जाहिरातमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय

Dr विभा देशपांडे  डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 1 5-2026

Dr विभा देशपांडे  डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 1 5-2026

 

ब्राह्मण यूनिटी फाउंडेशन सारेगम च्या मुशीतून तयार झालेल्या आभास टीम चा मंचावर रोमांच •आभास• एक कथानुभव हा अतिशय रोमांचक आणि उत्कंठावर्धक कथानुभवाचा पुण्याबाहेरील पहिला वहिला व्यावसायिक प्रयोग 5 एप्रिल 2026 रोजी, अहिल्यानगर मधील सावेडीतल्या माऊली सभागृहात यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमास अहिल्यानगर मधील कलाक्षेत्रातील प्रतिष्ठित लेखक रंगकर्मी श्री सदानंद भणगे तसेच पवन नाईक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर अरविंद पारगावकर, महेशभाई चांडक आदि उपस्थित होते.

कथानुभव या प्रकाराची अभिनव संकल्पना, वेगवान आणि नेटकी पटकथा, सुमधुर गायिका, गुणवंत अभिनेते, दृकश्राव्य माध्यमांचा चपखल वापर आणि मंचावरील परिणामकारक सादरीकरण ही आभास ची वैशिष्ट्ये. गेल्या वर्षभरापासून टीम ने आपला नौकरी, व्यवसाय सांभाळत केलेली ही निर्मिती, एकंदरीत कलाक्षेत्रातील एक नवा प्रकार अभिमानास्पद च ठरतो आहे. यासाठी यूनिटी आणि सारेगमकरांनी ने दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ हे विशेष नमूद करण्याजोगे.

प्रयोगाला मिळालेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांचे उभारी देणारे अभिप्राय टीम आभास ला हा प्रयोग महाराष्ट्रभर करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत

आणि आभास सावकाशपणे त्या दिशेत नियोजन आणि वाटचाल करत आहे. जूनपासून या प्रकारचे ठोस नियोजन होईल आणि त्यासाठी विविध वितरक, संस्था यांच्याशी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत असे समजते. त्यांच्या या अभिनव प्रयोगासाठी खूप शुभेच्छा.

आपल्या शहरात हा प्रयोग असेल तेंव्हा आपण सर्वांनी अगदी आवर्जून उपस्थिती लावावी आणि ज्यांनी अगदी सुरुवातीला हा प्रयोग पाहिलाय त्यांनी पण नवी सुधारित आवृत्ती पाहण्याचा अनुभव आवर्जून घ्यावा.

ब्राह्मण यूनिटी फाउंडेशन सारेगम  ला अजून एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी उचललेल्या पहिल्या पाऊलाबद्दल आभास चे मनःपूर्वक अभिनंदन.

=======


मुंबई-पुणे मिसिंग लिंक अखेर पूर्ण; आज १ मे , महाराष्ट्र दिनी लोकार्पण

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी करणारा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वास पोहोचला असून, आज १ मे २०२६ , महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या लिंकची पाहणी करतील.

मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून अर्धा तास वेळ, तसेच इंधनाची बचत होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे अंतर 13.3 किलोमीटर आहे. बोरघाटातील तीव्र वळणे आणि चढ-उतार यामुळे टाळता येतील. प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा एकूण 94.5 किमी लांबीचा रस्ता आहे. द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 4 हे दोन्ही रस्ते खालापूर टोल प्लाझा येथे एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.
त्यामुळे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट या भागात 13 किमीचा मिसिंग लिंक उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) करण्यात आले आहे. मिसिंग लिंक उभारण्याचे काम 2019 साली सुरू करण्यात आले होते. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतर अखेर हे काम पूर्ण झाले.

========

सारेगम च्या अद्वैत ने आणखी एक पारितोषिक मिळवले

आज ची अजुन एक सुख वार्ता

GBA म्हणजे Grow-well Business Associates यांनी karaoke ट्रक वर गाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात एकूण चार वयोगट ग्रुप आणि प्रत्येकी ४ फेर्या होत्या. पहिले दोन audio, तिसरा video आणि चौथी आणि final स्टेज वर. पहिल्या फेरी एकूण १७८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .त्यापैकी १४४ दुसरी आणि तीसरी फेरी साठी ६५ पात्र झाले. चौथी and अंतिम फेरी साठी फक्त २३ जण पात्र झाले.

या २३ स्पर्धकांसाठी शेवटचा फेरी भरत नाट्य मंदिरच्या स्टेजवर पार पडली. अतिशय वेळेत सुरू होऊन वेळेतच संपलेला हा कार्यक्रम होता. यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये अद्वैतच्या वयोगटात अद्वैत मराठे उपविजेता झाला.
ही आपल्या सगळ्यां करता आनंद वार्ता आहे

========

आणि आज आहे आपल्या मैय्या चा वाढदिवस , आपण सगळे जण तिला आज आपल्या शुभेच्छा देऊया 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , रुपा मैय्या

========

Dr विभा देशपांडे  डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 1 5-2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}