतर प्रवास
नुकताच प्रदान झालेला ज्ञानपीठ पुरस्कार आणि येत्या १८ ऑगस्ट ला वयाची ९० वर्षे पूर्ण होणे असे औचित्य साधून आम्ही काही गुलजार यांच्या गीतांचे चाहते कलाकार या प्रवासातील गीतकार गुलझार आम्हाला भावलेल्या रुपात सादर करणार आहोत
काही गाणी..काही कविता..थोडा संवाद अशी एक सुरेल संध्याकाळ…गुलझार आणि त्यांच्या चाहत्यांसाठी…
गुलझारियत….
सादरकर्ते
संजय लागू, Dr विभा देशपांडे, प्रीती करंदीकर, मिलिंद ढवळीकर, जान्हवी गोखले, मिहिर लागू
संवादक..सतीश वैद्य/ योगिता गुर्जर
वाद्यवृंद – Dr तेजस जोशी, राजस, आर्यन कुलकर्णी, अमित कुलकर्णी, संजय खाडे , कुमार शेलदरकर, हार्दिक रावळ
दिनांक १९ ऑक्टोबर २०२४
सरदार महादेव बळवंत नातू सभागृह
((भारती विद्याभवन सभागृह))
सेनापती बापट रोड, पुणे
संध्याकाळी ५.३०-८.३०
तिकीट मूल्य: १००/-