डॉ विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-10-2026

डॉ विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-10-2026
ओवी नितीन आरती सिन्नरकर
आपल्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करताना अतिशय आनंद होत आहे, आरती सिन्नरकर ही ची
कन्या ओवी नितीन सिन्नरकर , हिने नॅशनल तायक्वांडो चॅम्पियनशिप मध्ये under 55 weight category मध्ये ब्राँझ पदक मिळवले. 1-4 oct दरम्यान अमृतसर येथे ह्या स्पर्धा पार पडल्या.

दिनांक 1-4 ऑक्टोबर दरम्यान अमृतसर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा मध्ये ओवी नितीन सिन्नरकर हिला ब्राँझ पदक मिळाले. त्याआधी दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा मध्ये सुवर्णपदक मिळवत पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळी वरील तायक्वांडो स्पर्धेसाठी ओवी नितीन सिन्नरकर हिची निवड झाली. राज्यस्तरावर खेळासाठी जाताना हॉस्पिटल मधून नुकताच डिस्चार्ज मिळालेली ओवी किती ताकतीने खेळू शकेल अशी शंका पालकांना नक्कीच होती. पण उत्तम खेळणार आणि मेडल नक्की मिळवणार या विश्वासावर ओवी चा जळगाव दौरा सुवर्ण पदक मिळवत जोरदार साजरा झाला.
आता पंजाब साठी तयारी करत असताना दहावी च्या परीक्षा, अभ्यास आणि खेळाची तयारी ह्या सगळ्यात मानसिक तयारीची पण खूप गरज होती. प्रथमच राष्ट्रीय स्तरावर खेळणार असल्याने त्याचे दडपण होते. पण सगळी त्यावरची कसरत सांभाळत ओवी ने अमृतसर पंजाब च्या दौऱ्यातही उत्तम यश मिळवत महाराष्ट्रासाठी broze पदक मिळवले. ओवी च्या बरोबर महाराष्ट्रातील 36 खेळाडूंचा सहभाग होता. त्यातील 32 खेळाडू अमृतसर येथे प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले. त्यातील 28 पदक महाराष्ट्राने मिळवत प्रथम क्रमांकचे राज्य म्हणूनही पारितोषिक मिळवले.

