Dr विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 1-04-2026

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर – डीव्हीडी कॉर्नर -आजची खुश खबर 1-4-26
ह्या वेळी ही ब्राह्मण यूनिटी ची प्रसिद्ध लेखिका हीची गुड न्यूज आहे
आरती सिन्नरकर ला पुन्हा तिच्या काव्या करता मिळाला आहे एक पुरस्कार...
त्या बद्दल सविस्तर..
जागतिक कविता दिनानिमित्त खास उपक्रम आयोजित केला होता एका कविता ग्रुप मार्फत
“स्वतःवर कविता लिहा”
👉 प्रत्येकाने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर, आयुष्यावर किंवा मनावर आधारित कविता लिहायची आहे.
वास्तविक हा विषयच तिला थोडा अवघड वाटला होता…स्वतःवर आपण लिहिणार ..काय व्यक्त होणार..
पण तिला मनापासून आनंद वाटतो आहे की तिच्या भावनांना ओळखून तिच्या शब्दांना मिळालेले हे स्थान तिच्या करता खूप खास आहे.
आणि आपल्याला आनंद देणारे👏
==================
मी… शोधातली आणि सापडलेली
मी बडबडी… हो, थोडी जास्तच,
मी उत्साही… कारण जगणं मला थांबवू शकत नाही,
हसण्यातूनच माझं आयुष्य फुलतं
परिवार माझा श्वास
त्यांच्यासाठी जगणं हीच माझी साधना
मुलांसोबत कधी आई बनते,
तर कधी त्यांच्या जगातली एक छोटीशी वेडी मैत्रीण बनते
त्यांच्या हसण्यात मी विरघळते,
त्यांच्या दंग्यात मी हरवते
लहान-मोठ्या साऱ्यांत मिसळताना,
मी स्वतःलाच विसरते
गाणं माझ्या श्वासात,
लेखन माझ्या विचारात,
संगीत माझ्या नसानसांत
नवं शिकण्याच्या ध्यासात,
मी सतत स्वतःलाच घडवत असते शांतपणे, आतूनच
पण…
पण…
या सगळ्या गोंधळात कधी,
मन हळूच विचारतं —
“अगं, तू कुठे आहेस या सगळ्यात?”
क्षणभर सगळं थांबतं…
शब्दही शांत होतात…
आणि त्या शांततेत,
मी स्वतःलाच शोधायला निघते…
अध्यात्माच्या त्या निःशब्द वाटेवर,
एखादा सूर हात धरतो
एखादी ओळ मनाला स्पर्श करते
आणि आत कुठेतरी
मी पुन्हा जागी होते
हो…
मी हरवते कधी, पण संपत नाही
मी थांबते कधी, पण हरत नाही
कारण —
मीच माझा शोध आहे,
आणि मीच माझं उत्तर आहे.
प्रत्येक वेळी,
थोडी जास्त समजूतदार,
थोडी जास्त मजबूत,
थोडी जास्त “मी” बनून
मी पुन्हा मलाच सापडते —
नवी… उत्साही…
आणि स्वतःवर पुन्हा प्रेम करणारी मी
@ निरती
सौ आरती नितीन सिन्नरकर

===================

