दिनांक २४ जुलै माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने – नितीन कुलकर्णी

दिनांक २४ जुलै माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने – नितीन कुलकर्णी
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, दिनांक २४ जुलै रोजी, आम्ही, चिंचवड येथील श्री. गिरीश प्रभुणे ह्यांनी स्थापन केलेल्या,
” पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ” ह्या आश्रम शाळेला भेट दिली. श्री. गिरीश प्रभुणे ह्यांनी २ ते २.३० तासात आम्हाला शाळेची माहिती सांगितली व शाळा दाखवली. ह्या निवासी आश्रम शाळेत, फासे पारध्यांची साधारण ३५० मुले – मुली, तेथे राहून शिक्षण घेतात.

ही शाळा २००६ सlली स्थापन झाली. १ ली ते १० वी इयत्तेतील मुले इथे शिकतात.
१० वी साठी ह्या शाळेचा वेगळा अभ्यासक्रम शासनाकडून मंजूर करून घेतला आहे.
ह्या शाळेतील सर्व मुले पहाटे ४ वाजता उठतात, सकाळी ७ वाजे पर्यंत ,श्लोक, उपनिषद, प्रार्थना , योगासने व नंतर नाश्ता.
त्या नंतर ,९ ते २ शालेय शिक्षणाचे वर्ग होतात, ह्या नंतर २.३० ते ६.३० , कौशल्य विकासाचे वर्ग होतात.
ह्यात , प्लंबिंग, electric work, गवंडी काम, मूर्ती बनवणे, चित्रकला, गायन, वादन, नृत्य, वाचन, लेखन, नेमबाजी, विविध खेळ, ह्याचे प्रशिक्षण दिले जाते.
भारतीय परंपरा व इतिहास हे देखील शिकवले जाते. विशेष म्हणजे ह्या मुलांना अगदी लहानपणा पासून आयुर्वेदाचे शिक्षण दिले जाते.
रात्री जेवणानंतर, काही मुलांच्या घरून त्यांच्या आईचा फोन येतो तेव्हा आईशी बोलू दिले जाते. ह्या शाळेतून शिकून गेलेल्या काही मुली सध्या नर्स म्हणून दवाखान्यात काम करत आहेत. एका ४ थी मधील मुलीने धनुर्विद्येत नॅशनल लेव्हल ला सुवर्ण पदक मिळवलेले आहे.
ह्या शाळेत एकूण १५ शिक्षक आहेत, त्या पैकी फक्त ७ शिक्षकांना सरकारने मान्यता दिलेली आहे. बाकीचे शिक्षक अवघ्या ७ , ८ हजार मानधनावर काम करतात.

एका मोठ्या पत्र्याच्या शेड मध्ये ( आजुबाजूला प्लॅस्टर न केलेल्या लाल विटांच्या भिंती व वरती पत्रा). ह्या शाळेचे ऑफिस आहे. शाळेचे वर्ग म्हणजे लाल विटांच्या भिंती व वरती पत्रा.
आम्हाला एका मुलीने संपूर्ण शाळा दाखवली,
अनेक छोट्या छोट्या मुलींनी आमच्या बरोबर फोटो काढून घेतले. आमच्याशी गप्पा मारल्या.
६, ७ जुलै च्या पावसात ह्या शाळेचे प्रचंड म्हणजे एक ते दीड कोटींचे नुकसान झाले. आम्ही गेलो तेव्हा सर्वत्र पुस्तके वाळत ठेवलेली होती.
सर्व शाळेत चिखलाचे साम्राज्य होते, अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले होते. मनुष्य बळ कमी. एवढे असून सुद्धा गिरीश जी आमच्या बरोबर अतिशय शांतपणे बोलत होते.
ह्या शाळेला नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे शासनाने कबूल केले आहे,
श्री. गिरीश प्रभुणे ह्यांच्या बरोबर भरपूर गप्पा झाल्या. सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवर त्यांनी खूपच चिंता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पूर्वीच्या पिढीमध्ये संघर्ष करण्याची जी प्रवृत्ती होती, जी कृतिशीलता होती, ती नंतर हळू हळूहळू कमी होत गेली.
१९४८ नंतर , संघ नको, सावरकर नको , ह्या प्रवृत्तीने वेग घेतला. मागच्या पिढीतील शिक्षकांमध्ये जी तळमळ होती, जो त्याग होता तो आता राहिला नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

ह्या शाळेला डोनेशन देणारी मंडळी आहेत,
मंत्री पण अधून मधून शाळेला भेट देतात, तरी पण हे सर्व फार अपुरे पडते,
एवढ्या अडचणीतही शांतपणे आपले काम करणाऱ्या श्री. गिरीशजी प्रभुणे ह्यांना व ह्या शाळेत अतिशय कमी मानधनात काम करणाऱ्या शिक्षकांना व सफाई कर्मचाऱ्यांना विनम्र अभिवादन.
