Classifiedजाहिरातदुर्गाशक्तीब्रेकिंग न्यूजवैद्यकीयवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय
Trending

15 06 2026 डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर हे आज चे सदर  आरती सिन्नरकर यांच्या तर्फे 

आपल्या डॉक्टर विभा – आपल्या आरोग्याची खरी मैत्रीण & ब्राम्हण युनिटीची लाडकी निवेदिका योगिता गुर्जर हिची नवी यशोगाथा

Dr विभा देशपांडे  डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर

15 06 2026 हे आज चे सदर  आरती सिन्नरकर यांच्या तर्फे 

आपल्या डॉक्टर विभा – आपल्या आरोग्याची खरी मैत्रीण

आपण सगळे नेहमीच डॉक्टर विभाकडून इतरांच्या चांगल्या बातम्या ऐकतो. पण आजची बातमी स्वतः विभाबद्दल आहे.

विभा नेहमी आपले आनंदाचे क्षण आपल्यासोबत शेअर करते. आज आपण तिच्या कामाबद्दल थोडं जाणून घेऊया, कारण ते आपल्यापैकी अनेकांसाठी उपयोगी पडू शकतं.

नवीन जबाबदारी: लठ्ठपणावर मार्गदर्शन
अनेकांना वजन वाढल्यामुळे होणारा त्रास माहिती आहे. डाएट, व्यायाम, अनेक उपाय करूनही कधी कधी वजन कमी होत नाही. त्याला ‘Resistant Obesity’ असं म्हणतात. कधी कधी डायबेटिस, बीपी सारखे इतर आजारही सोबत असतात.

ह्याच लोकांसाठी डॉक्टर विभा आता ‘ओबेसिटी कन्सल्टंट’ म्हणून काम करत आहे.

उपचार काय आहे?
जगभरात आता लठ्ठपणावर काही नवीन, संशोधनाने सिद्ध झालेली इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत. ही इंजेक्शन्स डॉक्टरांच्या सल्ल्याने, आठवड्यातून एकदाच घ्यायची असतात. तुम्ही स्वतः घेऊ शकता, दवाखान्यात जाण्याची गरज नाही.

प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते, त्यामुळे डोस सुद्धा डॉक्टर तपासून, तुमच्यासाठी योग्य असा ठरवतात.

विभाशी का बोलावं?
वजन हा फक्त दिसण्याचा प्रश्न नाही. तो आरोग्याचा प्रश्न आहे. आणि ह्या विषयावर मोकळेपणाने, विश्वासाने बोलता येईल अशी व्यक्ती लागते. विभा आपल्या सगळ्यांची ओळखीची आहे. तिला आपली काळजी आहे.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी वजनामुळे त्रस्त असेल, अनेक उपाय करूनही फरक पडत नसेल, तर एकदा विभाशी निवांत बोलून बघा. ती तुमची परिस्थिती समजून घेऊन, हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे का, हे सांगेल.

लक्षात ठेवा: हा एक वैद्यकीय उपचार आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. अधिक माहितीसाठी आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी तुम्ही थेट डॉक्टर विभाशी संपर्क करू शकता.

(( Dr Vibha 98221 19580))

वजनाचा ताण मनावर नको. योग्य मार्गदर्शन मिळालं की वाट सापडते.

————————————–

ब्राम्हण युनिटीची लाडकी निवेदिका योगिता गुर्जर हिची नवी यशोगाथा

मोठेपणा मिरवणारे अनेक जण भेटतात; मात्र मोठ्या व्यक्तींच्या सहवासात वावरून, उल्लेखनीय कामगिरी करूनही पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवणारी व्यक्ती विरळच. ब्राम्हण युनिटी परिवारातील सर्वांची लाडकी आणि सर्वश्रुत निवेदिका योगिता गुर्जर हिने नुकत्याच मिळालेल्या एका विशेष संधीमुळे पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.

ब्राम्हण युनिटीच्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे प्रभावी निवेदन करणारी योगिता हिने यापूर्वीही विविध व्यावसायिक कार्यक्रमांतून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र यावेळी एका वेगळ्याच स्वरूपाच्या प्रतिष्ठित शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे निवेदन करण्याची तिला संधी लाभली.

अमूल्य ज्योती आणि केशव वेणू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित पन्नालाल घोष जयंती विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रमात योगितानी आपल्या निवेदन कौशल्याची वेगळीच झलक दाखवून दिली. विशेष म्हणजे, अनेक वर्षांचा अनुभव असूनही “अजूनही मला अभ्यास करायला हवा,” असे नम्रपणे सांगणाऱ्या योगिताचा हा दृष्टिकोन नक्कीच प्रेरणादायी .

या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवस पूर्णपणे नव्या वातावरणात आणि अपरिचित लोकांमध्ये वावरताना योगिताला मिळालेला प्रतिसादही विशेष ठरला. कार्यक्रमादरम्यान तसेच कार्यक्रमानंतर अनेकांनी स्टेजवर, पडद्यामागे आणि बाहेर भेटून तीच्या निवेदनाचे कौतुक केले. आजूबाजूला अनेक दिग्गज कलाकार आणि मान्यवर उपस्थित असतानाही रसिकांनी आवर्जून दिलेली दाद तिच्या कामावरील प्रेम आणि समर्पणाची पावती होती.

योगिताच्या निवेदनाची खरी पोहोच अधोरेखित करणारा एक प्रसंग विशेष उल्लेखनीय ठरला, एका हिंदीभाषिक महिलेने तिला जेव्हा, “तुमचे मराठी मला अर्थासह सुंदर समजले,” असे सांगत कौतुक केले तेव्हा भाषेच्या पलीकडे जाऊन श्रोत्यांपर्यंत विचार पोहोचविण्याची क्षमता असलेल्या निवेदिकेसाठी ही निश्चितच मोठी दाद.

विशेष म्हणजे, यशाचा गर्व न बाळगता त्याचा आनंद घेण्याची योगिताची सहज वृत्ती सर्वांनाच भावते. कार्यक्रमानंतर तिथल्या अनुभवांविषयी बोलताना तिला मिळालेला समाधान आणि आनंद स्पष्टपणे जाणवत होत. “Yes… Loving it!” असे निरागसपणे म्हणताना ती एखाद्या यशस्वी पण तितक्याच निष्पाप मुली सारखी वाटली अगदी.

कागदाचा आधार न घेता रसिकांशी सहज संवाद साधणे, कार्यक्रमात काही चूक झाल्यास ती मोठेपणाने स्वीकारणे, तसेच स्वतःवरही विनोद करण्याची तयारी ठेवणे, ही योगिताची जमेची बाजू. ब्राम्हण युनिटीच्या एका कार्यक्रमात स्टेजवरून उतरताना पडल्याचा प्रसंग असो किंवा एखादी अनपेक्षित टिप्पणी, त्या प्रत्येक परिस्थितीला हसतमुखाने ती सामोरी जाते.

याच सहजता, नम्रता आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर योगिताने आज निवेदन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या यशाबद्दल ब्राम्हण युनिटी परिवारात आनंद, अभिमान आणि कौतुकाची भावना प्रत्येकाला नक्कीच आहे. भविष्यात योगिताला अशाच अनेक नवनव्या आणि मोठ्या संधी लाभाव्यात, हीच शुभेच्छा

सौ आरती सिन्नरकर

डीव्हीडी कॉर्नर

आजची खुश खबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}