मनोरंजन

कथा. स्वेटर सुहासिनी कंजरकर

कथा. स्वेटर

रियाने बारावीची परीक्षा पास केली. परसेंटेज खूप छान मिळवले होते तिने त्यामुळे नागपूरच्या व्ही एन आय टी कॉलेजमध्ये तिला सहज ऍडमिशन मिळाली. रियाची उंची, रंग, शरीर यष्टी सर्व काही छान होते पण तिच्या चेहऱ्यावर एक काळा डाग होता बऱ्यापैकी ठळक त्यामुळे तिच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता. अभ्यासात हुशार होती पण कोणाशी बोलताना तिचा आत्मविश्वास कमी व्हायचा त्यामुळे तिची स्वतःवरच चिडचिड व्हायची.
रियाच्या घरची परिस्थिती उत्तम होती वडील इंजिनियर होते आई गृहिणी. दोघांनाही रियाच्या लग्नाची खूप काळजी होती. रिया सोबत तिच्या वर्गात तिची वर्षा नावाची मैत्रीण होती. दिसायला ती सुंदर होती. दोघी नेहमी सोबत असायच्या त्यांचं चांगलं मेतकूट जमायचं.
एक दिवस त्यांच्या वर्गातला श्रेयस खूप सुंदर रंगाचं आकर्षक स्वेटर घालून आला. रियाला ते स्वेटर खूप आवडले. ती सारखी त्याच्याकडे आणि स्वेटरकडे बघत होती. तिने वर्षाला तसे सांगितले सुद्धा. वर्षा लागलीच तिला त्याच्या नावाने चिडवायला लागली.
श्रेयस अतिशय स्मार्ट आणि स्कॉलर मुलगा होता त्याचे वडील क्राईम लॉयर पैशाला काहीच कमी नव्हती. त्याला वर्षा खूप आवडायची बऱ्याच वेळा तिच्याकडे बघत राहायचा. रियाकडे बघितल्यावर त्याला वाटायचे तिच्या चेहऱ्यावर जर हा काळा डाग नसता तर ही वर्षापेक्षा सुद्धा सुंदर दिसली असती.
कॉलेजच्या थर्ड इयरला कॅम्पस सिलेक्शन झाले. वर्षाला बंगलोरच्या टीसीएस कंपनीत नोकरी लागली. रिया आणि श्रेयस यांचे पुण्यातील इन्फोसिस कंपनीत सिलेक्शन झाले. आता दोघी मैत्रिणींची ताटातूट होणार होती त्यांना खूप वाईट वाटत होते पण इलाज नव्हता. कॉलेजचे फोर्थ इयर संपल्यावर सुट्ट्या होत्या आणि त्यानंतर जॉइनिंग होते.
जॉइनिंग च्या पहिल्या दिवशी श्रेयसने रियाला बघितले आणि तो थक्क झाला. मधल्या सुट्ट्यांमध्ये एका डॉक्टरांनी रियाच्या आई-वडिलांना सांगितले की आपण हिचा काळा डाग सर्जरीने काढू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी तो डाग काढला. रियाचा आत्मविश्वास खूप वाढला. तो तिच्या बोलण्या चालण्यातून स्पष्ट दिसत होता. तिने पहिल्या दिवशी फिक्‍या नींबू कलरचा ड्रेस घातला होता केस मोकळे सोडले होते स्टायलिश चष्मा लावला होता खूप सुंदर दिसत होती ती. आपल्याकडे एकटक बघणाऱ्या श्रेयसला तिने चुटकी वाजवून विचारले कुठे हरवलायस. श्रेयस एकदम भानावर आला. त्याने हॅलो करण्यासाठी हात पुढे केला. रियाने क्षणाचाही विलंब न लावता आपला हात त्याच्या हातात दिला. तिचं अंग एकदम मोहरून आल.
आता ते दोघजण एकत्रच लंच घेऊ लागले. दोघांना एकमेकांशिवाय करमत नव्हते. रियाने श्रेयसला कॉलेजमधल्या स्वेटरची गोष्ट सांगितली. त्याला खूप हसू आले. दुसऱ्या दिवशी तो तेच स्वेटर घालून कंपनीत आला. रियाला खूप आनंद झाला. श्रेयसने हिंमत करून एक दिवस रियाला लग्नाविषयी विचारले. तिने लाजून मान खाली घातली. श्रेयस काय समजायचे ते समजला. दोघांच्याही आई-वडिलांनी नकार देण्या सारखे काही नव्हतेच.
लग्ना चा मुहूर्त दोन महिन्यानंतरचा ठरला. खरेदीला सुरुवात झाली. एक दिवस रिया श्रेयसला म्हणाली आज आपण कार ऐवजी टू व्हीलर ने जाऊया त्यात वेगळीच मजा असते. श्रेयस लागली च तयार झाला. दोघे लक्ष्मी रोडच्या दिशेने निघाले. श्रेयस च्या गाडीची स्पीड बरोबर होती पण समोरून येणाऱ्या मोटरसायकल ची स्पीड खूप होती दोघांची धडक झाली रिया आणि श्रेयस खाली पडले. श्रेयसच्या डोक्यातून रक्त येत होते. तो बेशुद्ध पडला होता. रियाला खूपच कमी मार लागला होता. ती घाबरून गेली. तिच्या आणि श्रेयस च्याआई वडिलांना फोन केला. श्रेयसला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
डॉक्टर त्याला तपासून म्हणाले की सध्याच काही सांगू शकत नाही. श्रेयसलाऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. रियाचा जीव ठिकाणावर नव्हता. तिचे आणि श्रेयसचे आई बाबा सगळेच घाबरले होते. रिया त्यांच्यासोबत देवाचा धावा करू लागली.
एक तासाने डॉक्टर ऑपरेशन थिएटर च्या बाहेर आले. रियाने धावत जाऊन त्यांना काय झाले ते विचारले. घाबरण्याचं काहीच कारण नाही थोडक्यात मेंदू वाचला असे डॉक्टरांनी सांगितले. रियाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. श्रेयसला ऑपरेशन थिएटर मधून रूम मध्ये हलवण्यात आले. रिया धावत रूम मध्ये जाऊन श्रेयसच्या छातीवर डोके ठेवून आनंदाने रडू लागली. श्रेयसनी पण आनंदाने तिला जवळ घेतले. रियाचे आणि श्रेयसचे आई वडील बाहेरून आनंदाश्रू डोळ्यात घेऊन तो सोहळा बघत होते.

* समाप्त *

सुहासिनी कंजरकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}